Skip to main content

गागाभट्टांचे खाते गोठवावे का?

लेखक नितिन थत्ते यांनी मंगळवार, 18/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 4547
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

हा शुध्द पक्षपातीपणा आहे. पंगाचे मराठी चांगले आहे. तसेच त्याने तुमच्या वाक्यरचने मधील दोष दाखवले म्हणुन त्याचे खाते गोठवावे हे अतीच होतेय. वेताळ

In reply to by वेताळ

माझ्या वाक्यरचनेतील दोष काढलेत का? (असेल. मला दिसले नाही). मी त्यांच्या अमराठी लिखाणाबाबतच फक्त म्हणत आहे. नितिन थत्ते

काहीही करू नये.. (फारतर दुर्लक्ष करावे) ला मत दिले आहे ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

अदिती =========================================================== सकाळचे अकरा वाजून साडेचौतीस मिनीटं झाली आहेत. आता गाणं ऐकू या "ढॅण टॅ णॅ"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कुनाला बी कशाला भाव द्या? खुळे कुठले. ;) -Nile

श्री पंगा हिंदीतून लिहित असतील तर त्यांची खरडवही तुलसीदास् ह्यांच्या दोह्यांनी भरुन टाकावी!! P = NP

In reply to by चिरोटा

तुमच्यासाठी खास माझी खरडवही उघडावी की काय असा विचार करतोय. ;) उत्तरादाखल तुलसीदासाच्या दोह्यांचे (मी ऐकून असलेले) अश्लील विडंबन तुमच्या खरडवहीत चिकटवले असते, पण काय आहे, सध्या मला खरडवहीत लिहिण्याचा अधिकार नाही ना! :( (पण काय हो, माझ्या खरडवहीत चिकटवायला इथे कोणाला तुलसीदासाचे दोहे माहीत असतील का हो? नाही म्हणजे, हिंदीची इतकी अ‍ॅलर्जी आहे तिथे नसावेत असे वाटले. मला तरी कुठे माहीत आहेत म्हणा!) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

मला अनुप जलोटाने म्हंटलेली काही भजने माहित आहेत्.बहुतेक तुलसिदासांचीच आहेत. १)राम रमय्या गाये जा.. २)जिनके ह्रिदय हरि नाम बसे. ३)राम चरण सुखदाई. आपणास? P = NP

In reply to by पंगा

या मराठीतील प्रतिसादाबद्दल जोरदार =D> =D> =D> =D> =D> ! आता बघू ह्या कौलाचे काय होते ते... :W -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ईंग्रजी पिलावळीचे काय ? थत्ते काका ... गोगोबुट्ट तर णविण आहे (असे त्याला वाटते की "आपल्याला वाटतंय" ) .. काल परवा आल्याला ..... त्याला माफि मिळावी :) -(अफजल गुरू चा वकिल) नानाहट्ट

In reply to by टारझन

गोगोबुट्ट तर णविण आहे (असे त्याला वाटते की "आपल्याला वाटतंय" )
धन्यवाद. ;) - पंडित गागाभट्ट

तिसर्‍या पर्यायाला मत दिलंय. पंग्याचं अति झाल्यास शेवटची वॉर्निंग द्यावी नंतर त्याचा 'शिशुपाल' करुन टाकावा. - कर्मण्येवाधिकारस्ते....

पंगा हे एक निमित्त आहे खरी गोम आहे ती त्याने लिहिलेल्या तथाकथीत धृतराष्ट्रभाषेत. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा हिंदी भाषीकानी पद्दतशीरपण पसरवलेला गैरसमज आहे.मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे. ती हळूहळू प्रादेशीक भाषाना गिळंकृत करीत आहे. राजस्थानी मेवाडी भाषा आता पुरती नामशेष होत चालली आहे. हरयाणवी आणि पंजाबी सुद्धा हिम्दीच्या या गारुडातून सुटलेल्या नाहीत. मराठी चॅनेलवरच्या कार्यक्र्मात हिंदी भाषीक स्पर्धक हिंदीतूनच बोलतात. मराठी आमदाराना हिंदीतून बोलायचा आग्रह धरतात. हे टाळायचे असेल तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे खोटे म्हणणे स्वीकारू नका.

In reply to by विजुभाऊ

+१. बर्‍याच दिवसांनी विजुभाऊंशी सहमत झालो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काकापुतण्यांचं हे मिलण पाहुन डोळे पाणावले ... ;) चला रे कळशा-हांडे घेउन या :) - ऑगस्टी ऋषी

In reply to by परिकथेतील राजकुमार

कसं दिसेल विजुभाऊंवरुन ? ते काय अजिबात बचपण आहेत ? =)) "फोटू आहे तृतियस्थानी....... परा तु जागा चुकलासी "

In reply to by टारझन

अरे चुकलोच की मी. सकाळी काहितरी चुकीचे खाल्ले असीन बहुदा, त्यामुळे मी असा चुकलो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्ही काजु म्हटले नसेल अशी आशा करतो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

In reply to by विजुभाऊ

हरयाणवी आणि पंजाबी सुद्धा हिम्दीच्या या गारुडातून सुटलेल्या नाहीत.
काहीही ठोकता काय राव? (हँय, गुरु?) ऐकणारे काय वाटेल त्यावर विश्वास ठेवतात म्हणून? (कोणी हरयाणवी, पंजाबी आहे का रे इकडे?) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

ह्या धाग्याच्या निमीत्ताने का होईना, तुम्ही येथे मराठीत (बहुधा तुमच्या नकळत) लिहू लागलात, हेही नसे थोडके!! तूर्तास हा बदल स्वागतार्ह आहे.

In reply to by प्रदीप

जाणूनबुजून लिहितोय! मला हवे तेव्हा स्वच्छ मराठीत लिहू शकतो मी! (बाकी महाराष्ट्रात वाढलेल्या आणि मराठी मातृभाषा असलेल्या माणसाला स्वच्छ मराठीत लिहिता येणे यात आश्चर्य मानण्यासारखे काही असू नये, पण हल्ली आश्चर्य वाटण्यासारखीच परिस्थिती आहे, असे मराठी वर्तमानपत्रे आणि संकेतस्थळे वाचून वाटते खरे. उगाच हिंदीला दोष कशाला द्या? मराठीभाषकच मराठीला फाट्यावर मारू लागलेला आहे, त्याला हिंदीभाषक काय करणार, हँय? तो तुमचा मुंबईचा डीएसपी पसरीचा, आहे का अजून? काय सुंदर मराठी बोलायचा! मराठी माणसाला लाज वाटावी! पण जाऊ द्या, आपलेच दात वगैरे वगैरे...) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

गागाच्या कंसातल्या वाक्यांशी सहमत आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

प्रतिसादावरुन त्याला मराठी चांगलचं येतयं तो मुद्दाम हिंदी लिहीत आहे अथवा फक्त खोड्या काढण्यासाठी लिहित आहे असे वाटते. सदस्यांमधिल भांडणे आपापसात सोडवावी, त्यासाठी मराठी संस्थळाची वाट लावु नये. खाते उडवु नये पण दुर्लक्ष करण्यापेक्षा संपादक समजावतील अशी आशा चेतन

अमराठी प्रतिसाद उडवावे... संपादकांना अधिक काम नको असेल तर सदस्याला समजावून सांगावे, नाही ऐकल्यास प्रतिसाद देण्याचा अधिकार काढून टाकावा.... (लोकशाही असंबद्ध वागण्याचा अधिकार देत नाही, सहमत नसलेल्यां कडून जास्त माहिती मिळवायला आवडेल) :)

In reply to by समंजस

अमराठी प्रतिसाद उडवावे...
जरूर! पण त्याअगोदर हेही उडवा: http://www.misalpav.com/node/12235#comment-193286 http://www.misalpav.com/node/12337#comment-195309 http://www.misalpav.com/node/11039#comment-177068 http://www.misalpav.com/node/11661 (नाही म्हणजे, अगोदरचे धागे आहेत म्हणून अगोदर... काय आहे, 'समान न्याय' वगैरे बोंबाबोंब करायचा अधिकार फक्त आम्हालाच नसावा असे होऊ नये, काय? ;)) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

ओहो......तर हे सदस्यनाव घेउन ह्या लिखाणाचा हा उद्देश आहे तर :) काय राव, सरळ काय ते बोलायचं की (किंवा तक्रार करायची की ?) :) हे आडवळणानं का जावं :?

In reply to by समंजस

ओहो......तर हे सदस्यनाव घेउन ह्या लिखाणाचा हा उद्देश आहे तर
छे छे!
काय राव, सरळ काय ते बोलायचं की (किंवा तक्रार करायची की ?)
तक्रार कशाबद्दल? लिहू देत की! हिंदीत किंवा इंग्रजीत लिहिणे हा काय गुन्हा आहे काय? समजणार्‍याला समजते तोपर्यंत आपल्याला काय फरक पडतो? उगाच दहा टक्क्यांचा नियम कशासाठी आणायचा? पण मग हे स्वातंत्र्य सर्वांनाच नको का? - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

>>> पण मग हे स्वातंत्र्य सर्वांनाच नको का? हाहाहा ... गाग्याभट्ट्याची मागणी रास्त आहे खरी !! ह्या आधी उग्गाच अमराठी प्रतिसाद देणार्‍यांना कोणीच कसे बोलले नाही? हा कुतुहलाचा प्रश्ण आहे म्हणा =)) ~ पुस्तकदा

In reply to by पंगा

काय रे बाबा पंगा, तुझ्या बाबतीतले मी आधीच वर्तवलेले होते की तुला शुद्ध मराठी येते. मग का हिंदी ची तळी उचलतोस. तू हिंदी भाषक आहेस का? अन असेल तरीही तूला मराठी सायटीवर यायचे तर मराठीत लिहायला काय झाले होते? तुझ्या अशा वागण्याने तुला उगीचच महत्व प्राप्त झाले. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

पाभे, तुमच्या स्वाक्षरीच्या अतिप्रचंड चित्रातही एक आख्खं वाक्य आहे इंग्रजीत! ते ही अंमळ उडवा की!! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे म्हणजे अतीच झालं. खालचा अनूवाद वाचा की . अन जे इंग्रजीतल आहे ती एक इमेज आहे. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

काय रे बाबा पंगा, तुझ्या बाबतीतले मी आधीच वर्तवलेले होते की तुला शुद्ध मराठी येते.
हो येतेच मुळी! (इथल्या बर्‍याच जणांहून चांगली येतेसे वाटते.)
मग का हिंदी ची तळी उचलतोस.
तळी कोणी उचलली? हिंदीत लिहिणे म्हणजे हिंदीची तळी उचलणे थोडेच होते?
तू हिंदी भाषक आहेस का?
नाही बुवा! पण आपल्याला हिंदीची अ‍ॅलर्जी पण नाही.
तुझ्या अशा वागण्याने तुला उगीचच महत्व प्राप्त झाले.
महत्त्व द्यायला मी सांगितले होते? दुर्लक्ष केले असतेत तर मिळाले असते महत्त्व? पण कोणी हिंदीत बोलले तर आपला 'मराठी बाणा' आड येतो ना! (मला आपली फुकटात मजा आली.) एक सांगू, भय्याला त्याच्याच भाषेत सुनवण्यात खरी गंमत असते. पण त्यासाठी त्याची भाषा तितकी चांगली यावी लागते. इथे मराठी माणूस स्वतःची भाषा धड बोलतलिहीत नाही, भय्याला काय त्याच्या भाषेतून सुनवणार? मराठी संकेतस्थळावर जिथे चांगली मराठी भाषा लिहिण्याला (म्हणजे फक्त शुद्धलेखन नव्हे. तसे 'कल्जि घेने' वगैरे हे तर शुद्धलेखनाच्याही पलीकडचे आहे.) फाट्यावर मारले जाते, तिथे बाकीच्या भाषांची काय मारामार? किंवा मग मराठी बाणा असा तरी पाहिजे की महाराष्ट्राबाहेर पडून, भय्याच्याच (किंवा आणखी कोणाच्या) मुलखात जाऊन त्याच्याशी पंगा घेता आला पाहिजे. आमच्या शाळेतल्या पोरांनी घेतला होता तसा. काही नाही, दिल्लीच्या सहलीत तिथल्या एका फळवाल्याशी पंधरा मिनिटे अस्सल मराठीत 'काय मग? कशी दिली केळी?' वगैरे घासाघीस करून त्याला पकवले होते. उगाच टाइमपास म्हणून, केळीबिळी काही घ्यायची नसताना. निदान तसे तरी करावे. पण नुसतेच रडण्यात काय अर्थ आहे? आणि "तुझी भाषा फाटकी, तू तुझ्याच मुलखात मुके घेत खप" म्हणण्याने कोणाचा फायदा होतो आणि कोणाचे नुकसान होते? भय्याच्या अंगाला तर त्याने भोके पडत नाहीत! भय्या त्याच्या देशात वाटेल तिथे जायला मोकळा आहे. मराठी माणसालाही कोणी अडवलेले नाही. पण मराठी माणसालाच जायचे नाही त्याला भय्या काय करणार? (दाक्षिणात्य किंवा गुजराती माणसाला अशी अडचण येते का?) आणि मग मराठी माणूस जेव्हा दुसर्‍याच्या राज्यातही नव्हे, तर दुसर्‍याच्या देशात, अगदी क्यालिफोर्नियात जातो, तेथे त्याला कोणी असेच म्हटले तर? की का बाबा तू आमच्या मुलखात येतोस म्हणून? मग त्याबद्दल बोंबाबोंब करणार की नाही? जाता जाता: 'बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है' हे मराठीत आहे की हिंदीत? म्हणजे हिंदी मुलूख मराठीभाषकांच्या 'वतन'मध्ये येतो की नाही? की उगाच दुसर्‍याच्या वतनात मुके घेत खपायला जायचे असते? हं? (हँय?) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

है शाब्बास!! चालू द्या... रिकामा न्हावी तिथे भिंतीला तुंबड्या लावतोय आणि तुम्ही सारे मिळून वांझोट्या कौलांनी झब्बू खेळताय....

In reply to by विंजिनेर

ह्याला म्हणतात खरा प्रतिसाद! अहो, ते जे कुणी हाय, ते आयडी घ्येटलेल्या नावापासुनच वाकड्यात शिरायला बघतंय, दिसतंय तरी क्का त्याच्यासंग वडा कुटाय लागयसा तुमी? तुमची तयारी झालीय न्हवं? चला मग...चला बाकीच्या जत्रंत फिरु!

In reply to by पंगा

आणि मग मराठी माणूस जेव्हा दुसर्‍याच्या राज्यातही नव्हे, तर दुसर्‍याच्या देशात, अगदी क्यालिफोर्नियात जातो, तेथे त्याला कोणी असेच म्हटले तर? की का बाबा तू आमच्या मुलखात येतोस म्हणून? मग त्याबद्दल बोंबाबोंब करणार की नाही? हेच. तुम्ही लिहिताय ते मुद्दाम. महाराष्ट्रात चालू असलेला परप्रांतिय वाद, त्यावरून मिपावर झडलेल्या चर्चा आणि तुम्ही वर दिलेली कारणं याचा विचार करता तुमचं हिंदी लिहिणं नैसर्गिक नसून, मुद्दाम लिहिल्यासारखं वाटतं. इतर सदस्यांची जी उदाहरण तुम्ही दिल्येत, त्या कोणीही मुद्दाम, मराठी संस्थळावर हिंदी लिहून दाखवण्याच्या इर्षेनी ते प्रतिसाद लिहिल्येत असं वाटत नाही. परप्रांतिय वादावर तुमचे जे काही विचार असतील, ते सरळ मांडा ना एखादा धागा काढून. याप्रकारे मुद्दाम हिंदी प्रतिक्रिया देऊन काय मिळणार?

काहीही करु नये हेच योग्य आहे. अनुल्लेख हीच सर्वात मोठी शिक्षा आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

...या पर्यायाला मत दिले आहे. (मग नाहीतर अजून काय करेन असे वाटले, हं? चुकलो, हँय? =))) - पंडित गागाभट्ट

नीलकांत-जी, जर कांहीं पक्के नियम असतील तर ते वापरावेत. त्यासाठी कौल कशाला हवा? असलेल्या नियमांच्या प्रभावी वापराबाबत माजी निवडणूक मुख्याधिकारी श्री. टी. शेषन यांना मी सलाम करतो! तसेच नियमांबद्दलची प्रत असेल तर मला पाठवावी. ------------------------ सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत! 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432 आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

सभासद हिंदीत बोलतो म्हणून खाते उडविणे अति झाले. अनेक लोक अनेक प्रकारचा खोडसाळपणा करत असतात. हिंदीत जाणूनबुजून लिहिणे हे काहीच नव्हे. अशा प्रवृत्तीबद्दल चर्चा घडवली जाऊ शकते. टीका होऊ शकते. ( जे येथे घडते आहेच.) असल्या कारणावरून खाते बंद करणे चुकीचे.

यांचे अमराठी प्रतिसाद उडवावे. याला मत टाकले आहे. :) - डिलीट बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जास्त लिहण्यात ( जरी आमचा हातखंड असला तरी त्यात ) काय हाशिल ? हे संस्थळ मराठी भाषेतुन बोलता, लिहता, भांडता यावे ह्यासाठी काढले आहे अशी आमची समजुत आहे. इतर सदस्यांनी एवढी विनंती करुनही जर कोणी मुद्दामच तसे करत असतील संपादकांनी आपले हक्क वापरावेत असे वाटते. समजुन सांगायलाही हरकत नाही पण तो उपाय फोल ठरेल असे दिसते. सबब, बिरुटेसरांशी सहमत. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> यांचे अमराठी प्रतिसाद उडवावे. याला मत टाकले आहे फक्त गाग्याचेच का ? अमराठी प्रतिसादांची "ओंगळवाणी" फॅशण आहे मिपावर .. त्याबद्दल कोण काय कसं बोलत नाय ? आहो अमराठी प्रतिसादंच नाय .. तर अमराठी कार्टूण्स सुद्धा येतात ... =)) आहो बिरुटेसाहेब .. आपण तर न्यायाधिपती , समतोल आणि निर्पक्ष णिर्णयक्षमतेसाठी समस्त मराठी अंतरजालावर प्रसिद्ध असलेले , आपण असा व्यक्तिसापेक्ष णिर्णय घ्यावा ? छे ... आज मी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळीपट्टी दंडावर बांधणार ..निषेध म्हणुन ... बाकी गाग्या फुल्ल पेटलाय =)) लढ गाग्या लढ =)) - पंडित महामठ्ठ

In reply to by टारझन

बाकी गाग्या फुल्ल पेटलाय =)) लढ गाग्या लढ =))
हं बघू... लढवता येईल तितके लढवू नाहीतर बंद करून टाकू तिच्यायला... आहे काय आणि नाही काय? ;) धन्यवाद. =)) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

>>लढवता येईल तितके लढवू नाहीतर बंद करून टाकू तिच्यायला... आहे काय आणि नाही काय? =)) =)) =)) हे आवडले मात्र ! ------ ( लढाई बघुन पळणारा ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

गागा पेटलाय या नावावर सगळेच पेटले आहेत. =)) =)) =)) ओ पंगा, मज्यशि मयत रि कर्नर क? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ पंगा, मज्यशि मयत रि कर्नर क?
Feliz cumpleaños. यानी कि, जन्मदिन की बधाई हो| =)) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

बहुत पुराना खिलाडी है! ;) (भागलं का? हिंदीत लिव्हलंय!)

In reply to by धमाल मुलगा

আমার জনমদিন নয, বিপিনদার জনমদিন আছি। (माझा वाढदिवस नाही, बिपिनचा वाढदिवस आहे.) घ्या, आणखी एक भाषा বাংগ্লা! (डान्रावांची रा.को.) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्चा, इथला पंगांचा प्रतिसाद कुठे गेला? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

কোথায় গেল, কোথায় গেল... काऊने नेला! डिलीट बटणाचा नांगर फिरला! :( मोठ्या कष्टाने की हो जुळवला होता तो प्रतिसाद! बंगाली विसरल्याला वर्षे लोटली, तरी जुळवूनजुळवून, शब्दकोश बघून मोडक्यातोडक्या बंगालीत कसाबसा जमवला होता! आता मी काय करू? :''( हात रे काऊ! :T तर सांगायचा मुद्दा, आम्हाला बंगालीत चार वाक्ये धड लिहिता येत नाहीत. त्यातही पंधरा वेळा शब्दकोश बघावा लागतो. त्यामुळे त्या चार ओळींतसुद्धा आम्ही बंगाली शुद्धलेखनाला, व्याकरणाला आणि झालेच तर शब्दसंपदेला फाट्यावर मारतो. (पण तरीही कोणी चावी मारली तर लिहून बघतो.) - (बंगालीचा होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट (यावरून आठवले: 'गाढवाचा नांगर फिरणे'चा नेमका अर्थ कोणी सांगू शकेल काय? खात्रीलायक उत्तराची अपेक्षा आहे. उत्तर कोणीही दिले तरी चालेल - त्याकरिता मराठीचा प्राध्यापकच असणे भाग आहे असा आमचा आग्रह नाही. उत्तर मात्र खात्रीलायक पाहिजे. उत्तर देण्याकरिता स्वतः गाढव किंवा नांगर असण्याचीही पूर्वअट नाही.)

In reply to by पंगा

जाऊ द्या हो, तुमच्या नाडीत नाडलं जाणंच लिहीलं असणार! मी तुम्हाला एवढंच उत्तर देणार होते, मला (गमभन वापरूनच) बांग्ला लिहीता येतं, वाचता येत नाही! ;-)
डिलीट बटणाचा नांगर फिरला!
ठ्ठो ... अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तुम्हाला एवढंच उत्तर देणार होते, मला (गमभन वापरूनच) बांग्ला लिहीता येतं, वाचता येत नाही!
ठीकाय ठीकाय... आगामीबेलाय देबोनागरीर मोध्धे लेखार चेष्टा कोरबो... शुधु आपनार जोन्ने! ;) (च्यामारी बंगालीच्या रक्ताचे पाट वाहू लागले इथे...) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

तुमचा वाढदिवस नसला, बिपिनदांचा असला, म्हणून काय झाले? इथे तर कोणालाही कधीही "वाढदिवसाच्या शुभेच्छा" म्हणतात... ;) एवढे सांगण्यासाठी बंगाली प्रतिसाद कसाबसा जुळवला, तर त्यावर काकदृष्टी पडली. पडूदेत! (आता बंगालीतल्या सवालाला बंगालीत नाही उत्तर द्यायचे तर मग काय अहिराणीत द्यायचे की आगरी बोलीत? अहिराणीचे माहीत नाही, पण आगरी बोलीत लिहिलेले मिसळपावावर चालते हे आम्हास ठाऊक आहे. पण अहिराणी काय किंवा आगरी बोली काय, दोन्ही आम्हास येत नसल्यामुळे म्हटले, की बंगालीत उत्तर देऊन पहावे. पण जाऊदेत!) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

पण आगरी बोलीत लिहिलेले मिसळपावावर चालते हे आम्हास ठाऊक आहे. १ ) आगरी भाषेत लिहिलेले मिसळपाववर धावते. खोटं वाटत असल्यास ब्रिटिशचे धागे पहावेत. २ ) आगरी ही मराठी बोलीभाषा आहे. बाकी सर्वांना समान न्याय लावला जावा , या मताचा. -आपला आगरी भाषासमर्थक, नरेश. इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

उगाच कुणाशी कशाला पंगा घ्या म्हणोन मतदान केले नाही ;) इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

मी काहीही करू नये ला मत दिले आहे. इथला प्रत्येक सदस्य त्याची वृत्ती, प्रवृत्ती, स्वभावगुण, धर्म घेऊन येतो. प्रत्येकाचा प्रतिसाद मिपा समृद्ध करतो. मिसळ खाताना बेदाणा येणार, शेव येणार तसच खवट शेंगदाणाही येणार. तीच मिसळीची मजा फॉरेस्ट गम्प सिनेमातील सुंदर वाक्य - My momma always said, "Life was like a box of chocolates. You never know what you're gonna get." तसच हे मिपा सगळे एकजात एका माळेचे मणी झाले तर काय मजा राहीली? तेव्हा माझ्या मते पंगा हे देखील सन्माननीय सदस्य आहेत त्यांना राहू द्यावे, फुलू द्यावे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

सहमत आहे.
मिसळ खाताना बेदाणा येणार, शेव येणार तसच खवट शेंगदाणाही येणार.
पण एक सांगा, पंगा म्हणजे बेदाणा, शेव का खवट शेंगदाणा :) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

अमराठी प्रतिसाद उडवावेत. एकदा दोनदा संपादकांची लाल अक्षरे दिसली की गपगुमान मराठीत लिहितील. हाच न्याय एकदा/दोनदा/ तिनदा..../मलिदा/../... ह्यांना पण लावावा. जय महाराष्ट्र , जय मराठी !

काहीही करू नये. याला मत दिले आहे. "आपण काय खातो " ह्या लेखात तर मूळ लेखाला प्रतिसाद देण्यापेक्षा जास्त धागे भांडणाचे आहेत. मिसळी मध्ये बचकभर मिरची असेल तर नाकाडोळ्यातून गंगा जमुना नाही का वाहणार ........आणि हॉटेलात येणार्याचे स्वास्थ्य पण बिघडेल.... तेव्हा तलवारी थोड्याफार म्यानातही ठेवत चला ......! मीली

In reply to by मीली

पंडित गागाभट्ट!.... आपणच काही वर्षांपूर्वी "मित्र जयन्त" या नावाने इथे वावरत होता का? :-? सहज कुतुहल म्हणुन विचारले!... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

मलाही तसच वाट्टय. पंगाला झणझणीत मिसळ खायला द्या आनि नवभारत टाईम्सचा बोळा करुन तो पंगाच्या तोंडात कोंबा.गप्प राहिल मग तो.

'कुच बी करनेकी गरज नही हय' इस परयाय को मत दिया हय.

या आधुनिक गागाभट्टांकडून नीलकांत वा तात्यांचा राज्याभिषेक करुन घ्या, अन मग द्या पाठवून काशीत! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by तिमा

नाहीतर गागाभट्टांचाच मिसळाभिषेक करा. P = NP

हा गागा भट्ट आणि नितिन थत्ते एकच व्यक्ती असावा असा माझा कयास आहे. ;) भावश्या.

In reply to by मितभाषी

हा गागा भट्ट आणि नितिन थत्ते एकच व्यक्ती असावा असा माझा कयास आहे. ;)
नाही हो मायबाप! वाटल्यास मनाला येतील त्या शिव्या द्या, पण कृपा करून तेवढे नका म्हणू. प्लीज! पाया पडतो. :( - पंडित गागाभट्ट

च्याय ला गागाभट्टांचे खाते गोठवावे कि नाही याचे काथाकुट्ट काढणारे तुम्ही कोण टीकोजीराव...त्यासाठी संपादक/संस्थापक/मालक ( आणखी कोणी आहे का??) समर्थ आहे. त्यांना वाटेल तर ते गोठवेल ना ते खाते... आणि त्यांचा गुन्हा काय तर ते मराठी व्यतीरीक्त दुसर्या भाषेत प्रतीसाद देत आहे.. तर हे काय पहील्यांदाच मिपा वर घडत आहे का?? मग त्या त्या वेळी का बर अशे धागे नाही काढ्ण्यात आले??? खुलासा : मि गागाभट्ट नाही. ---(पार्शीलीटी चा तीव्र विरोधक) नि३.

In reply to by नि३

खुलासा : मि गागाभट्ट नाही. खुलाश्याबद्दल धन्यवाद :) --भरम७

.