जल्लाद उर्फ चंडाळ
चंडाळाचं जे निर्दयी काम असतं तेच जल्लादाला करावं लागतं. परंतु चांडाळाच्या भांडाळ स्वभावाप्रमाणे त्यात तोँडाळपणा नसतो. जल्लाद त्याचं काम 'अल्ला'द करतो असा शब्दभ्रम होणे साहजिकच. चांडाळा सारखा ठोस शब्द जल्लादासारख्या हिँदी शब्दाने वाङमयाच्या वेशीबाहेर 'लटकविला' आहे. चांडाळाचा मूल्य(मूळ)अर्थाने नेहमी गालिप्रदानासाठीच उपयोग केला गेल्याने आरोपीच्या रूपातील चांडाळांभोवतीचा फास आवळण्यासाठी हिँदीचे जल्लाद कामी येतात म्हणजे उपयोगी पडतात. अतिशूद्र म्हणून चंडाल पूर्वीपासूनच कुप्रसिद्ध असल्याने आणखी कुविख्यातांना मुक्ति देण्याचं पूण्यकर्म त्याच्या नशिबी नसावं.
दोरखंडाच्या फासाला किँवा फाशीच्या दोरखंडाला तूप-लोणी चोपडून गळ्यात अडकवणारे मोजकेच जल्लाद आताशा मौजूद आहेत. एखाद्याला फाशी देण्यासारखं क्रूरकर्म डोळे झाकून करता येत नसतं. एक नामांकित जल्लाद सांगतो, 'आरोपीला मरेपर्यँत लटकवत ठेऊन त्याची तडफड थंडावण्याची वाट पाहणं महाकठीण काम. त्यानंतरच्या कित्येक रात्री मलाच तडफडत काढाव्या लागतात.'
फाशी चढवणं सोप्पं काम नाही. ठरल्या दिवशी ठरल्यावेळी पंचांसमक्ष आरोपीची 'परवानगी' घेऊनच ते सुकर्म करावं लागतं. शेवटची इच्छा वगैरे फिल्मी संवादांना वेळच नसतो. फारफार तर 'तुझ्या आवडत्या देवाचं नाव घे. मुळीच घाबरू नकोस, कळणारसुद्धा नाही, एकदम हळूच(?) फाशी देतो.' असं एखाद्या घाबरट आरोपीला सांगावं लागतं. अर्थात समोर मृत्युचा फास पाहून ढसाढसा रडणाऱ्या आरोपींना कसा जन्माचा पश्चाताप होत असेल हे जल्लाद पुरता ओळखून असतो.
एवढ्यावरच त्याचं काम थांबत नाही. दोरखंड काचू नये, गळा रक्ताळू नये यासाठी तो तेला तूपाने माखला जातो.
तोंडाबाहेर पडणारी जीभ, तट्ट फुगलेला आरक्त चेहरा, बाहेर पडू पाहणारे डोळे फाशीनंतरचे हे भयप्रद मृत्युचे रूप इतरांना दिसू नये म्हणून आरोपीचा मुखडा काळ्या बुरख्याने झाकतात. फासाची गाठही भक्कम असावी लागते. आरोपीला 'व्यवस्थित' उभे केले तरच 'चांगला' फास बसतो. गाठ बरोब्बर मानेवरच यावी लागते म्हणजे आरोपीला क्षणार्धात फास बसल्याने आरडाओरडा करायची संधीही मिळत नाही. शिवाय त्याला धडपड तडफड करून कुठलाच आधार मिळू नये इतके अधांतरी लटकवण्याची काळजी घ्यावी लागते. आरोपी पूर्णपणे मृत झाल्याची खात्री पटल्यावर ते अवजड धूड फासातून सोडवून, बाहेर पडलेले जीभ डोळे बंद करून वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रेत ताब्यात घेतले की जल्लादाचे काम संपले. हे वाटते तितके सोपे नाही या कामालाही कौशल्याची गरज असते. त्यामुळेच की काय कायदेशीररित्या फासावर लटकावणारे जल्लाद बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक आहेत. (बेकायदा फास लावणारे चांडाळ पदोपदी उजळ माथ्याने फिरतांना आढळतात हा वास्तव भाग सोडाच!)
फाशी शिक्षामाफीच्या प्रतिक्षेत अनेकजण आहेत. बऱ्याच जणांचे दयेचे अर्ज राष्ट्रपतीँच्या स्वाक्षरीची वाट पाहत फडफड करताहेत तर बहुतेकांचे फाशी अंमलबजावणीचे खटले प्रलंबित आहेत, ठेवले गेले आहेत, पैशाच्या जोरावर फाशी लांबवता येतेय. थोडक्यात कित्येक नोटा देऊन ते आरोपी आपले आयुष्य दिवसामाजी 'विकत' घेत आहेत. लालफितीचा कारभार, तुरुंगातील जल्लादाच्या रिक्त ठेवलेल्या जागा, फाशीशिक्षे विरूद्ध पुढील न्यायालयात धाव घेण्याची 'कायदेशीर' सोय, आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून वेळ मारून(जगून) घेणे अशा कित्येक कारणांनी फाशी फक्त कागदी घोडाच ठरते. गेल्या काही वर्षाँत कुणालाही फाशी दिली गेली नाही हा त्याचाच ढळढळीत पुरावा!
एकूण काय तर हिँदी जल्लाद असो वा मराठी चंडाळ आरोपीँना 'वेळीच' फाशी दिलं गेलं पाहिजे, नाहीतर काळ सोकावेल. एव्हाना तो सोकला आहेच म्हणा...
वाचने
5875
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मौज
हम्म
फारच भयानक
तुम्ही
मरण
अब्दुल
:-)
जल्लाद
In reply to जल्लाद by बिपिन कार्यकर्ते
Bloody hell!
In reply to जल्लाद by बिपिन कार्यकर्ते
बाजुच्या
In reply to बाजुच्या by II विकास II
बाजूच्या
In reply to बाजूच्या by बिपिन कार्यकर्ते
मला तो
In reply to जल्लाद by बिपिन कार्यकर्ते
आयचा घो!!
In reply to आयचा घो!! by मेघवेडा
आपण प्रत्यक्ष-
In reply to आपण प्रत्यक्ष- by विसुनाना
ओ
In reply to ओ by मेघवेडा
अरे
In reply to अरे by बिपिन कार्यकर्ते
ते त्यांनी
In reply to आपण प्रत्यक्ष- by विसुनाना
अवांतर :
In reply to अवांतर : by आवशीचो घोव्
इथे
In reply to इथे by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आवशीचो घोव्
- आळस हा
काटा आला
In reply to काटा आला by स्पंदना
हे वाचा...
जल्लादाचे
In reply to जल्लादाचे by अविनाशकुलकर्णी
का हो?
आरोपी
धन्यवाद. प्
बाप रे :