मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सजा

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
उदासी नसे, मौन हे बोलते खुशाली विचारी मला रोज ते! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना, कसे पुण्य अन् पाप ते कोणते? पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

वाचने 3123 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by बेसनलाडू

शुचि Sun, 05/16/2010 - 20:10
हा हा पादचारी बेला (संदर्भ ३ रे कडवे) :) कविता छान आहे क्रांती पण करुण :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair Sun, 05/16/2010 - 18:56
माझं ज्ञान जरा तोकडं आहे म्हणून विचारतो कि हा चित्रगुप्त कोण? बाकी सर्व छान आहे

मेघवेडा Sun, 05/16/2010 - 19:55
सुरेख! थंडगार वार्‍याची झुळूकच जशी! मस्तच!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

प्राजु Sun, 05/16/2010 - 21:11
व्वा!! क्या बात है! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! हे खास! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

राघव Sun, 05/16/2010 - 23:46
ह्या दोन्ही द्विपदी विशेष आवडल्यात. शेवटही सुंदर. :) श्रावणदांच्या "झुळुकेशी" सहमत!! क्या बात है, श्रावणदा सुद्धा काव्यात्मक बोलायला लागलेत! ;) राघव

मनीषा Mon, 05/17/2010 - 09:32
पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते! वा!!! सुरेख...