कृत्रिम जिवाणू
आजच्या मुख्य बातम्यांमधे ह्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं... थोडं आणखी वाचल्यावर ह्या शोधाने बरीच खळबळ माजवली असल्याचं जाणवलं. डॉ. क्रेग वेन्टर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ १५ वर्ष हा प्रयोग चालू होता.
ह्याविषयावर शास्त्रीय आणी अशास्त्रीय वर्तुळात बरीच चर्चा चालू आहे. ह्या प्रयोगाच्या जनकांच्या मते ह्या प्रयोगाची तुलना औद्योगीक क्रांतीशी करता येइल.अशा कृत्रिम जिवाणूंचा उपयोग कितितरी वेगवेगळ्या क्षेत्रात होउ शकतो. इंधना पासून ते वातावरणातील कार्बन-डायऑक्साईड शोषून घेण्यापर्यंत...
डॉ. वेन्टर आणि त्यांचे सहकारी औषधं बनवणार्या आणि तेल-वायु कंपन्यांबरोबर काम करून नव्या नव्या प्रकारचे क्रोमोसोम बनवण्याचे प्रयोग करत आहेत. त्यांचा उपयोग इतर उपयुक्त इंधन आणि लसी / औषधं बनवण्यासाठी होइल.
दुसरीकडे लोकं ह्या प्रयोगांकडे अत्यंत साशंकपणे बघत आहेत. अशा कृत्रिम जिवांना वातावरणात मुक्त सोडल्याने त्याचे काय दुष्परीणाम होउ शकतात? ह्याबाबत काय काय टेस्ट्स झाल्या आहेत? हे प्रमुख प्रश्न उभे राहतात. त्याचप्रमाणे ह्या प्रयोगांचा दुरुपयोग लष्कर किन्वा दहशतवादी करू शकतील अशीही भिती व्यक्त केली आहे.
इथे त्याविषयी वाचता येइल.
प्रतिक्रिया
आत्ताच
उत्तेजक घटना!
Interesting!