काहीही करू नये.. (फारतर दुर्लक्ष करावे) ला मत दिले आहे
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
तुमच्यासाठी खास माझी खरडवही उघडावी की काय असा विचार करतोय. ;)
उत्तरादाखल तुलसीदासाच्या दोह्यांचे (मी ऐकून असलेले) अश्लील विडंबन तुमच्या खरडवहीत चिकटवले असते, पण काय आहे, सध्या मला खरडवहीत लिहिण्याचा अधिकार नाही ना! :(
(पण काय हो, माझ्या खरडवहीत चिकटवायला इथे कोणाला तुलसीदासाचे दोहे माहीत असतील का हो? नाही म्हणजे, हिंदीची इतकी अॅलर्जी आहे तिथे नसावेत असे वाटले. मला तरी कुठे माहीत आहेत म्हणा!)
- पंडित गागाभट्ट
या मराठीतील प्रतिसादाबद्दल जोरदार =D> =D> =D> =D> =D> !
आता बघू ह्या कौलाचे काय होते ते... :W
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
ईंग्रजी पिलावळीचे काय ? थत्ते काका ... गोगोबुट्ट तर णविण आहे (असे त्याला वाटते की "आपल्याला वाटतंय" ) .. काल परवा आल्याला ..... त्याला माफि मिळावी :)
-(अफजल गुरू चा वकिल) नानाहट्ट
पंगा हे एक
निमित्त आहे
खरी गोम आहे ती त्याने लिहिलेल्या तथाकथीत धृतराष्ट्रभाषेत.
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा हिंदी भाषीकानी पद्दतशीरपण पसरवलेला गैरसमज आहे.मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे. ती हळूहळू प्रादेशीक भाषाना गिळंकृत करीत आहे.
राजस्थानी मेवाडी भाषा आता पुरती नामशेष होत चालली आहे. हरयाणवी आणि पंजाबी सुद्धा हिम्दीच्या या गारुडातून सुटलेल्या नाहीत.
मराठी चॅनेलवरच्या कार्यक्र्मात हिंदी भाषीक स्पर्धक हिंदीतूनच बोलतात. मराठी आमदाराना हिंदीतून बोलायचा आग्रह धरतात.
हे टाळायचे असेल तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे खोटे म्हणणे स्वीकारू नका.
जाणूनबुजून लिहितोय! मला हवे तेव्हा स्वच्छ मराठीत लिहू शकतो मी! (बाकी महाराष्ट्रात वाढलेल्या आणि मराठी मातृभाषा असलेल्या माणसाला स्वच्छ मराठीत लिहिता येणे यात आश्चर्य मानण्यासारखे काही असू नये, पण हल्ली आश्चर्य वाटण्यासारखीच परिस्थिती आहे, असे मराठी वर्तमानपत्रे आणि संकेतस्थळे वाचून वाटते खरे. उगाच हिंदीला दोष कशाला द्या? मराठीभाषकच मराठीला फाट्यावर मारू लागलेला आहे, त्याला हिंदीभाषक काय करणार, हँय? तो तुमचा मुंबईचा डीएसपी पसरीचा, आहे का अजून? काय सुंदर मराठी बोलायचा! मराठी माणसाला लाज वाटावी! पण जाऊ द्या, आपलेच दात वगैरे वगैरे...)
- पंडित गागाभट्ट
प्रतिसादावरुन त्याला मराठी चांगलचं येतयं
तो मुद्दाम हिंदी लिहीत आहे अथवा फक्त खोड्या काढण्यासाठी लिहित आहे असे वाटते.
सदस्यांमधिल भांडणे आपापसात सोडवावी, त्यासाठी मराठी संस्थळाची वाट लावु नये.
खाते उडवु नये पण दुर्लक्ष करण्यापेक्षा संपादक समजावतील अशी आशा
चेतन
अमराठी प्रतिसाद उडवावे...
संपादकांना अधिक काम नको असेल तर सदस्याला समजावून सांगावे, नाही ऐकल्यास प्रतिसाद देण्याचा अधिकार काढून टाकावा....
(लोकशाही असंबद्ध वागण्याचा अधिकार देत नाही, सहमत नसलेल्यां कडून जास्त माहिती मिळवायला आवडेल) :)
ओहो......तर हे सदस्यनाव घेउन ह्या लिखाणाचा हा उद्देश आहे तर
छे छे!
काय राव, सरळ काय ते बोलायचं की (किंवा तक्रार करायची की ?)
