सुढाळ ढाळाचें मोती.....
लेखनप्रकार
रत्ने, मणी, खडे - एक संकलन -हा लेख काल मीमराठीवर वाचला आणि चर्चा सुरु झाली ती वेगवेगळ्या रत्नांवर. खरे सांगायचे तर मूळ धागा होता रामायण कालीन रत्ने, मणी- खडे या विषयावर .प्रतिसाद लिहीताना असे वाटले की विषयांतर होते आहे म्हणून आज वेगळेसे टिपण लिहीले. या टिपणाच्या सुरुवातीला काल लिहीलेला प्रतिसाद टाकतो आहे .त्यांनतर आजचा धागा पुढे लिहीला आहे.
बसरा मोतीनिदान भारतात तरी आता मिळत नाही.जुन्या दागीन्यातून काढून एखादा जव्हेरी विकत असेल तरच . बाकी बसरा मोती बगदाद मधून आपल्याकडे यायचे असे जाणकार सांगतात.मध्ये एकदा व्यापार्याने खरा बसरा मोती दाखवला होता. त्याच्या कडे एक अंगठी रीमेक साठी आली होती त्यातला.
बसरा मोती पांढरा नसतो. गायीच्या दुधावर आलेली साय ज्या रंगाची असते तितका पिवळसर असतो.चमक मनाला भूल पाडेल अशी असते.
सध्या बाजारात मिळणारे मोती चायनीज मोती म्हणून ओळखले जातात्ए मोती आकारानी छान गोल असतात त्यामुळे दागीन्यात वापरायला बरे पडतात.
बसर्याचा आकार गोलाकार नसतो.बसलेल्या बेसनाच्या लाडवासारखा दिसतो. गुजरात मध्ये खंबातला अजूनगी जुने बसरा मोती मिळतात.
ग्राहकाने खरा मोती मागीतला तर जव्हेरी खरा मोती वेडावाकडा असतो असे सांगतात. तरीही ग्राहकाने आग्रह केला तर वेडावाकडा जो मोती दाखवला जातो तो मोती नसतो.तो मोती नसून उलटा वळलेला शिंपला असतो. त्याला बहुतेक मदर ऑफ पर्ल असे म्हणतात. याची मोठी शंभर दोनशे ग्रामची लादीच मिळते .मग त्याचे तुकडे करून नैसर्गीक मोती म्हणून विकले जातात.
सध्या महागातला मोती म्हणजे वेनेझुलन मोती. पण बसरा मोती वेगळाच आणि महागही.
दहाएक वर्षापूर्वी ऐकीव किंमत सत्तावीस हजार रुपये केरट एकानी सांगीतली होती.
पुष्कराज ह्या खड्याबद्दलही बरेच प्रवाद आहेत पण ते विषय आला की लिहीतो.
********************************************************************
काल बसरा मोत्याचा विषय निघाला आणि श्री संत ज्ञानेश्वरांच्या एका रचनेची आठवण झाली.
काही शब्द ताबडतोब आठवेनात म्हणून संग्रह बाहेर काढला आणि पूर्ण रचना मिळाली.
सुढाळ ढाळाचें मोती ।अष्टै अंगे लवे ज्योती
जया होय प्राप्ती । तो चि लाभे.
संतानी नरदेह आणि जन्माचे वर्णन सुढाळ म्हणजे सुघड अशा मोत्याची उपमा देत म्हटले आहे की असे मोती आठ
अंगानी प्रकाश उजळतात.
आता मोत्याची आठ अंगे शोधणे भाग झाले .
थोड्या प्रयत्नानी ती पण माहीती मिळाली.पण अपूर्णच.
सहा अंगाची माहीती कळली.
आदर्श म्हणावे अशा मोत्याची लक्षणे म्हणजे ते पूर्ण वर्तुळाकार , तेजस्वी ,तुळतुळीत वजनदार , कोमल आणि
निर्मळ असावे.
पण ही लक्षणे सहाच झाली बाकीची दोन काही मिळाली नाहीत.
दोषांची यादी मात्र मिळाली.फाट ,नर पोटनर करवा , छाटे ,खळगे .
मोत्याच्या माथ्यावर फुटका भाग असला तर फाट.
मोती चिरल्यासारखी आडवी रेघ दिसली तर ती नर.
खोलगटपणा असला तर करवा आणि वेगळ्या रंगाचे ठिपके दिसले तर छाटे.
पण आता परीस्थिती अशी आहे की खरे मोती मिळतच नाहीत त्यामुळे या गुणदोषाची यादी फारशी उपयोगाची नाही.
उपयोगाची नसलेली तरीही रंजक अशी मोत्याची माहीती म्हणजे पूर्वी चालत असलेली मोत्याचे भाव सांगण्याची पध्दत.
मोत्याचा भाव चवावर सांगीतला जायचा.
आता चव हे काही वजनाचे माप नाही. तत्कालीन वजनाचे माप होते रती. रती म्हणजे तोळ्याचा बासष्ठावा भाग.रतीचे आणखी बारीक माप म्हणजे तंदुल.तांदूळाच्या सोळा दाण्याचा भार म्हणजे एक रती.
चव म्हणजे वजनभाराचे माप नसले तरी वजनभाराचा एक फॅक्टर असे आपण म्हणू या.
मोती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे मोत्याचा लॉट विक्रीस यायचा. त्याची किंमत काढण्याची पध्दत अशी होती.
लॉटचे वजन रतीत करायचे. त्याचा वर्ग करायचा .त्या वर्गाला पंच्चावन्नानी गुणायचे आणि शहाण्णवानी भागायचे.जो आकड येईल त्याला लॉटमधल्या मोत्यांच्या संख्येने भागायचे. असे करून जे उत्तर आले ते चवात आले. हे सगळे उपदव्याप करायचे कारण असे की लॉटमध्ये मोत्यांची संख्या कमी असली की चव वाढायचे आणि पैसे जास्त मिळायचे.बाकी पंचावन आणि शहाण्णवाचा काय गुणाकार आणि भागाकार का करायचा याचे उत्तर मात्र मिळाले नाही.
आता मात्र कॅरेटच्या हिशोबाने बाजार चालतो.एक कॅरेट म्हणजे दोनशे मिलीग्राम. पाच कॅरेट म्हणजे एक ग्राम.
मोत्यांची माहीती उगाळावी तितकी कमीच आहे. किंबहुना सगळ्याच रत्नांची माहीती उपसावी तेव्हढी कमीच आहे.
मी दिलेली माहीती कदाचीत गुगलवर नसेल म्हणून येथे दिली .
बाकी आमच्या सारख्या संतांना जडजवाहीर काय कामाचे ?
आम्ही आपले तुकोबा सांगतात तशी मानस पूजा करतो आणि सगळी रत्ने ज्याची त्याला अर्पण करतो.
रत्नांची कुंदले मोतीयाचा तुरा । शिरपेच बरा कलगीवरी
पाचरत्न मोती माणिक हिरक । अर्पिले सुरेख हार यांचे
कंठी ,भुजबंद ,पोंची ,कमरबंद । मुद्रिका स्वच्छंद नानापरी
तुका म्हणे माझ्या इच्छेच्या कारणे । ऐशीम भूषणे ल्याला देव.
तुम्ही मात्र खरेदीसाठी पैसे जमा करा मग आणखी काही तरी लिहीतो.
वाचने
11471
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
वा!
In reply to वा! by ऋषिकेश
+१
In reply to +१ by धनंजय
+१
In reply to +१ by विसुनाना
+१
In reply to +१ by Nile
++
In reply to ++ by श्रावण मोडक
+++
In reply to +++ by बिपिन कार्यकर्ते
++++
हे रत्ने ,
In reply to हे रत्ने , by टारझन
मधलं बोट लोकं
In reply to मधलं बोट लोकं by एक
हो पण
मस्त
सुरेख माहिती
छान
:-)
मोत्यांसारखेच पाणीदार लेखन!
व्वा..
In reply to व्वा.. by स्वाती दिनेश
+१
उपयुक्त माहीती
छान
मोतिया लेख
मग हे
मस्त
मोत्यांबद
मस्त लेख.
रामदास भाया आ मोती
खुप
In reply to खुप by संजा
हा सरावाचा भाग आहे.
रती
माझ्या माहीतीप्रमाणे