✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गुरूवरचा पट्टा गायब

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Fri, 05/21/2010 - 09:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13339 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

६

भारद्वाज
Fri, 05/21/2010 - 09:51 नवीन
६ महिन्यांत वजन कमी करण्याच्या जाहिरातीत 'before' & 'after' असते तसे वाटले !
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/21/2010 - 10:04 नवीन
६ महिन्यांत वजन कमी करण्याच्या जाहिरातीत 'before' & 'after' असते तसे वाटले ! मस्त हं...! गुरुवर पट्टा असला काय आणि नसला काय आपल्याला काय फरक पडत नाही. माहितीबद्दल आभार....! स्वगत : च्यायला, मागच्या वर्षी दुर्बिणीतून गुरुला पाहिलं होतं तेव्हा एक पट्टा होता की दोन आठवत नाही. दुर्बिणीतून गुरु ग्रह दिसला त्याचाच खूप आनंद झाला होता. असो, जेव्हा जमेल तेव्हा पाहू त्याचा एक पट्टा आहे की नाही. ती 'अत्यावश्यक' बाब नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

बघा

सहज
Fri, 05/21/2010 - 09:58 नवीन
गुरुंनी आपली नाडी पट्टी पुसली. नासावाल्यांनी घेतलेला अनुभव आवडला.
  • Log in or register to post comments

नासावाल्य

भडकमकर मास्तर
Fri, 05/21/2010 - 13:53 नवीन
नासावाल्यांनी घेतलेला अनुभव आवडला. =)) _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

बहुधा

वेताळ
Fri, 05/21/2010 - 10:01 नवीन
ऑगस्ट ऋषीच्या नाडशास्त्रावरील अविश्वासाने किंवा एसी गुरुंवरील टिकेमुळे व्यतित होऊन गुरुने आपली पट्टी पुसुन घेतली असावी. आता ह्यामुळे गुरु कुंडलीत बलवान असणार्‍याना काही त्रास होईल का? वेताळ
  • Log in or register to post comments

ह्म्म्म

मनिष
Fri, 05/21/2010 - 10:11 नवीन
माझाही पट्टा काही दिवसांपासून गायब झालाय खरा आणि त्यामुळे पँट जरा अंमळ ढिली होतेय! ;)
  • Log in or register to post comments

उलटा प्रकार

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 10:18 नवीन
इथे उलटा प्रकार झालाय ... वरून कपडे चढवल्यामुळे पट्टा लपला आहे (म्हणे!). जाऊ दे, तू शोध तुझा पट्टा! :P अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

जय हो गुरू!

मनिष
Fri, 05/21/2010 - 10:27 नवीन
हा गुरू अंमळ सुपरमॅन सारखा दिसतोय...आतुन काय घालायचे, बाहेरून काय घालायचे, याबाबत अंमळ गोंधळलाय हा...असो!. तुम्ही बिचार्‍याला त्याचा पट्टा शोधून द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कैच्याकैच

llपुण्याचे पेशवेll
Fri, 05/21/2010 - 10:47 नवीन
कैच्याकैच मनिषराव. त्यांनी सांगितलं ना वरती कपडे घातले म्हणून पट्टा आतमधे लपला. मग आता काय आतमधे जाऊन पट्टा शोधणार का? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

टी.ए.-डी.ए

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 11:01 नवीन
मनीष मला टी.ए.-डी.ए देणार असेल तर मी जायला तयार आहे. ;-) (सर्कारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

.

टिउ
Fri, 05/21/2010 - 10:26 नवीन
हे पट्टे निर्माण कसे होतात यावर अजुनपर्यंत शास्त्रज्ञांचं एकमत झालं नाहीये...तितक्यात एक पट्टा गायब सुद्धा झाला! मला तर खालचा पट्टा वरती सरकल्यासारखा वाटतोय...वरच्या पट्ट्याची जाडी बघा.
  • Log in or register to post comments

अरे हो,

भारद्वाज
Fri, 05/21/2010 - 10:34 नवीन
अरे हो, खरंच की ! - खगोलनिरीक्षक (की फोटोनिरीक्षक?) टिउ यांना खगोलमंडळातर्फे शनीचे एक कडे मोफत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ

खगोलनिरीक

टिउ
Fri, 05/21/2010 - 20:26 नवीन
खगोलनिरीक्षक (की फोटोनिरीक्षक?) टिउ यांना खगोलमंडळातर्फे शनीचे एक कडे मोफत
धन्यवाद! :) पट्टे आणि कडे एक एक करुन कसे काय गायब होत चाललेत आत्ता समजलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

यात मला

Dipankar
Fri, 05/21/2010 - 12:04 नवीन
यात मला लादेन चा हात दिसतो आहे आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments

त्याबद्दल

विजुभाऊ
Fri, 05/21/2010 - 12:27 नवीन
त्याबद्दल एक अंदाज असा आहे की गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला आहे. च्यामारी तिथेही प्र॑दूषण? अवांतर : गुरूच्या वातावरणातल्या अमोनियाच्या ढगांमुळे हा पट्टा सध्या झाकला गेला हा रीकरिंग इफेक्ट असायला हवा. त्यामुळे तो पट्टा अधूनमधून गायब व्हायला हवा.. अर्थात गुरुची परिवलन वेळ ही भलतीच मोठी आहे त्यामुळे कदाचित ही गोष्ट अगोदर लक्षात आली नसावी. Image removed.
  • Log in or register to post comments

रीकरिंग इफेक्ट

टिउ
Fri, 05/21/2010 - 20:39 नवीन
इथे दिलेल्या माहितीनुसार याआधी किमान दोनदा गुरुचा पटटा नाहीसा झाल्याचं निरीक्षणात आढळुन आलं आहे. त्यावरुन असं वाटतं की दर १५ ते २० वर्षांनी ही घटना घडत असावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

परिवलन

मिहिर
Sat, 05/22/2010 - 23:01 नवीन
अर्थात गुरुची परिवलन वेळ ही भलतीच मोठी आहे माझ्या माहितीप्रमाणे गुरुची परिवलन (rotation) वेळ सूर्यमालेत सर्वात कमी सुमारे १० तास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हां

मी_ओंकार
Fri, 05/21/2010 - 12:42 नवीन
गुरू वरचा पट्टा गायब अच्छा असे आहे होय. मला वाटले गुरुवारचा पट्टा गायब. म्हणून कालच्या उपासानंतर पट्टा कसा गायब झाला अशा अंमळ चिंतेनेच हा धागा उघडला. बाकी चित्रे मस्त. - ओंकार.
  • Log in or register to post comments

चला. असा

गणपा
Fri, 05/21/2010 - 13:44 नवीन
=)) चला. असा गोंधळ झालेला मी एकटाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

मला ही मिपाचा कट्टा वाटला

वाहीदा
Fri, 05/21/2010 - 15:59 नवीन
=)) =)) =)) कधी काय गायब होईल सांगता येत नाही ;-) जादूऊऊउ जादु !! :B ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गुरूवरचा

नि३
Fri, 05/21/2010 - 12:43 नवीन
गुरूवरचा पट्टा गायब बरं मग??.. आमच्या कडुन काय अपेक्षीत आहे? तो पट्टा वापीस आणुन देने??? ---(४_२० अलिप्त फजीती) नि३.
  • Log in or register to post comments

अहो इथे

आंबोळी
Fri, 05/21/2010 - 12:52 नवीन
अहो इथे केंद्रातून पट्ट्या गायब होतात.... सापडत नाहित..(अनुभवः घाटपांडे काका ) आणि इतक्या दुरच्या गुरूच्या पट्ट्याचे काय घेउन बसलात? आंबोळी
  • Log in or register to post comments

कोणाला

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/21/2010 - 13:06 नवीन
=)) =)) कोणाला कशाचे आणी आंबोळीला पट्ट्यांचे... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

जबाबदारी

हिटलरचा डुप्लिकेट
Fri, 05/21/2010 - 13:26 नवीन
मी ऐकलं आहे कि हि बातमी प्रसिध्ध झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा ने याची जबाबदारी घेतली आहे म्हणे...
  • Log in or register to post comments

अमोनिया वगैरे काही नाही...