तक्रार कशाबद्दल? लिहू देत की! हिंदीत किंवा इंग्रजीत लिहिणे हा काय गुन्हा आहे काय? समजणार्याला समजते तोपर्यंत आपल्याला काय फरक पडतो? उगाच दहा टक्क्यांचा नियम कशासाठी आणायचा?
पण मग हे स्वातंत्र्य सर्वांनाच नको का?
- पंडित गागाभट्ट
>>> पण मग हे स्वातंत्र्य सर्वांनाच नको का?
हाहाहा ... गाग्याभट्ट्याची मागणी रास्त आहे खरी !!
ह्या आधी उग्गाच अमराठी प्रतिसाद देणार्यांना कोणीच कसे बोलले नाही? हा कुतुहलाचा प्रश्ण आहे म्हणा =))
~ पुस्तकदा
काय रे बाबा पंगा, तुझ्या बाबतीतले मी आधीच वर्तवलेले होते की तुला शुद्ध मराठी येते. मग का हिंदी ची तळी उचलतोस. तू हिंदी भाषक आहेस का? अन असेल तरीही तूला मराठी सायटीवर यायचे तर मराठीत लिहायला काय झाले होते? तुझ्या अशा वागण्याने तुला उगीचच महत्व प्राप्त झाले.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
काय रे बाबा पंगा, तुझ्या बाबतीतले मी आधीच वर्तवलेले होते की तुला शुद्ध मराठी येते.
हो येतेच मुळी! (इथल्या बर्याच जणांहून चांगली येतेसे वाटते.)
मग का हिंदी ची तळी उचलतोस.
तळी कोणी उचलली? हिंदीत लिहिणे म्हणजे हिंदीची तळी उचलणे थोडेच होते?
तू हिंदी भाषक आहेस का?
नाही बुवा! पण आपल्याला हिंदीची अॅलर्जी पण नाही.
तुझ्या अशा वागण्याने तुला उगीचच महत्व प्राप्त झाले.
महत्त्व द्यायला मी सांगितले होते? दुर्लक्ष केले असतेत तर मिळाले असते महत्त्व? पण कोणी हिंदीत बोलले तर आपला 'मराठी बाणा' आड येतो ना! (मला आपली फुकटात मजा आली.)
एक सांगू, भय्याला त्याच्याच भाषेत सुनवण्यात खरी गंमत असते. पण त्यासाठी त्याची भाषा तितकी चांगली यावी लागते. इथे मराठी माणूस स्वतःची भाषा धड बोलतलिहीत नाही, भय्याला काय त्याच्या भाषेतून सुनवणार? मराठी संकेतस्थळावर जिथे चांगली मराठी भाषा लिहिण्याला (म्हणजे फक्त शुद्धलेखन नव्हे. तसे 'कल्जि घेने' वगैरे हे तर शुद्धलेखनाच्याही पलीकडचे आहे.) फाट्यावर मारले जाते, तिथे बाकीच्या भाषांची काय मारामार?
किंवा मग मराठी बाणा असा तरी पाहिजे की महाराष्ट्राबाहेर पडून, भय्याच्याच (किंवा आणखी कोणाच्या) मुलखात जाऊन त्याच्याशी पंगा घेता आला पाहिजे. आमच्या शाळेतल्या पोरांनी घेतला होता तसा. काही नाही, दिल्लीच्या सहलीत तिथल्या एका फळवाल्याशी पंधरा मिनिटे अस्सल मराठीत 'काय मग? कशी दिली केळी?' वगैरे घासाघीस करून त्याला पकवले होते. उगाच टाइमपास म्हणून, केळीबिळी काही घ्यायची नसताना. निदान तसे तरी करावे. पण नुसतेच रडण्यात काय अर्थ आहे?
आणि "तुझी भाषा फाटकी, तू तुझ्याच मुलखात मुके घेत खप" म्हणण्याने कोणाचा फायदा होतो आणि कोणाचे नुकसान होते? भय्याच्या अंगाला तर त्याने भोके पडत नाहीत! भय्या त्याच्या देशात वाटेल तिथे जायला मोकळा आहे. मराठी माणसालाही कोणी अडवलेले नाही. पण मराठी माणसालाच जायचे नाही त्याला भय्या काय करणार? (दाक्षिणात्य किंवा गुजराती माणसाला अशी अडचण येते का?)
आणि मग मराठी माणूस जेव्हा दुसर्याच्या राज्यातही नव्हे, तर दुसर्याच्या देशात, अगदी क्यालिफोर्नियात जातो, तेथे त्याला कोणी असेच म्हटले तर? की का बाबा तू आमच्या मुलखात येतोस म्हणून? मग त्याबद्दल बोंबाबोंब करणार की नाही?
