सोनिया गांधी : एक चरित्र
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल.
अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि. 'रशिद किडवई" हे सोनियांच्या घरापर्यंत बर्याचदा जाऊ शकणार्या व्यक्तींपैकी एक. अश्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिले आहे हे बघुन त्यातील माहिती केवळ "सोनियास्तुती" नसेल अशी अपेक्षा होती आणि ती काहि अंशी पूर्ण झाली.
सोनिया गांधींचे बालपण, कॉलेज, राजीव गांधीचा जीवनात प्रवेश, इंदीरा गांधींबरोबरचे संबंध, संजय गांधींबरोबरचे जिव्हाळ्याचे संबंध, मनेका गांधींचा प्रवेश, राजीव गांधींबरोबरच्या त्यांच्या गप्पा , राहूल गांधी - प्रियांकाचा प्रवेश, राजकीय घडामोडी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एका सामान्य परदेशी स्त्रीचा एका खंडप्रा:य देशाची नेत्री म्हणून केलेला प्रवास ह्या पुस्तकात खूप सुंदर मांडला आहे.
पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोनियांच्या चरित्राबरोबरच पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील कॉंग्रेसचा प्रवासही नीट समोर येतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास बर्याचदा वाचला जातो. त्याच बरोबर हा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासही तितकाच रोचक व नाट्यापूर्ण घटनांनी भरलेला व भारलेला आहे. आणिबाणी असो वा मंडल आयोग, संजय गांधींची "मारूती" असो वा नसबंदी, बाबरी मशीद असो वा भारताने लढलेली युद्धे किंवा त्यांनी केलेला पंतप्रधानपदाचा (तथाकथित) त्याग ह्या व अश्या अनेक प्रसंगांतून बदलता देश, बदलती काँग्रेस, बदलते राजकारण व त्यातून राजकारणापासून जाणिवपूर्वक दूर असणार्या व पतीनिधनानंतर तर राजकारणापासून पूर्ण संबंध तोडणार्या एका स्त्रीचा प्रवास अतिशय रोचक आहे. हा नुसता सोनिया गांधींचा प्रवास नसून त्यांच्या परदेशी संस्कारांना देशी संस्कारात ढाळण्याचा देखील प्रवास आहे, तो "गोरी बहु" ते "देसी बिटीया" ते "मॅडम" असा प्रवास आहे, तो अवखळ मुलगी, ते मनस्वी प्रेयसी, ते एकनिष्ठ पत्नी, लाडकी सून व खेळकर वहीनी, ते आई, ते विधवा, ते काँग्रेस अध्यक्षा असा विस्मयकारक प्रवास आहे.
गांधी घराण्याबद्दल, किंवा सोनिया गांधींबद्दल तुम्हाला आदर असो किंवा राग असो, त्यांच्याबद्दल उत्सुकता नाहि असा भारतीय मिळणे कठिण आहे असे वाटते. आणि हे पुस्तक त्या उत्सुकतेला बराच न्याय देते. त्यामुळे एका निराळ्या स्त्रीचे निराळे व अतिशय रोचक चरीत्र वाचण्यासाठी हे पुस्तक सुचवतो.
याद्या
16589
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
...त्यांच्य
खरंय.
In reply to ...त्यांच्य by प्राजु
त्यांच्या
तुमच्या वाक्याचा अर्थ नाही समजला
In reply to त्यांच्या by मदनबाण
वर
In reply to तुमच्या वाक्याचा अर्थ नाही समजला by आंबोळी
सर्वभौम
मतभेद
In reply to सर्वभौम by विसोबा खेचर
१००%
In reply to मतभेद by तिमा
+१
In reply to मतभेद by तिमा
खरय -
In reply to मतभेद by तिमा
+१००००००१
In reply to मतभेद by तिमा
पण ते
In reply to मतभेद by तिमा
म्हणजे देश
In reply to पण ते by विसोबा खेचर
धन्यवाद
पुस्तकाची
रशिद किडवई - नैना लाल किडवई
होय तेच ते..
In reply to रशिद किडवई - नैना लाल किडवई by वाहीदा
पक्षाच्या नेत्री
कुठलंही
In reply to पक्षाच्या नेत्री by सोम्यागोम्या
धन्यवाद
In reply to कुठलंही by ऋषिकेश
मुळात मग नेता कोणास म्हणावे
In reply to धन्यवाद by सोम्यागोम्या
देशाचा नेता व राष्ट्रीय नेता फरक
In reply to मुळात मग नेता कोणास म्हणावे by ऋषिकेश
राष्ट्र आणि देश यांच्यात फरक आहे का?
In reply to देशाचा नेता व राष्ट्रीय नेता फरक by सोम्यागोम्या
हम्म्म
पुस्तक ओळख आवडली
काँग्रेजी
काँग्रेजी
In reply to काँग्रेजी by शिल्पा ब
>>त्यांच्या
In reply to काँग्रेजी by विजुभाऊ
काडी लावा
+१
In reply to काडी लावा by टारझन
+२
In reply to +१ by llपुण्याचे पेशवेll
+४
In reply to +२ by स्वप्निल..
भारत खंड:प्राय
तुलनाच समजली नाहि
In reply to भारत खंड:प्राय by chipatakhdumdum
वाचिनय
यात
In reply to वाचिनय by चिरोटा
अवांतर माहिती
In reply to यात by ऋषिकेश
यू आर माय ...
In reply to अवांतर माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
- युपिए सरकारच्या वेळेस त्यांनी पंतप्रधान होण्यापासून त्याग केल्याचा गवगवा झाला. मात्र त्याच सोनीयांनी आधी स्वतःच्या (पंतप्रधान होण्यासाठीच्या) नावाला स्वतःच राष्ट्रपतींना सादर केलेल्या पत्रात, इतर खासदारांप्रमाणेच अनुमोदन कसे दिले होते?
- चीनने सोनीया गांधींना ऑलिंपिक्सच्या वेळेस रेड कार्पेट वेलकम दिले होते, जे राष्ट्रप्रमुखालाच देतात. वास्तवीक हे आंतर्राष्ट्रीय शिष्ठाचाराला धरून नव्हते किंबहूना चीनचे भारताविषयीचे एकंदरीत धोरण बघता, खोडसाळपणा होता. मॅडमच्या हे लक्षात आले नाही का?
- त्याही आधी... राजीव गांधी पंतप्रधान असताना आणि नंतर विरोधी पक्षात असताना सावली सारख्या कायम पाठीशी असलेल्या सोनीया, या केवळ त्याच वेळेस, म्हणजे श्री पेरंबदूरला कशा गेल्या नाहीत? त्याच काय पण काँग्रेसचा एक वरीष्ठ नेता हा त्या वेळेस राजीव गांधींच्या अवतीभवती नव्हता. हे काँग्रेसी संस्कृती लक्षात घेता जरा जरा जास्तच होते. त्या योगायोगाला अजून एक योगायोग होता, तो म्हणजे त्याच सुमारास राजीव गांधींनी, लोकांशी शेकहँड करत बोट सुजले म्हणून स्वतःच्या बोटातील वेडींग रींग काढली होती (संदर्भ मार्क टली: डिफीट ऑफ ए काँग्रेसमन).
असो. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)काँग्रेसल
In reply to यू आर माय ... by विकास
इंदिरा....सोनिया....प्रियांका...!!
राजीव
राजकारणी
+१
In reply to राजकारणी by डॉ.प्रसाद दाढे
हाहाहा...
In reply to +१ by टारझन
टार्या
In reply to हाहाहा... by आंबोळी
काहीही असो पण पुस्तक चांगले असणार...