नांदी
विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून
काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी
(सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी)
काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी
बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी
काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी'
पाठमोर्या आकृतीला पाहुनि उद्गारले
'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी
काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे
मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी
हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले
कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी
पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती
पादुकांवर चालवूया राज्य हे भरतापरी
यमन गाती भाट येथे अजुनि उंच गर्जुनि
सूर मात्र आर्त येतो पिचलेल्या मडक्यापरी
भग्न वाडा, खांब कलला, धूर कडूसर धुमसतो
बाह्यरुपी भूल कैसी, 'जनुके' कैसी अंतरी
थांब 'केशा',जाशी कोठे , ठेव जोडे बाजुला
ऐकुनि जा वगाआधी, नांदी ही अर्धी तरी
लेखनविषय:
याद्या
2426
प्रतिक्रिया
8
काव्यरस
मिसळपाव
लै भारी ! !
वा!!! एकदम
समयोचित!
खी खी खी
बांडगुळ हा
In reply to खी खी खी by सहज
सहज भौ
नाट्य
वा. लाजवाब.