मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जावा तिकडे

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
जावा तिकडे उं.. जावा तिकडे मी नाही येत, तुम्ही ना गडे सोडा मला आता, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||धृ|| शौकिन तुम्ही हे आसलं, नाही म्हणत नाही कधी हौस जीवाची करता, सोडत नाही एकही संधी अंहं... हात नका धरू, होवू नका सुरू, जावा तिकडे || सोडा मला आता, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||१|| परवा तुम्ही आणली साडी, त्यासाठी करावी लागली लाडीगोडी आजच नेसूनी दाखवते तुम्हां, कोर्‍या साडीची मोडूनी घडी दिसते कशी सांगा तुम्ही येते मी तुमच्या पुढे || आतातरी सोडा मला, जवळ कशाला ओढता तुम्ही गडे ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/०५/२०१०

वाचने 1999 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मदनबाण 18/05/2010 - 00:13
दफोराव अंमळ पेटलेले दिसतायतं... ;) कविता आवडली... मदनबाण..... “control oil and you control nations; control food and you control the people”. Henry Kissinger

टारझन 18/05/2010 - 00:48
कांद्याची चटणी होती काय आज आहारात ? अंमळ त्यातही वरुन कांदा घातलेला दिसतोय ;) - (डॉटनेट इकडे) कांदाराम लसणे

विकास 18/05/2010 - 00:50
अशा काव्याने, "पत्थर के सनम" असलेल्याचा देखील "पाषाणभेद" होऊ शकेल ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शुचि 18/05/2010 - 00:59
लई भारी :) एक भयानक कोटी करण्याचा मोह होतोय .... जाऊ दे . सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

पाषाणभेद 18/05/2010 - 01:25
शु..शु.. जावा तिकडे नका कोटी सांगू इथे तुम्ही गडे दुसर्‍यांच्याही कल्पनाशक्तीला वाव त्यामुळे मिळेल गडे ---------------------------------- अय्या गडे, ईश्श गडे The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

अरुण मनोहर 18/05/2010 - 01:41
झकास लावणी. पण म्युजीक कुठे आहे राव? म्युट् का बरं केलेय ?