Skip to main content

सजा

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 16/05/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
उदासी नसे, मौन हे बोलते खुशाली विचारी मला रोज ते! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना, कसे पुण्य अन् पाप ते कोणते? पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!
लेखनविषय:

वाचने 3126
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by बेसनलाडू

हा हा पादचारी बेला (संदर्भ ३ रे कडवे) :) कविता छान आहे क्रांती पण करुण :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दुसरे कडवे आवडले . .

सुंदर... :) मदनबाण..... "Life is an art of drawing without an eraser." John Gardner

सुरेख........:) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

माझं ज्ञान जरा तोकडं आहे म्हणून विचारतो कि हा चित्रगुप्त कोण? बाकी सर्व छान आहे

सुरेख! थंडगार वार्‍याची झुळूकच जशी! मस्तच!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

व्वा!! क्या बात है! दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते धरेला नकोशी असे काय मी? खचे ती, जिथे पाय मी रोवते! हे खास! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

ह्या दोन्ही द्विपदी विशेष आवडल्यात. शेवटही सुंदर. :) श्रावणदांच्या "झुळुकेशी" सहमत!! क्या बात है, श्रावणदा सुद्धा काव्यात्मक बोलायला लागलेत! ;) राघव

दिले सोडुनी मी मनाला, जसे प्रवाहात कोणी दिवे सोडते स्सही..! काय सुंदर कल्पना आहे. =D> -दिलीप बिरुटे

आपल्या कविता मला आवडतात...

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी, न केल्या गुन्ह्याची सजा भोगते! वा!!! सुरेख...