Skip to main content

तुझ्या रूपातले राग

तुझ्या रूपातले राग

Published on शनीवार, 29/05/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
क्रांती यांची क्षमा मागुन... काही दारात बारात, थोडे वेळात चुकले, माझ्या मनात होते, का तु झोपुन घेतले?.. रात्री जागवल्या साधु, राज-हरणाला पीत आर्त विनवण्या केल्या जोगियाच्या प्रहरात भल्या पहाटेला मस्तक तुझ्या चरणी झुकले काळजात कोमेजले मुक्या मागण्यांचे नि:श्वास तरि नकाराचा तुझ्या नाही केला ग दुस्वास घोरण्याच्या सुरांत तुझ्या, माझ्या मागणीला जपले मल्हाराच्या लडिवाळ, सरी आळवल्या कानात, आळविले दाराचे सूर, ठेवुन आशा ग मनात तुझ्या भुपाळाच्या ताना, वाटे निमीत्त हुकले. अखेरच्या प्रहरात रानी, लाज माझी राख ऐक जीण्यातुन घुमे, रामु दुधवाल्याची हाक दयाघना, मरो आता; शोधु मार्ग ते एकले..
लेखनविषय:

याद्या 1067
प्रतिक्रिया 1
काव्यरस