|
घटक :
तांदूळ १ कप
तूरडाळ १ कप
बटाटा १
कांदा १
लसूण ३ पाकळ्या
तिखट २ टीस्पून
गरम मसाला दीड टी स्पून
मीठ
हिरवी मिरची १
कढीपत्ता ७-८ पाने
फोडणीसाठी :
तेल २ टेबलस्पून
मोहरी १ टीस्पून
जिरे १ टीस्पून
हिंग १ चिमट
हळद अर्धा टीस्पून
तयारी :
तांदूळ व तूरडाळ किमान अर्धा ते पाऊण तास भिजवून ठेवावी. बटाट्याच्या साली काढून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावेत. कांदा, मिरची व लसूण बारीक चिरून घ्यावे.
कृती :
फोडणीत मोहरी,जिरे, हिंग, हळद घालून त्यात भिजलेले तांदूळ - तूरडाळ खमंग परतावेत. त्यांना जरा शिजू द्यावे. पाच कप (अडीच पट) पाणी घालावे. त्यात चिरलेला बटाटा, कांदा, लसूण, मिरची, तिखट, गरम मसाला, कढीपत्ता घालून झाकण लावून शिजवावे. खिचडी थोडी ओलसरच राहिली पाहिजे. झटपट मसाला खिचडी तय्यार!
वाढताना वरून तूप, कोथिंबीर घालून, हवे असल्यास लिंबाचा रस पिळून द्यावे. सोबत दही, चटणी/ लोणचे, सलाड, पापड द्यावे. |
प्रतिक्रिया
छान मला
हो, मूग डाळ,
मी मुगडाळ
छान
अन्नावर
In reply to छान by अक्षय पुर्णपात्रे
शुचि, मग
In reply to अन्नावर by शुचि
>> तुझं काय
In reply to शुचि, मग by अरुंधती
व्वा! <<
वाव्वा!!
हा हा हा,
In reply to वाव्वा!! by बेसनलाडू
ह्यात
भरली मिरची
या घ्या २ पाककृतींच्या लिंक्स
In reply to भरली मिरची by शिल्पा ब
हो हो याच
In reply to या घ्या २ पाककृतींच्या लिंक्स by बहुगुणी
मस्त! अशी
ही related पाककृती आठवली
गरम गरम
लसुण सा~या
लसूण इथे
In reply to लसुण सा~या by अविनाशकुलकर्णी
सह्ही
व्वा!
In reply to सह्ही by अस्मी
खिचडी
In reply to सह्ही by अस्मी