मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुटबॉल विश्वचषक कोण जिंकणार?

जे.पी.मॉर्गन · · कौल

वाचने 1761 वाचनखूण प्रतिक्रिया 42

सहज Wed, 06/02/2010 - 15:05
माझा या विषयात अभ्यास नसल्यामुळे सांगता येणार नाही. सहज्त्सु पण ब्राझील, इंग्लंड व जर्मनी सेमी फायनल पर्यंत यावे असे वाटते. पण कोणतरी दोघेच येतील कदाचित. चौथी टीम कोणतरी डार्क हॉर्स अवांतर - आयडीया भारी आहे वेगवेगळ्या नावाने ज्योतिषांच्या टीमने भाकीत करायची ज्याचा सट्टा लागेल त्याने इतरांना नंतरच्या वाढीव उत्पन्नातला हिस्सा द्यायचा. नाडीपट्टी,ज्योतिषी व होलीस्टीक हिलिंग रिट्रीट फ्रँचायसी पाहीजे असल्यास संपर्क करा.

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 15:03
माझाही अभ्यास नाही. पण आपलं मत जर्मनीला! कोण जाणे का प्रत्येक वर्ल्डकपच्या वेळेस मला ती टीम 'आपली' वाटते!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Dipankar Wed, 06/02/2010 - 15:04
भारत नक्की नाही तसेच नेपाळ पाकीस्तान श्रीलंकाही नक्की नाही

गणपा Wed, 06/02/2010 - 15:23
ब्राझील व जर्मनी हे माझे आवडते संघ. पण जर्मनीला झुकत माप दिलय.

ब्राझिल किंवा जर्मनी... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भारत हा ऑप्शन नसल्याने मत नाही देत. असो. पण भारत जिंकणार नसेल तर ब्राझिल (फायनल एकदम प्रेक्षणिय होईल) किंवा जर्मनी जिंकावेत. बिपिन कार्यकर्ते

जे.पी.मॉर्गन Wed, 06/02/2010 - 15:51
लई भारी खेळतायत भौ....टीम पण झ्याक्क हाय.... टोरेस, विला, हाविएर मार्टिनेझ, पुयॉल... सगळेच चांगले खेळतायत.... बेंकिंग ऑन द रेड फ्युरी ! जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

>>लई भारी खेळतायत भौ.... +१ >>टीम पण झ्याक्क हाय.... +१ >>टोरेस, विला, हाविएर मार्टिनेझ, पुयॉल... फॅब्रिगस राहिला रे! >>सगळेच चांगले खेळतायत.... +१ >>बेंकिंग ऑन द रेड फ्युरी ! +१

छोटा डॉन Wed, 06/02/2010 - 16:19
मी जर एखाद्या क्लबचा मालक असतो तर आख्खी स्पेनची टीम मी माझ्या क्लबची टीम म्हणुन खेळवली असती ... १. व्हिक्टर वाल्देस आणि ईकर कॅसिलास सारखे गोली. २. पुयॉल, जेरार्ड पिके, राऊल अल्बालियो आणि सर्जियो रॅमोस सारखे गोल करणारे आणि गोलसमोर भिंतीसारखे उभे राहणारे डिफेंडर्स .. ३. शॅवी, चेक फॅब्रीगॅस, इनियेस्टा, झॅबी ओलेन्सो, सिल्व्हा आणि पेड्रो सारखी खणखणीत मिडफिल्ड ... ४. टोरेस आणि डेव्हिड व्हिलासारखे गोलांचा रतिब घालणारे स्टायकर्स ... एवढे सगळे असताना कुणाची टाप आहे का स्पेनला आडवे जायची ? आत्तापर्यंतच्या वर्ल्डकपच्या इतिहासातली सगळ्यात ताकदवान टीम, सोबत ह्याच टीमने युरो कप जिंकल्याच्या इतिहास असे असताना आमचे फेव्हरिट 'स्पेन' सोडुन अजुन कोण असु शकते का ? अगदीच दुसरा पर्याय म्हणुन आमचे दुसरे मत मेस्सीच्या 'अर्जेंटिना' च्या पारड्यात, हा पठ्ठ्या एकटाच गेम फिरवु शकतो ... ------ ( स्पॅनिश ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

अडाणि Sun, 06/06/2010 - 05:16
स्पेन ला मत दिलेले आहे... फुटबॉल विषयात छोटा डॉन शी बाडीस.... बाकी कुणिही जिंको पण अर्जेंटिना नको... मॅरॅडोनाने भलतेच प्रॉमीस केले आहे.... - अफाट जगातील एक अडाणि.

नील_गंधार Wed, 06/02/2010 - 16:44
ईंग्लंडला मत दिले आहे. सध्या त्यांचे नशिब जोरावर दिसतेय. संदर्भ :त्यांचा जपान विरुध्द चा सामना. नील.

In reply to by नील_गंधार

जपानने दोन सेल्फ गोल मारलेला सामना का??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by नील_गंधार

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 16:58
नशिब आणि लॅम्पार्ड हेच काय ते इंग्लंडचे दोन आधार ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

जे.पी.मॉर्गन Wed, 06/02/2010 - 17:45
एकतर ईपीएलमुळे इंग्लंडचे खेळाडूंची "हवा" असते.... आपल्या क्रिकेट टीम सारखे "स्टार्स" भरपूर आहेत इंग्लंडच्या टीम मध्ये... पण शेवटी इंग्लिश ते इंग्लिश... कितीही झालं तरी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जातील असं वाटतच नाही. त्यांना ऑपोझिशन नाही तर "सिच्युएशन" हरवते.... अवसानघातकी लेकाचे ! जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 18:11
>> पण शेवटी इंग्लिश ते इंग्लिश... कितीही झालं तरी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जातील असं वाटतच नाही. =)) =)) खरंय अगदी!! पण साल्यांनी बघता बघता टी-२० वर्ल्डकप जिंकला!! कसलं आनंदाला उधाण आलं होतं इथं!! पब्स तुडुंब भरून दारूच्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या!! रस्तोरस्ती लाल क्रॉसचे पांढरे झेंडे!! जो तो चीअर्स मॅन करत एकदम हॅपीमूड!! मजा आली मलापण!! आमच्या कोचचा मला टेक्स्ट आला.. "Indians may have the IPL lest we forget England invented T20!" पण आता फिफा वर्ल्डकपच्या वेळी हे चित्र परत बघायला मिळेल असं वाटत नाही! आताही रस्तोरस्ती, प्रत्येकाच्या गाड्यांवर तेच पांढरे झेंडे लागलेत! इनफॅक्ट तयारी क्रिकेट वर्ल्डकप पेक्षा निश्चितच जास्त प्रमाणात आहे पण तेच सेलिब्रेशन होईल काय? :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

जे.पी.मॉर्गन Wed, 06/02/2010 - 18:41
अरे इंग्लंड म्हणजे होतकरू संघ आहे... करू करू म्हणतो पण होतच नाही :)) . प्रत्येक खेळात तीच गत. तू नोटिस केलंयस का? ओवेन असो, टिम हेन्मन असो वा स्ट्युअर्ट ब्रॉड असो... समोरच्यानी थोडे डोळे मोठे केले की ह्यांच्या चेहर्‍यावर भिजलेल्या कुत्र्यासारखे दीनवाणे भाव असतात... हे काय वर्ल्डकप जिंकणार डोंबल??

In reply to by मेघवेडा

प्रभो Wed, 06/02/2010 - 18:16
>>नशिब आणि लॅम्पार्ड हेच काय ते इंग्लंडचे दोन आधार हॅहॅहॅ...तोच ना हा पेनल्टी हुकलेला?? ;)

In reply to by प्रभो

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 18:24
असो असो.. :P एखादेवेळेस होतात चुका! ;) लक्ष नाही द्यायचं तिकडे. तुम्ही प्रीमियरशिपमध्ये वर कसं येता येईल तेवढं बघा सध्या! ;) लागले दुसर्‍यांकडे बोटं दाखवायला! :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by प्रभो

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 18:31
:P -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभो Wed, 06/02/2010 - 18:42
हॅहॅहॅ....असो....जे पी च्या धाग्याचा खफ नको म्हणून खव मधे बोलू.. :) मेव्या, ह्या पर्‍याला सांगून टाक रे एकदा किंमत.... :)

In reply to by प्रभो

काय रे मेव्या इंग्लंडात जाऊन गरवारेच्या मासेमारीच्या जाळ्या वापरून झाल्यावर क्लबांना गोलपोस्टावर लावायला विकायला सुरुवात केलीस का? . ;) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मेघवेडा Wed, 06/02/2010 - 19:36
मंग.. बघा प्रीमियरशिपमध्ये गोल्सची संख्या पटकन वाढली या सीझनात मी जाळ्या विकायला लागल्यापासून.. का सांग?? जाळ्यांना माशांचा वास येतो म्हणून गोलकीपर जास्त वेळ थारा धरत नाही गोलसमोर!! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

भडकमकर मास्तर Wed, 06/02/2010 - 18:12
बुरुंडी आणि र्वांडा टीम्स आज एकत्र खेळत असत्या तर त्यांच्यावरती ही वेळ आली नसती... बुरुंडी टीम १४७ व्या क्रमांकावर फेकली गेलीय.. आणि र्वांडा १०७ व्या... र्वांडाने २००८ मध्ये ७८ व्या क्रमांकावर्ती झेप घेतली होती... र्वांडामध्ये १०९०० रजिस्टर्ड प्लेयर्स आहेत आणि ११० अधिकृत क्लब आहेत.... आपले मत र्वांडाला... सेलास टेटे कोच झाल्यापासून र्वांडाकडून आमच्या अपेक्षा फार वाढल्या... झुब्रिक बाघेरा, निकोलाय फोन्टाना, आन्द्रेस दोगोव, मार्टिन झुजेला हे काही लक्ष ठेवण्यासारखे खेळाडू

In reply to by भडकमकर मास्तर

टारझन Sat, 06/05/2010 - 11:31
बाजार उठवला ह्या मास्तर नं =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (झुब्रिक बाघेरा, निकोलाय फोन्टाना, आन्द्रेस दोगोव, मार्टिन झुजेला हे खेळाडु कोणत्या देशाचे असले हे माहित नसले तरी त्यांच्या खेळाचा चाहता) तडतडकर मास्तर

जे.पी.मॉर्गन Wed, 06/02/2010 - 18:27
आफ्रिकन टीम जिंकली तर नथिंग लाइक इट... पण खूपच अवघड आहे हो! पेलेकाका म्हणाले होते खरे की २००० पर्यंत एखादा आफ्रिकन संघ वर्ल्डकप घेईल म्हणून... पण शेवटच्या सोळात जास्तीत जास्त २ आफ्रिकन देश असतील असं वाटतंय... नायजेरिया, घाना किंवा कॅमेरूनला थोडाफार चान्स आहे.

आशिष सुर्वे Wed, 06/02/2010 - 19:50
जर्मनी प्रश्नच नाही!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

अभिज्ञ Wed, 06/02/2010 - 19:57
ब्राझील विरुध्द अर्जेंटिना असा सामना होता. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. अर्जेंटिना त्यावेळी भलत्याच फॉर्मात होता. सामन्या आधी अर्जेंटिनामधील एका कंडोम बनवणा-या कंपनीने ब्राझीलला मुद्दाम खिजवण्यासाठी अशी एक जाहिरात बनवली. MailRediff सामना झाला.ब्राझील विजयी झाले होते. आता पाळि ब्राझीलची होती. त्यांनी ह्या जाहिरातीला असे उत्तर दिले. MailRediff_1 तस्मात आमचे मत ब्राझील लाच. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

मिसळभोक्ता गुरुवार, 06/03/2010 - 07:38
कॅमेरून वर १ हिरवाकंच डालर लावला आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हेरंब Sat, 06/05/2010 - 13:58
सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत जिंकणार ईटली!

ब्राझील - प्रत्येक वर्ल्डकप खेळलेला एकमेव संघ वा पिवळ्या बंडीला चिरडायची टाप हाय काय साला तेच जिंकणार लावता बेट बोला ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम