ती चिडली तेव्हा भीषण
ती चिडली तेव्हा भीषण, भांड्यांचा निनाद होता
वेगात फ़िरवले लाटणे, तो नवरा चुकवित होता
तरी घावही त्याच्या भाळी, येऊन थबकले होते
टरटरून जणु फुगलेला, फ़ुग्गा मग दिसला होता
ती बाई होती म्हणुनी, घळघळुनी उलटी रडली
त्या वेळी गप्प बसोनी, तो टेंगुळ दाबित होता
अन क्षणात गमले त्याला, संपली जेवणे त्याची
पोळीवर धुरकट जेव्हा, आंबील घास तो घेता
हे अन्न असे चिवडुनी , तो मुळी बिथरला नाही
खपलीत टेंगुळाच्याही, स्वातंत्र्य चौघडा होता
लेखनविषय:
याद्या
2149
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
मस्तच!
+१
In reply to मस्तच! by विकास
जे न देखे
लाजबाब ! ! !
झकास्स्स...
आवडली सवतच
आयला!
हाऊ फणि
मागच्या
'ग्रेस' हैराण
भारी विडंबन