भडकमकर मास्तर
Fri, 05/21/2010 - 14:00 नवीन
हा अ‍ॅन्थनी वेस्ली ७ मे ला माझ्याकडे येऊन फोटोशॉप्मध्ये काही फोटो तयार करून घेऊन गेला आहे.... ( त्याला शनि नेपच्यून आनि शुक्रावरही काही रंगीबेरंगी पट्टे मारून हवे होते...वेळ नव्हता मला म्हणून खट्टू होऊन गेला..पुढल्या महिन्यात नवीन मज्जा बघा... ) अवांतर : गडबडीत अ‍ॅन्थनी फी न देता पळाला... कोठे सापडला तर सांगा _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
  • Log in or register to post comments

मानसशास्त्र

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 14:06 नवीन
आयला, म्हणजे या टोनीला मानसशास्त्रीय मदतीची, आधाराची गरज आहे तर! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

:-)

सहज
Fri, 05/21/2010 - 14:06 नवीन
>माझ्याकडे येऊन फोटोशॉप्मध्ये काही फोटो तयार करून घेऊन गेला आहे हे खरे रंगकर्मी! फोटोशॉपचा क्लास होउन जाउ दे मास्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

फोटोशॉपचा

निखिल देशपांडे
Fri, 05/21/2010 - 14:08 नवीन
फोटोशॉपचा क्लास होउन जाउ दे मास्तर! +१ सहमत.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मास्तर लै बेनं आहात हो तुमी......

मी-सौरभ
Sat, 05/22/2010 - 12:34 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) ते नासा वाले फुकट वैतागले ....... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

आयच्यान

विनायक प्रभू
Fri, 05/21/2010 - 14:04 नवीन
कमालच आहे.
  • Log in or register to post comments

चला, जाउन

Pain
Fri, 05/21/2010 - 14:55 नवीन
चला, जाउन बघू.
  • Log in or register to post comments

टिऊ, हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 15:28 नवीन
टिऊ, हा पट्टा सरकला असेल असं वाटत नाही. एवढं अंतर जायला गॅसला प्रचंड वेळ लागेल (माझा अंदाजपंचे अंदाज किमान काहीशे वर्ष). शिवाय तो पट्टा अगदीच गायब नाही झाला आहे, थोड्याफार प्रमाणात दिसतो आहे. अदिती
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Fri, 05/21/2010 - 16:09 नवीन
बाकी पट्टा निघाल्यामुळेच गॅस बाहेर की गॅस खूपच बाहेर म्हणुन पट्टा निघाला? छे हे तर कोंबडी आधी की अंडे प्रकार झाला की :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इनो...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/22/2010 - 00:20 नवीन
बाकी पट्टा निघाल्यामुळेच गॅस बाहेर की गॅस खूपच बाहेर म्हणुन पट्टा निघाला? म्हणजे तिथेही गॅस ट्रबल का? इनोचा खप तिथेही वाढला असेल. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

>>शिवाय तो

आंबोळी
Fri, 05/21/2010 - 16:09 नवीन
>>शिवाय तो पट्टा अगदीच गायब नाही झाला आहे, थोड्याफार प्रमाणात दिसतो आहे. तसे मास्तर फोटोशॉप मधे अजून कच्चेच आहेत..... आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लई भारी

वाहीदा
Fri, 05/21/2010 - 16:20 नवीन
तसे मास्तर फोटोशॉप मधे अजून कच्चेच आहेत..... =)) =)) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

एक क्षेपणास्त्र सोडा...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/21/2010 - 16:25 नवीन
गॅस लवकर पास होण्या साठी गुरुवर एक क्षेपणास्त्र मारले पाहीजे. ज्या मधे हवाबाण हरडे, कायमचुर्ण, धौतीयोग समप्रमाणात मिसळुन ठासुन भरलेले असले पाहिजेत. पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्बिण कोठलि

अजय देशपांडे
Fri, 05/21/2010 - 16:20 नवीन
साधि दुर्बिण मह्णजे काय हे सांगा
  • Log in or register to post comments

अर्धीच माहीती

विकास
Fri, 05/21/2010 - 16:31 नवीन
या धाग्यात गुरूचा पट्टा गायब झाला हे समजले पण आता आपण काय काळजी घ्यावी हे सांगितलेच नाही! :S त्याबद्दलही थोडी माहीती घ्यावी. ह्याचा संबंध पण पर्यावरण बदलाशी असावा असे वाटते... शास्त्रज्ञमॅडमनी खुलासा करावा. अवांतरः लहानपणी हवामान खात्याचे कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा वगैरे आलटून पालटून कसे होते ते समजायचे नाही... पण नंतर जसजसे व्यायाम कधी कमी कधी जास्त होऊ लागला, तेंव्हा कमी दाबाचा पट्टाच जास्त दाबाचा कसा होऊ शकतो आणि उलट, ह्याचा अनुभव घेतला :-) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

च्यायला,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 17:03 नवीन
च्यायला, सगळ्या धाग्याचा खफ केलाच आहे तर आता नाड्या आणि पट्टे काढून नाहीतर बांधून घालून टाका धुमाकूळ! अदिती
  • Log in or register to post comments

अहो तसे समजू नका...

