शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप

गणपा's picture
गणपा in पाककृती
6 Dec 2009 - 7:29 pm

नमस्कार मंडळी,
इंडो-चायनिज् च्या पहिल्या भागात आपलं सहर्ष स्वागत.
गेल्या बुधवारी संतोषने झक्कास व्हेज रोल आणि त्या जीवघेण्या शेझवान सॉस चा फोटो टाकला तेव्हा पासुन आमच्या जीभेचा वाहणारा नळ काही बंद होईना.
काही तरी बनवुन कोंबल्या शिवाय तो बंद होणार नाही ते आम्ही तेव्हाच ताडले.
तर आजचा मेन्यु बच्चे कंपनीच लाडक चिकन-लॉलीपॉप. (आम्हीही अजुन ल्हानच आहोत ;) )
आजकाल बाजारात रेडीमेड लॉलीपॉप्स मिळतात. पण आपल्या कडे अजुन सर्वत्र मिळतीलच अस नाही.
त्यामुळे तुम्हाला चिकन्-विंग्जस् पासुन लॉलीपॉप कसे बनावायचे ते पण सांगतो.

साहित्यः
चिकन विंग्जस् . एका विंगचे दोन लॉलीपॉप होतात.

१ चमचा आल-लसुण भरड वाटलेल.
१ चमचा काळा सोयासॉस.
१ चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
१ वाटी मैदा.
१ चमचा कॉन फ्लॉवर.
२ चमचे बेसन.
१ चमचा लाल तिखट.
तंदुरीचा रंग. (ऑपशनल)

कृती:

चिकन विंगच्या सांध्यात सुरीने कापुन एका विंगचे दोन तुकडे करा.

चित्रात दाखवल्या प्रमाणे विंगच्या टोलाका सुरीने हाडा भोवती गोल चरा द्या.
मग अंगातुन टी-शर्ट काढावा त्या प्रमाणे हाडाच्या चरा दिलेल्या टोकाला पकडुन मांस (इन साईड आउट) खाली खेचा.
विंगच्या खांद्याकडील भागाला एकच हाड असत. तर खालच्या भागात दोन हाड असतात.
तसच वरच्या भागात मांस जास्त असत तर खालच्या भागात कमी.
खालच्या भागाच लॉलीपॉप बनवताना दोघा पैकी एक हाड काढुन टाकाव.

सगळे लॉलीपॉप तयार झाल्यावर त्यांना मीठ, आल-लसुण, कळीमिरी पुड, सोयासॉस लावुन १५-२० मिनिटे मुरत ठेवाव.

एका भांड्यात मैदा, बेसन, कॉन फ्लॉवर, मीठ, लाल तिखट नीट एकत्र करुन घ्याव.
थोड थोड पाणी टाकत भजी सारख घट्ट पीठ तयार कराव. (भजी पेक्षा किंचीत जाडं)
रंग टाकायचा झाल्यस पाणी टाकल्यावर घालावा.

कढईत तेल तापवुन घ्याव.
एक एक लॉलीपॉप त्या पीठात घोळवुन खरपुस तळुन घ्यावे.

लहान मुलांना सॉस सोबत नी त्यांच्या बाबाला थंडगार बियर सोबत सर्व्ह करा. (आईने पण घेण्यास आमची ना नाही ) ;)

***************************
संतोषने शेझवान सॉस ची रेसिपी दिली आहेच....
मी थोड्या वेगळ्या पद्धतीने हा सॉस बनवतो.
खाली सौरभने विचरणा केली आहे म्हणुन इथेच देतो.

शेझवान सॉस.

सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.

५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.

कृती:

दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.

गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.

एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.

मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.

पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

6 Dec 2009 - 7:52 pm | स्वाती२

=P~ =P~ =P~ =P~
बाबाने चिकन विंग्जचे लॉलीपॉप करुन दिले तरच बाबाला बिअर!

घाटावरचे भट's picture

6 Dec 2009 - 7:55 pm | घाटावरचे भट

आईल्ला... भारीच!

देवदत्त's picture

6 Dec 2009 - 8:07 pm | देवदत्त

वा... छान...
माझा आवडता पदार्थ. कृती दिल्याबद्दल धन्यवाद :)

बट्ट्याबोळ's picture

6 Dec 2009 - 8:47 pm | बट्ट्याबोळ

आयला गणपा पेटलाय !! कसल्या पाक्रु टाकतो !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Dec 2009 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा काय चाल्लंय रे !

-दिलीप बिरुटे
[कंटकी,लॉलीपॉकचा चाहता]

टारझन's picture

6 Dec 2009 - 9:03 pm | टारझन

बासंच !!!

(पुन्हा एकदा सामिष आहाराकडे वळण्याच्या बेतात असलेला)चतुरंग

संदीप चित्रे's picture

6 Dec 2009 - 10:46 pm | संदीप चित्रे

असेच म्हणतो !!

भानस's picture

6 Dec 2009 - 11:27 pm | भानस

मी तर खात नाही बा...पण लेक येईल आता सुटीला. तुझ्या रेशिपीने बापलेकाला खिलवते आणि क्रेडीट घेते.:P ( खरे तुलाच पण शेवटी करावे मला लागेल ना...हेहे )

निमीत्त मात्र's picture

7 Dec 2009 - 12:35 am | निमीत्त मात्र

गणपा, रंग अंमळ जास्तच पडला आहे ह्यावेळेला.

गणपा's picture

7 Dec 2009 - 1:51 am | गणपा

खरयं. सुक्या पिठात रंग घातला होता त्यमुळे अंदाज आला नाही.
पाणी टाकताच एकदम भडक रंग झाला. :)

-माझी खादाडी.

प्रभो's picture

7 Dec 2009 - 1:55 am | प्रभो

मस्त रे गणप्या, साला आता तू परत महिनाभर आम्हाला जळवणार इंडो-चायनिज मालिका टाकून ह्या विचारानेच डोळे पाणावले....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सौरभ.बोंगाळे's picture

7 Dec 2009 - 1:37 am | सौरभ.बोंगाळे

अप्रतिम, उत्कृष्ट पाककृती आहे... धन्यवाद... पुढला विकएंड झक्कास जाणार :) :) :)

सौरभ.बोंगाळे's picture

7 Dec 2009 - 1:42 am | सौरभ.बोंगाळे

अरे गणप्या, आपल्याकडे मिळणार्‍या देसी शेजवान सॉस बनवण्याची पद्धती माहीती असेल तर ते पण सांग...

सौरभ.बोंगाळे's picture

7 Dec 2009 - 2:19 am | सौरभ.बोंगाळे

बंधो... धन्य जाहलो... लगोलग टाकलेल्या प्रतिक्रियेसाठी आभार...

धनंजय's picture

7 Dec 2009 - 2:20 am | धनंजय

मला चिकन फारसे आवडत नाही, पण सॉसची पाकृ छानच आहे.
आणि चिकनही दिसायला मोहक. (लॉलीपॉपला रंग थोडा जास्तच गडद असला तरी छानच दिसतो आहे.)

जरा देखिल उसंत घेवु देत नाही. लगेच नवी पाकृ तयार असते ह्याची. =))

काही पण असुदे गणपा शेठ खरोखर भाग्यवान आहे. जीभेचे सगळे लाड एकदम झक्कास पुरवतो,अगदी व्यवस्थित.
लॉलीपॉप एकदम मस्त जमले आहेत.

वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Dec 2009 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्यासारखे काही लोकं खाण्यावर गफ्फा हाणतात आणि दुसरे गणपासारखे लोकं बनवून खायला घालतात! गणपा, अजून काही दिवसांनी सुगरण आहे याऐवजी लोकं 'गणपाची स्टाईल मारतोय' म्हणाले तरी आश्चर्य वाटणार नाही.
आता प्रतिक्रिया अवांतर वाटू नये म्हणून: शाकाहारी असल्यामुळे काय बोलणार? तरीही काही टिप्स मिळतील म्हणून धागा उघडलाच!

अदिती

jaypal's picture

7 Dec 2009 - 10:56 am | jaypal

पयले नमन करीतो वंदन
पामराला चरणी आसरा द्या मालक

आशिष सुर्वे's picture

7 Dec 2009 - 12:32 pm | आशिष सुर्वे

गणपा राव्व..
आम्ही 'चिकन', 'मटन' खात नाही तरीही ही पाककृती काळजाचा वेध घेऊन घेली रे!

एक विनंती आहे.. तुझ्या खजिन्यात 'अंड्या'च्या काही पाककृती असतील तर्र इथे दे ना..

-
कोकणी फणस

दिपक's picture

7 Dec 2009 - 12:32 pm | दिपक

काय बोलायचं आता..

sneharani's picture

7 Dec 2009 - 3:01 pm | sneharani

मस्तच पाककृती... आवडली!

स्वाती२'s picture

7 Dec 2009 - 6:30 pm | स्वाती२

जबरा शेझवान सॉस!

स्वातीदेव's picture

7 Dec 2009 - 10:51 pm | स्वातीदेव

रेसीपी बद्द्ल थँक्यू. खरच महान. आता बघायला पाहिजे करायला जमतीये का ते.
तो लॉलीपॉप करण्याचा भाग जरा अवघड वाटतोय. बघते तरी प्रयत्न करुन.
काही प्रश्ण
१. नुसत्या विंग्ज अशा मिळतात का?
२. सोया सॉस व चिली सॉस कुठल्या कंपनीचा घ्यावा. इथे दुकानात गेल्यावर प्रचंड व्हरायटी दिसते. त्यामुळे गोंधळ उडतो.

आणि प्लीज अशा टिपीकल ईंडो चायनीज रेसिपीज देत रहा. :-)

वर्षा's picture

9 Dec 2009 - 11:46 pm | वर्षा

>>सोया सॉस व चिली सॉस कुठल्या कंपनीचा घ्यावा. इथे दुकानात गेल्यावर प्रचंड व्हरायटी दिसते. त्यामुळे गोंधळ उडतो.
अगदी! मलाही हाच प्रश्न पडला आहे. मध्यंतरी मी less sodium असलेला Kikkoman ब्रँडचा सोया सॉस आणला पण त्याला भयंकर विचित्र वास होता. :(

श्रीयुत संतोष जोशी's picture

9 Dec 2009 - 8:01 am | श्रीयुत संतोष जोशी

च्या मारी गणपाशेठ १ पेक्षा वरचा नं देता येत नाही म्हणून. तुम्हाला वरचा " सा "

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

शक्तिमान's picture

9 Dec 2009 - 11:16 am | शक्तिमान

तोंड को पाणी सुट्या!

निल्या१'s picture

18 May 2010 - 8:01 am | निल्या१

ट्रकवर "आई तुझा आशीर्वाद" जसं लिहितात तसंच ह्या प्लेटवर "गणपा तुझा आशीर्वाद" असं लिहावं वाटत आहे ! गणपाभौ जिंदाबाद !

शेजवान सॉस बनवायला वेळ नाही मिळाला.शेजवान म्होरच्या टायमाला!

जयवी's picture

7 Dec 2012 - 11:25 am | जयवी

ओहो....... इथे आधीच रेसीपी होती तर...... धन्यु गणपा :)

ही पाकृ चिकन्/मटन न घालता कशी करता येइल ?
गवताळ प्राण्यांवर दया करा.

आनंदी गोपाळ's picture

7 Dec 2012 - 11:05 pm | आनंदी गोपाळ

ऑम्निव्होरस म्हटलेत तरी चालेल.
पण, चिकन लेग्स ऐवजी फ्लॉवर्/फुलकोबी वापरलात तर छान चव येते. तंदूर मसाला अन आंबट दह्यात फ्लॉवर मॅरिनेट करून घ्या, अन बाकी पाकृ गणपाभौंसारखी करा. कशी लागली ते कळवा :)

लॉलीपॉप पाहून जिव खल्लास झाला... गणपा दादा

इरसाल's picture

7 Dec 2012 - 1:19 pm | इरसाल

मांसाहारी पदार्थाच्या धाग्यावर आमची प्रतिक्रिया नसणे हा आम्ही आमचा घोर अपमान समजतो.
मित्रा आवर्‍या तंगर्‍या कुठुनशिनी मिलाल्या तुला बोल्तो मी ? इथ्थ दोनचं तंगर्‍यात "खपल्या" बोल्तो तो !

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 6:14 pm | कपिलमुनी

येत्या विकांताला गुरुवर्य गणपाभौंना स्मरून ही पाकृ !