जाता जाता: 'बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है' हे मराठीत आहे की हिंदीत? म्हणजे हिंदी मुलूख मराठीभाषकांच्या 'वतन'मध्ये येतो की नाही? की उगाच दुसर्याच्या वतनात मुके घेत खपायला जायचे असते? हं? (हँय?)
- पंडित गागाभट्ट
आणि मग मराठी माणूस जेव्हा दुसर्याच्या राज्यातही नव्हे, तर दुसर्याच्या देशात, अगदी क्यालिफोर्नियात जातो, तेथे त्याला कोणी असेच म्हटले तर? की का बाबा तू आमच्या मुलखात येतोस म्हणून? मग त्याबद्दल बोंबाबोंब करणार की नाही?
हेच. तुम्ही लिहिताय ते मुद्दाम. महाराष्ट्रात चालू असलेला परप्रांतिय वाद, त्यावरून मिपावर झडलेल्या चर्चा आणि तुम्ही वर दिलेली कारणं याचा विचार करता तुमचं हिंदी लिहिणं नैसर्गिक नसून, मुद्दाम लिहिल्यासारखं वाटतं.
इतर सदस्यांची जी उदाहरण तुम्ही दिल्येत, त्या कोणीही मुद्दाम, मराठी संस्थळावर हिंदी लिहून दाखवण्याच्या इर्षेनी ते प्रतिसाद लिहिल्येत असं वाटत नाही.
परप्रांतिय वादावर तुमचे जे काही विचार असतील, ते सरळ मांडा ना एखादा धागा काढून. याप्रकारे मुद्दाम हिंदी प्रतिक्रिया देऊन काय मिळणार?
नीलकांत-जी,
जर कांहीं पक्के नियम असतील तर ते वापरावेत. त्यासाठी कौल कशाला हवा?
असलेल्या नियमांच्या प्रभावी वापराबाबत माजी निवडणूक मुख्याधिकारी श्री. टी. शेषन यांना मी सलाम करतो!
तसेच नियमांबद्दलची प्रत असेल तर मला पाठवावी.
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
सभासद हिंदीत बोलतो म्हणून खाते उडविणे अति झाले. अनेक लोक अनेक प्रकारचा खोडसाळपणा करत असतात. हिंदीत जाणूनबुजून लिहिणे हे काहीच नव्हे.
अशा प्रवृत्तीबद्दल चर्चा घडवली जाऊ शकते. टीका होऊ शकते. ( जे येथे घडते आहेच.)
असल्या कारणावरून खाते बंद करणे चुकीचे.
जास्त लिहण्यात ( जरी आमचा हातखंड असला तरी त्यात ) काय हाशिल ?
हे संस्थळ मराठी भाषेतुन बोलता, लिहता, भांडता यावे ह्यासाठी काढले आहे अशी आमची समजुत आहे.
इतर सदस्यांनी एवढी विनंती करुनही जर कोणी मुद्दामच तसे करत असतील संपादकांनी आपले हक्क वापरावेत असे वाटते.
समजुन सांगायलाही हरकत नाही पण तो उपाय फोल ठरेल असे दिसते.
सबब, बिरुटेसरांशी सहमत.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
>> यांचे अमराठी प्रतिसाद उडवावे. याला मत टाकले आहे
फक्त गाग्याचेच का ? अमराठी प्रतिसादांची "ओंगळवाणी" फॅशण आहे मिपावर .. त्याबद्दल कोण काय कसं बोलत नाय ? आहो अमराठी प्रतिसादंच नाय .. तर अमराठी कार्टूण्स सुद्धा येतात ... =)) आहो बिरुटेसाहेब .. आपण तर न्यायाधिपती , समतोल आणि निर्पक्ष णिर्णयक्षमतेसाठी समस्त मराठी अंतरजालावर प्रसिद्ध असलेले , आपण असा व्यक्तिसापेक्ष णिर्णय घ्यावा ? छे ... आज मी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळीपट्टी दंडावर बांधणार ..निषेध म्हणुन ...
बाकी गाग्या फुल्ल पेटलाय =)) लढ गाग्या लढ =))
- पंडित महामठ्ठ
>>लढवता येईल तितके लढवू नाहीतर बंद करून टाकू तिच्यायला... आहे काय आणि नाही काय?
=)) =)) =))
हे आवडले मात्र !
------
( लढाई बघुन पळणारा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
কোথায় গেল, কোথায় গেল... काऊने नेला! डिलीट बटणाचा नांगर फिरला! :(
मोठ्या कष्टाने की हो जुळवला होता तो प्रतिसाद! बंगाली विसरल्याला वर्षे लोटली, तरी जुळवूनजुळवून, शब्दकोश बघून मोडक्यातोडक्या बंगालीत कसाबसा जमवला होता! आता मी काय करू? :''(
हात रे काऊ! :T
तर सांगायचा मुद्दा, आम्हाला बंगालीत चार वाक्ये धड लिहिता येत नाहीत. त्यातही पंधरा वेळा शब्दकोश बघावा लागतो. त्यामुळे त्या चार ओळींतसुद्धा आम्ही बंगाली शुद्धलेखनाला, व्याकरणाला आणि झालेच तर शब्दसंपदेला फाट्यावर मारतो. (पण तरीही कोणी चावी मारली तर लिहून बघतो.)
- (बंगालीचा होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट
(यावरून आठवले: 'गाढवाचा नांगर फिरणे'चा नेमका अर्थ कोणी सांगू शकेल काय? खात्रीलायक उत्तराची अपेक्षा आहे. उत्तर कोणीही दिले तरी चालेल - त्याकरिता मराठीचा प्राध्यापकच असणे भाग आहे असा आमचा आग्रह नाही. उत्तर मात्र खात्रीलायक पाहिजे. उत्तर देण्याकरिता स्वतः गाढव किंवा नांगर असण्याचीही पूर्वअट नाही.)
तुमचा वाढदिवस नसला, बिपिनदांचा असला, म्हणून काय झाले? इथे तर कोणालाही कधीही "वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हणतात... ;)
एवढे सांगण्यासाठी बंगाली प्रतिसाद कसाबसा जुळवला, तर त्यावर काकदृष्टी पडली. पडूदेत! (आता बंगालीतल्या सवालाला बंगालीत नाही उत्तर द्यायचे तर मग काय अहिराणीत द्यायचे की आगरी बोलीत? अहिराणीचे माहीत नाही, पण आगरी बोलीत लिहिलेले मिसळपावावर चालते हे आम्हास ठाऊक आहे. पण अहिराणी काय किंवा आगरी बोली काय, दोन्ही आम्हास येत नसल्यामुळे म्हटले, की बंगालीत उत्तर देऊन पहावे. पण जाऊदेत!)
- पंडित गागाभट्ट
पण आगरी बोलीत लिहिलेले मिसळपावावर चालते हे आम्हास ठाऊक आहे.
१ ) आगरी भाषेत लिहिलेले मिसळपाववर धावते. खोटं वाटत असल्यास ब्रिटिशचे धागे पहावेत.
२ ) आगरी ही मराठी बोलीभाषा आहे.
बाकी सर्वांना समान न्याय लावला जावा , या मताचा.
-आपला आगरी भाषासमर्थक, नरेश.
इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)
मी काहीही करू नये ला मत दिले आहे.
इथला प्रत्येक सदस्य त्याची वृत्ती, प्रवृत्ती, स्वभावगुण, धर्म घेऊन येतो. प्रत्येकाचा प्रतिसाद मिपा समृद्ध करतो. मिसळ खाताना बेदाणा येणार, शेव येणार तसच खवट शेंगदाणाही येणार. तीच मिसळीची मजा
फॉरेस्ट गम्प सिनेमातील सुंदर वाक्य - My momma always said, "Life was like a box of chocolates. You never know what you're gonna get."
तसच हे मिपा सगळे एकजात एका माळेचे मणी झाले तर काय मजा राहीली? तेव्हा माझ्या मते पंगा हे देखील सन्माननीय सदस्य आहेत त्यांना राहू द्यावे, फुलू द्यावे.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अमराठी प्रतिसाद उडवावेत.
एकदा दोनदा संपादकांची लाल अक्षरे दिसली की गपगुमान मराठीत लिहितील.
हाच न्याय एकदा/दोनदा/ तिनदा..../मलिदा/../... ह्यांना पण लावावा.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
काहीही करू नये. याला मत दिले आहे.
"आपण काय खातो " ह्या लेखात तर मूळ लेखाला प्रतिसाद देण्यापेक्षा जास्त धागे भांडणाचे आहेत.
मिसळी मध्ये बचकभर मिरची असेल तर नाकाडोळ्यातून गंगा जमुना नाही का वाहणार ........आणि हॉटेलात येणार्याचे स्वास्थ्य पण बिघडेल....
तेव्हा तलवारी थोड्याफार म्यानातही ठेवत चला ......!
मीली
पंडित गागाभट्ट!.... आपणच काही वर्षांपूर्वी "मित्र जयन्त" या नावाने इथे वावरत होता का?
:-?
सहज कुतुहल म्हणुन विचारले!... :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
या आधुनिक गागाभट्टांकडून नीलकांत वा तात्यांचा राज्याभिषेक करुन घ्या, अन मग द्या पाठवून काशीत!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
च्याय ला गागाभट्टांचे खाते गोठवावे कि नाही याचे काथाकुट्ट काढणारे तुम्ही कोण टीकोजीराव...त्यासाठी संपादक/संस्थापक/मालक ( आणखी कोणी आहे का??) समर्थ आहे. त्यांना वाटेल तर ते गोठवेल ना ते खाते...
आणि त्यांचा गुन्हा काय तर ते मराठी व्यतीरीक्त दुसर्या भाषेत प्रतीसाद देत आहे.. तर हे काय पहील्यांदाच मिपा वर घडत आहे का?? मग त्या त्या वेळी का बर अशे धागे नाही काढ्ण्यात आले???
खुलासा : मि गागाभट्ट नाही.
---(पार्शीलीटी चा तीव्र विरोधक) नि३.
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ.......
दोष काढू द्या.
In reply to हॅहॅहॅ....... by वेताळ
काहीही करू
+१
In reply to काहीही करू by ऋषिकेश
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ
काहीही करु नये.
तुलसीदास
धन्यवाद
In reply to तुलसीदास by चिरोटा
मी अनुप
In reply to धन्यवाद by पंगा
या प्रतिसादाबद्दल...
In reply to धन्यवाद by पंगा
ईंग्रजी
धन्यवाद
In reply to ईंग्रजी by टारझन
तिसर्या
पंगा हे
+१. बर्याच
In reply to पंगा हे by विजुभाऊ
काकापुतण्
In reply to +१. बर्याच by llपुण्याचे पेशवेll
इजुभौ वरुन
In reply to काकापुतण् by टारझन
कसं दिसेल
In reply to इजुभौ वरुन by परिकथेतील राजकुमार
अरे चुकलोच
In reply to कसं दिसेल by टारझन
तुम्ही
In reply to अरे चुकलोच by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to पंगा हे by विजुभाऊ
कोण बोलले?
In reply to पंगा हे by विजुभाऊ
बदल
In reply to कोण बोलले? by पंगा
नकळत कशाला?
In reply to बदल by प्रदीप
गागाच्या
In reply to नकळत कशाला? by पंगा
सहमत
In reply to पंगा हे by विजुभाऊ
प्रतिसादा
अमराठी
अगोदर...
In reply to अमराठी by समंजस
ओहो
In reply to अगोदर... by पंगा
छे छे!
In reply to ओहो by समंजस
>>> पण मग हे
In reply to छे छे! by पंगा
काय रे
In reply to अगोदर... by पंगा
पाभे,
In reply to काय रे by पाषाणभेद
हे म्हणजे
In reply to पाभे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो येतेच मुळी!
In reply to काय रे by पाषाणभेद
है
In reply to हो येतेच मुळी! by पंगा
हाण्ण तिच्यायला!!!!
In reply to है by विंजिनेर
हेच
In reply to हो येतेच मुळी! by पंगा
काहीही करु नये
'काहीही करू नये'...
नियमांबद्दलची प्रत असेल तर मला पाठवावी
प्रतिसाद
खुप सोप्पं काम आहे....! :)
+१
In reply to खुप सोप्पं काम आहे....! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद
In reply to खुप सोप्पं काम आहे....! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>> यांचे
In reply to खुप सोप्पं काम आहे....! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद!
In reply to >> यांचे by टारझन
हा हा हा ...
In reply to धन्यवाद! by पंगा
गागा
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
Feliz cumpleaños
In reply to गागा by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म...
In reply to Feliz cumpleaños by पंगा
আমার
In reply to ह्म्म... by धमाल मुलगा
अरेच्चा,
In reply to আমার by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरेच की!
In reply to अरेच्चा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
जाऊ द्या
In reply to खरेच की! by पंगा
अर्रर्रर्रर्रर्रर्र...
In reply to जाऊ द्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
हं, तर काय सांगत होतो...
In reply to खरेच की! by पंगा
पंगाभौ..
In reply to हं, तर काय सांगत होतो... by पंगा
कशाला उगाच..
मी काहीही
१+
In reply to मी काहीही by शुचि
अमराठी
काहीही करू नये!
पंडित
In reply to काहीही करू नये! by मीली
हम्म
In reply to पंडित by मृगनयनी
मेरा मत..
या
हा हा हा मस्तच
In reply to या by तिमा
हा हा
In reply to या by तिमा
हा गागा
नाही हो!
In reply to हा गागा by मितभाषी
च्याय ला
!!
In reply to च्याय ला by नि३
अरे हे काय?
.