Skip to main content

ती चिडली तेव्हा भीषण

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 15/05/2010 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता
लेखनविषय:

वाचने 2162
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सॉलीड! हे अनुभवाचे बोल असावेत का? :? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

=)) =)) =)) स्सह्ही !!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

:B मागच्या कवितेचा (दुश)परिणाम दिसतोय . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.