Skip to main content

अबोल प्रीत

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 15/05/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती! मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती! रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती! अधरांच्या उंबर्‍यात नाव तुझे का अडते? अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते? लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2335
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुरेख कविता !!! अधरांच्या उंबर्‍यात नाव तुझे का अडते? अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते? लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती! हे विशेष आवडले...

लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती! जबरदस्त!!

अत्यंत सुरेल कविता! :) बर्‍याच दिवसांनी?? राघव

रंगले लयीत गोड, सुमधुर हे काव्य किती नि:शब्द प्रीतीचे छेडुनी निनाद किती...

कविता आवडली.

रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती! क्या बात है !! :) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती >>> शॉलिट्ट्ट्ट... :) मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss

'अधरांच्या उंबरात' हे एकदम ताजे वाटले म्हणून विशेष आवडले