विकास
Fri, 05/21/2010 - 17:12 नवीन
अहो तसे समजू नका... माहीती खरेच मस्त आहे. फक्त येथे एक शास्त्रज्ञ आणि इतर (या) शास्त्रात अज्ञ अशी काहीशी विभागणी असल्याने काय लिहायचे ते समजत नाही. शिवाय, या महत्वाच्या विषयावर जर लिहीले नाही तर उद्या आपले पुस्तक कोण छापणार हा प्रश्न! म्हणून जो तो, आम्ही पण या विषयावरील चर्चेत भाग घेतला असे सांगायला स्वतःची सीव्ही तयार करत आहे. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असेच

पंगा
Fri, 05/21/2010 - 17:21 नवीन
वाचतोय. पचवतोय. - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

शंका

पंगा
Fri, 05/21/2010 - 18:18 नवीन
गुरू हा ग्रह वायूंचा गोळा आहे. अर्थात गुरूचं परिवलन पृथ्वीप्रमाणे, घनपदार्थाप्रमाणे होत नाही; याला डिफरन्शियल रोटेशन (मराठी शब्द?) असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या अक्षांशांना स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग वेगवेगळा असतो.
इथपर्यंत समजले. पटण्यासारखे आहे. ठीक.
किंवा धृव भागातला दिवस विषुववृत्तीय भागापेक्षा मोठा/लांब असतो.
हे नीटसे समजले नाही. म्हणजे डिफरंशियल रोटेशनमुळे वेगवेगळ्या अक्षांशांच्या पट्ट्यांमधल्या मॅटरचा कोनीय वेग वेगवेगळा असू शकेल हे ठीक, पण कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा वेग कमी आणि कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा जास्त, याला काही कार्यकारणभाव आहे काय?
किंवा धृव भागातला दिवस विषुववृत्तीय भागापेक्षा मोठा/लांब असतो. पृथ्वीवर सगळीकडेच २४ तासांचा दिवस असतो.
हे जक्स्टापोझिशन गडबडीचे आहे. पृथ्वीवर पण ध्रुवीय प्रदेशात सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असतेच की! पृथ्वीवर कोठे डिफरंशियल रोटेशन आहे? ;) (ठीकाय ठीकाय... 'पृथ्वीचा स्वतःभोवतीचा एक फेरा' या अर्थाने २४ तासांचाच दिवस असतो, बाकी 'उजेडाअंधाराचा खेळ' सहासहा महिन्यांचा असतो, आणि त्याचा डिफरंशियल रोटेशन असण्यानसण्याशी संबंध नसून पृथ्वीच्या आसाच्या कलाशी आहे, हे ठीक. त्याउलट गुरूवर ध्रुवीय पट्ट्यातला दिवस हा 'गुरूचा स्वतःभोवतीचा एक फेरा' या अर्थाने विषुववृत्तीय पट्ट्यातील दिवसापेक्षा वेगळ्या लांबीचा असतो, आणि त्याचा डिफरंशियल रोटेशनशी संबंध आहे, हेही ठीक. पण मग तसे स्पष्ट म्हणा की! उगाच अर्थ बदलतो आणि कन्फ्यूजन वाढते, आणि आम्हाला पंगा घ्यायला चान्स मिळतो... ;)) - पंडित गागाभट्ट. ======================================================= To the man-in-the-street, who, I'm sorry to say, Is a keen observer of life, The word "Intellectual" suggests straight away A man who's untrue to his wife. - W.H. Auden (New Year Letter). "विज्ञान आम्हाला जितपत समजते तितपत रुचते. त्यापुढे दुसर्‍याने लादलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोना'वर अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या 'कॉमन सेन्स'वर अवलंबून राहणे आम्ही पसंत करतो. दुसर्‍याच्या गळी मारलेल्यापेक्षा आमच्या जितपत आहे तेवढ्या बुद्धीला जे पटते, त्याला आम्ही प्रमाण मानतो, एवढ्याच मर्यादित अर्थाने आम्ही 'बुद्धिप्रामाण्यवादी' आहोत." - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments

दिवस हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 18:55 नवीन
दिवस हा शब्द थोडी गडबड उडवत आहे; दिवस म्हणजे आकाशात जेवढा वेळ सूर्य असतो तो काळ नसून इथे दिवस याचा अर्थ ग्रहावरील एका बिंदूला एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा त्याच ठिकाणी येण्यास लागलेला काळ असा आहे.
पण कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा वेग कमी आणि कोणत्या पट्ट्यातल्या मॅटरचा जास्त, याला काही कार्यकारणभाव आहे काय?
मला मराठीत आणि मिपावर "कसं" हे नीट समजावून सांगता येणार नाही. पण धृवावरचा कोनीय वेग कमी असतो आणि विषुववृत्तावर जास्त असतो. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

हे स्पष्टीकरण layman's language मध्ये फिट बसावे

सुधीर काळे
Sat, 05/22/2010 - 06:47 नवीन
मला वाटतं कीं पृथ्वीवरील रेखांश नेहमी 'न विस्कटता' एका रेघेत फिरतात कारण ती घन आहे, तसे गुरू वायुरूपात असल्यामुळे वेगवेगळे पापुद्रे Differential rotation मुळे व वेगवेगळ्या कोनीय गतीमुळे (angular rotational speed) एकत्र फिरत नाहींत असा त्याचा अर्थ आहे असे वाटते. आपल्याकडे जशी GMT चा रेखांश सलग असतो व विस्कटत नाही, तसा गुरू घन नसल्यामुळे सगळे रेखांश जरा 'मोकाट' सुटले आहेत व विस्कटतात. ("कोणाचा पायपोस कोणाचे पायात नाहीं"ची गत!) मला वाटते हे स्पष्टीकरण जनता भाषेत (layman's language) फिट बसावे! ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432 आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅ हॅ हॅ

मिसळभोक्ता
Sat, 05/22/2010 - 06:50 नवीन
जनता भाषा.. म्हणजे आपण जनतेत नाही की काय ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

जनता

विंजिनेर
Sat, 05/22/2010 - 08:32 नवीन
जनता भाषा.. म्हणजे आपण जनतेत नाही की काय ?
ते तसं नव्हे. ती पूर्वी जन्ता बस असायची ना ते खेड्यातले लोक वापरायचे ती? आपण उच्चभ्रू मात्र एशियाड ने प्रवास करायचो... तसंच हे पण - जनता भाषा = बौद्धिक गरीबी असलेल्यांची भाषा इ... इ.. (लंगडं वासरु) विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

तसे नव्हे हो!

सुधीर काळे
Sat, 05/22/2010 - 18:18 नवीन
तसे नव्हे हो! जनता भाषा म्हणजे layman's language चे मराठी रूप. मी कांहीं खगोल शास्त्रज्ञ नाहीं, पण अदितीने जे लिहिले होते ते मला थोडेसे कळले असा माझा (गैर)समज झाला व म्हणून मी ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. Layman's language मधला layman हा शब्द खुपत नाही, पण जनता हा शब्द खुपतो हेही एक दुर्दैवच! ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432 आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

तेवढे कळले हो!

पंगा
Sat, 05/22/2010 - 09:01 नवीन
प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की कुठल्या पट्ट्याची कोनीय गती जास्त आणि कोठल्याची कमी, हे कोणत्या घटकांवरून ठरते? है कोई जवाब, हँय गुरु? - पंडित गागाभट्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

कारणें!

सुधीर काळे
Sat, 05/22/2010 - 22:14 नवीन
पुन्हा रोजच्या भाषेत जे मला कळलं आहे त्यानुसार मला असे वाटते कीं कोनीय गती (angular rotational speed) वेगवेगळी असण्याची कारणें बरीच असतात, पण माझ्या अंदाजाने खालील कारणे तपासून पहावी. १. मुख्य कारण गुरूचे वायुरूप. त्यामुळे seggregation of layers होऊ शकते. आमच्या धंद्यात पोलादासारख्या जड पदार्थाचेही द्रवस्वरूपात असताना असे seggregation होते व त्याला पुन्हा एकजीव करण्यासाठी आम्ही अर्गॉन वायू वापरून ते ढवळून काढतो! (non-homogeneity is removed by argon stirring through a porous refractory) २. तपमान व त्यामुळे आलेली वेगळी-वेगळी घनता ३. वेगवेगळ्या थरातले वेगवेगळे घर्षण अदितीच यावर जास्त विस्ताराने लिहू शकेल! व तिने लिहावे ही विनंती. ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432 आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा