✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
गुरुवार, 05/20/2010 - 14:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15063 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

उत्तम परिचय

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 05/20/2010 - 15:28 नवीन
"शनिवारी शिवणकाम करणं वाईट!" "आपण करून तर पाहू या काय होतं आहे ते!"
त्येंच्याक बी शनवारी शिवत नवती मान्स. वाचुन मौज वाटली प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सहज
गुरुवार, 05/20/2010 - 15:34 नवीन
प्रेरणादायी व्यक्तीमत्व.
  • Log in or register to post comments

लिझ आणि मेरी....!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 05/20/2010 - 15:41 नवीन
आपला हे अभ्यासपूर्ण लेखन वाचल्यानंतर मला जेम्स मिचेनरच्या एका लेखाची प्रकर्षाने आठवण झाली. त्या लेखाचे शीर्षकच त्याने दिले होते ~ "यू नेव्हर स्टॉप लर्निंग..." ~ किती योग्य आहे असे म्हणणे, विशेषतः असले लिखाण वाचल्यावर, हे पटते. "लिझ" च्या वाट्याला जे दुर्लक्ष आले ती तर नारी विश्वाची खंतच आहे. मेरी क्युरीची तर अशीच अवस्था होती ना? दोन वेळा "नोबेल" पारितोषिक विजेतीलादेखील सुरुवातीची वर्षे "दाई"चे काम करावे लागले होते, तर ट्युशन फी भरण्याची ऐपत नाही म्हणून कॉलेज प्रवेश नाही, तर पुढे थोडे पैसे जमा केले तर विद्यापीठाने "स्त्री" म्हणून प्रवेश नाकारला. असो. एका फार चांगल्या आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आपले अभिनंदन..! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

जागतीक दर्जाची संशोधक अन सामाजिक मानसिकता

वाहीदा
गुरुवार, 05/20/2010 - 15:54 नवीन
लेख आवडला युद्धानंतर ऑटोने आपले स्थान जपण्यासाठी लिझचा उल्लेख टाळला फ्रिट्झ स्ट्रासमनच्या म्हणण्यानुसार लिझ जन्माने ज्यू असूनही पुरूष असती तर ऑटो हानला तिचं श्रेय नाकारणं शक्यच झालं नसतं तिच्या बध्द्ल मी वाचलेला किस्सा लिझ माईट्नर, ही हिटलरच्या राज्यात जागतिक दर्जाची संशोधक होती. पण तिच्याच कार्यालयातील लोक तिच्याबरोबर चालत जात असलेल्या तिच्या हाताखालील दुय्यम सहकार्‍यांना 'गुड मॉर्निंग' सारखे अभिवादन त्यांच्या भाषेत करीत. परंतु तिच्याकडे पाहात देखील नसत. एकास्त्रीला बॉस म्हणून त्याकाळी पुरुष सहन करु शकत नसत . आजही इतक्या वर्षांची मानसिकता काहीकाही ठिकाणी कायम आहे, ती बदलणें सोपें नाहीं. आताशीं कोठें हें सत्य समाज पचवायला लागला आहे. अवांतर : शनिवारी शिवणकाम करणं वाईट!" अरेच्चा, त्यांच्याकडेही असंच विचार करतात का ? 8} ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 05/20/2010 - 15:57 नवीन
लिझची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या काळात कामापुढे पैशाला कमी महत्व देणारे असे किती लोक असतील?
  • Log in or register to post comments

छान

समंजस
गुरुवार, 05/20/2010 - 16:18 नवीन
छान लेख लिहीलाय अदितै :) तुमची ही लेखमाला बरीच उपयुक्त ठरतेय कर्तुत्ववान स्त्रियांबद्दल माहिती मिळायला!!!
  • Log in or register to post comments

अदिती,

मस्त कलंदर
गुरुवार, 05/20/2010 - 16:19 नवीन
अदिती, नव्या व्यक्तिमत्वाची ओळख आवडली यात शंकाच नाही.. अशा लोकांबद्दल वाचले, की स्वतःच्या खुजेपणाची जाणीव खूप प्रकर्षाने होते. पुस्तक लवकरच वाचेन गं मी... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

नाकर्त्याचा वार शनिवार

चिंतातुर जंतू
गुरुवार, 05/20/2010 - 17:20 नवीन
"शनिवारी शिवणकाम करणं वाईट!"
शनिवार हा ज्यू धर्मी लोकांचा साप्ताहिक सुटीचा दिवस असतो. ज्यू धर्मीयांना त्या दिवशी अनेक गोष्टी प्रतिबंधित असतात. जिथं या धर्माचा उगम झाला, त्याच भूभागात जन्मलेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांतले काही लोकही हे पाळतात. इतकंच नाही, तर आपल्याकडच्या 'नाकर्त्याचा वार शनिवार' या परंपरेमागेही अनेक शतकांपूर्वी पश्चिम किनार्‍यावर येऊन राहिलेले ज्यू धर्मी लोकच आहेत, असाही एक प्रवाद ऐकण्यात आहे. कोकणापुरतं सांगायचं तर त्यात तथ्य असायला नक्कीच जागा आहे. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

अशी

ऋषिकेश
गुरुवार, 05/20/2010 - 17:30 नवीन
अशी व्यक्तीमत्त्वं प्रेरणादायक तर असतातच पण त्यांना मिळालेली वागणूक बघुन एकीकडे माणूस म्हणून वाईट वाटते तर दुसरीकडे काहि बाबतीत अजूनही हा भेद समाजात दिसतो त्यामुळे खजीलही करते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

फासिझमचे दूरगामी परिणाम

चिंतातुर जंतू
गुरुवार, 05/20/2010 - 17:40 नवीन
उघड उघड स्त्री द्वेष्टे असणारे लोक इथे कमी असतील, अशी आशा आहे; मात्र, खंडीभर मराठी माणसांत हिटलरला प्रेरणास्थानी मानणारे किमान मूठभर लोक तर नक्कीच आढळतात, असा अनुभव आहे. हिटलरपासून प्रेरणा घेतलेले अनेक राजकीय नेते आजही विशिष्ट जाती-धर्म-भूभागातले लोक 'इथे' नकोतच, असं म्हणत आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात, आणि त्यांना सुशिक्षित मराठी माणूस आपल्या हृदयाचे सम्राटही बनवताना दिसतो. ज्यू द्वेषाला खतपाणी घालून हिटलरच्या जर्मनीनं किती प्रतिभावंतांना गमावलं, याची जाणीव पुन्हा एकदा करून देणारी ली़ज़ माईट्नरची कहाणी अशांसाठीही बोधक ठरू शकेल. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

अदिती..

स्वाती दिनेश
गुरुवार, 05/20/2010 - 17:41 नवीन
लेख उत्तमच आहे, ओळख आवडली.स्फूर्तीदायक! (जाता जाता- वीणा गवाणकरांनी आयडा स्कडर वरही लिहिलेले पुस्तक असेच प्रेरणादायी आहे.) स्वाती
  • Log in or register to post comments

उत्तम ओळख!

बहुगुणी
गुरुवार, 05/20/2010 - 17:52 नवीन
धन्यवाद, अदिती. या आधीच्या प्रत्येक लेखाचा दुवा पुढच्या लेखात सुरूवातीला असला तर बरं होईल, म्हणजे वाचायचे राहून गेलेले लेख शोधत बसायला लागणार नाही.
  • Log in or register to post comments

छान हा छान...!!

डावखुरा
Fri, 05/21/2010 - 01:43 नवीन
उत्तम व्यक्तिमत्वाची उत्तम शब्दांत ओळख करुन दिल्याबद्दल धन्यु.. आणि पुलेशु. बहुगुणी यांच्या सुचनेला दुजोरा.... ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अदिती व्यतिरिक्त इतर लेखकांनी लिहिलेले याविषयीचे लेख..

बहुगुणी
Fri, 05/21/2010 - 17:32 नवीन
Just for the sake of completeness: अदिती व्यतिरिक्त इतर लेखकांनी लिहिलेले याविषयीचे लेख खालील दुव्यांवर आढळतातः स्त्रीची आजची प्रतिमा -भाग २ - राजेश घासकडवी स्त्रीची आजची प्रतिमा - भाग ३ - बिपीन कार्यकर्ते आजची स्त्रीची प्रतिमा - भाग ३ गार्गी - हृषीकेश (हाच लेख मिपावरही वाचला होता, त्याचा दुवा सापडला नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

मस्त ग. ओळख

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/20/2010 - 18:06 नवीन
मस्त ग. ओळख आवडली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

उत्तम ओळख

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 05/20/2010 - 18:13 नवीन
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची उत्तम ओळख.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/20/2010 - 18:50 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 05/20/2010 - 23:24 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

+२

अस्मी
Fri, 05/21/2010 - 10:33 नवीन
असेच म्हणते....अतिशय सुंदर लेख :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ *~*~*~*~*~*~* - अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

माहितीपूर्ण लेख

चित्रा
गुरुवार, 05/20/2010 - 18:15 नवीन
लेख आवडला. कितीही बुद्धिमान शास्त्रज्ञ झाले तरी त्यांनाही निर्णय घेताना चलबिचल, आणि कधीकधी चुकाही होत असतात, असे दिसते. लिझ यांना नोबेल मिळाले नाही, याबद्दल विकीपीडियावर असे वाचले - A 1997 Physics Today study concluded that Meitner's omission was "a rare instance in which personal negative opinions apparently led to the exclusion of a deserving scientist" from the Nobel.
  • Log in or register to post comments

अदिती,

अरुंधती
गुरुवार, 05/20/2010 - 18:44 नवीन
अदिती, उत्तम व माहितीपूर्ण लेख! एवढ्या हालांमध्ये दिवस काढून आपल्या ध्येयाप्रती, अभ्यासाप्रती इतके प्रामाणिकपण व तळमळ..... केवळ अप्रतिम व स्फूर्तीदायी! धन्यवाद एवढ्या गाढ्या संशोधिकेची ओळख करून दिल्याबद्दल! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान ओळख!

स्वाती२
गुरुवार, 05/20/2010 - 18:46 नवीन
छान ओळख!
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सुवर्णमयी
गुरुवार, 05/20/2010 - 18:55 नवीन
लेख आवडला. सुरेख ओळख करून दिली आहेस सोनाली
  • Log in or register to post comments

लेख

मदनबाण
गुरुवार, 05/20/2010 - 21:23 नवीन
लेख आवडला... मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments

छान लेख

मिहिर
गुरुवार, 05/20/2010 - 22:30 नवीन
छान झालाय लेख. वाचले आहे ते पुस्तक. मस्तच आहे. अवांतर: हे पुस्तक वाचल्यावर मी वर्गातल्या मुलांना nuclear fission चा शोध कोणी लावला ते विचारत असे. त्यांनी पुस्तकात दिलेले ऑटो हान व स्ट्रासमन सांगितले की मी त्यांना माइटनरबद्दल सांगे व लक्षात ठेवण्यास सांगे.
  • Log in or register to post comments

मालिका

श्रावण मोडक
गुरुवार, 05/20/2010 - 22:33 नवीन
मालिका वाचतो आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

छान ओळख!

Nile
गुरुवार, 05/20/2010 - 23:14 नवीन
छान ओळख! लिझवर निघालेली डीक्युमेंटरी The Path to Nuclear Fission: The Story of Lise Meitner and Otto Hahn मी पाहिली आहे, तिचा सुरुवातीचा काळ, हान बरोबरचे काम, रॉबर्ट बरोबरचे संवाद वगैरे गोष्टी छान चित्रीत केल्या आहेत. मिळाल्यास जरुर पहा. त्या डॉक्युचा ट्रेलर येथे पाहता येईल. -Nile
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

अनामिक
गुरुवार, 05/20/2010 - 23:05 नवीन
लेख आवडला. धन्यवाद अदिती. -अनामिक
  • Log in or register to post comments

खुपच

शिल्पा ब
गुरुवार, 05/20/2010 - 23:39 नवीन
खुपच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाविषयी लेख लिहिल्यबद्द्ल आभारी आहे.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Fri, 05/21/2010 - 05:07 नवीन
लेख.
त्याच्या दर आठवड्याला असणार्‍या व्याख्यानांना उपस्थित रहाण्याची स्त्रियांना अनुमती नव्हती. पण लिझच्या बौद्धिक क्षमतेपुढे नमून प्लँकने त्याचा निर्णय बदलला
-- यावरून कमलाबाई सोहोनींनी सर सी. व्ही. रामन यांना त्यांचा 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मध्ये स्त्रियांना प्रवेश न देण्याचा निर्णय बदलायला लावला होता, त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेख खूप

शुचि
Fri, 05/21/2010 - 05:17 नवीन
लेख खूप आवडला आदिती. प्रेरणा घेऊन थोडं वाचलं ते लिहीते - ६ जानेवरी १९३९ या दिवशी ऑतो हान आणि लिझ माईट्नर यांच्या नीरीक्षणात पुढील गोष्ट आली ती अशी की न्यूट्रॉन्स चा मारा युरेनियम वर केला असता , युरेनियमचा अणू जवळ जवळ अर्धा झाला. त्यांची खात्री पटली की २ अधिक हलक्या गोष्टी जन्मास आल्या असाव्या. पण त्यातही सर्वात धक्कादयक गोष्ट ही होती की - त्यांच्या ऑसिलोस्कोपवर 200,000,000 इतक्या व्होल्ट्स ची नोंद झाली. ऑटो हन चे लक्ष पूर्ण रासायनिक प्रक्रियेतच गुंतले गेले आणि ही उर्जानिर्मीती ची अतिशय महत्त्वाची नोंद त्याने गंभीरतेने घेतली नाही. परंतु लिझ माईट्नर ला कळून चुललं होतं की ही महत्त्वाची/ जग ढवळून काढणारी, अणूजगतील घटना आहे. तिने यावर विचार केला आणि स्पष्टीकरण शोधून पाठ्पुरावा केला. हे तिचे भरीव योगदान. हेच इथे वाचता येइल - http://www.3rd1000.com/nuclear/cruc18.htm सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

भारी आहे!

Pain
Fri, 05/21/2010 - 08:48 नवीन
भारी आहे!
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख

गुंडोपंत
Fri, 05/21/2010 - 09:41 नवीन
सुंदरच लिखाण आहे. एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबदल धन्यवाद. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विजुभाऊ
Fri, 05/21/2010 - 12:56 नवीन
धन्यवाद एका चांगल्या पुस्तकाची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून दिलीस. पुनश्च अतोनात धन्यवाद Image removed.
  • Log in or register to post comments

आभार

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/21/2010 - 19:17 नवीन
प्रतिक्रियांबद्दल आभार! या लेखाच्या प्रशंसेला वीणा गवाणकर पात्र आहेत, मी नाही. या मालिकेच्या निमित्ताने 'लीझ माईट्नर' या पुस्तकाची ओळख करून द्यायची असं आधीच ठरवलं होतं. इन्द्रराज: शिक्षण पूर्ण होऊन गुणवत्ता सिद्ध करण्याआधी अनेकांना वेगवेगळी कामं करावी लागतात. सध्या सुस्थितीत असणार्‍या माझ्या एका खगोलशास्त्रज्ञ मित्राने (जो आता वयाची तिशी गाठायच्या आतच त्याच्या क्षेत्रात बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.) कॉलेजात शिकत असताना "गार्डन सेंटर"मधे हमालीची नोकरी केलेली आहे. पण फक्त स्त्री आहे म्हणून संधी नाकारणं या गोष्टीचा त्रास होतो आणि आजही तो अनेकींना कायमस्वरूपी नोकरी मिळवताना सहन करावा लागतो. शुचि: मान सीगबान हा स्वतः नोबल लॉरियट, नोबेल कमिटीत होता आणि त्यानेच लीझच्या नावाला विरोध केल्याचे उल्लेख वीणा गवाणकरांच्या पुस्तकात आहेत. ऑटो हानला स्वतःला नोबेल मिळाल्यावर त्यालाही नावं सुचवता येऊ लागली, पण त्यानेही कधी लीझचं नाव सुचवलं नाही. बेरियम आणि क्रिप्टॉनचे अणू तयार होतात हे हान-स्ट्रासमन यांनी शोधलं पण ही जी प्रचंड ऊर्जा निर्माण होते, त्याचा संबंध सुप्रसिद्ध E=mc2 हे लीझच्या लक्षात आलं. पण हलकी मूलद्रव्य तयार होण्याची कल्पना १९३०च्या शतकात आयडा नोडॅक या संशोधिकेने मांडली होती, पण तिने पुढचे प्रयोग/समीकरणं सादर न केल्यामुळे तिला या शोधाचं क्रेडीट दिलं जात नाही. थोडं अवांतरः भारतातील वैज्ञानिक स्त्रियांसाठी बंगालुरूच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्सेसच्या रोहिणी गोडबोले Women in Science ही संस्था चालवतात. त्यांनीच Leelavati's daughters नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. अदिती
  • Log in or register to post comments

छान लेख...

राजेश घासकडवी
Fri, 05/21/2010 - 20:40 नवीन
कर्तृत्ववान पण अज्ञात वैज्ञानिक स्त्रीची चांगली ओळख. त्या काळासाठी तिच्या कपाळी स्त्री असणं आणि नाझी जर्मनीत ज्यू असणं अशा दुहेरी दुर्दैवाचे पट्टे ओढले होते. त्यातला दुसरा ती पुसू शकली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा