नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे.. यानंतर मात्र नवीन लिखाण येथे टाकीन..
धन्यवाद,
विनायक
***************************************
प्रति,
चेतन,
हाय चेतन ! खरतर, तुला पत्र लिहिणार नव्हतोच, तुझं पुस्तक आवडलं अस सांगणार एखादं द्विट टाकणार होतो. तेवढ बास झालं असतं .पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच. खरंतर बरोबर २ वर्षापूर्वी एका लेखातून तुझी मला ओळख झाली. आणि, तेंव्हापासून आजपर्यंत मी तुझा फॅन होतो, आहे.कदाचित राहीनही आणि त्यामुळे अर्थातच तुझी सगळी पुस्तकेही मी वाचलेली आहेत.आणि आता त्या अनुशंगानेच आज तुझ्याशी बोलणार आहे.
सांगायची गोष्ट अशी की, नुकतेच तुझे चौथे पुस्तक 2 States’ वाचले. लग्नाची गोष्ट तु छान सांगितली आहेस. त्यात, स्वत:चीच कहाणी असल्याने नीट एक्स्प्रेस झाली आहे. लोकांना ही कहाणी आवडणार हे नक्की, त्याबद्दल तुझ आधीच अभिनंदन ! पण, खरं सांगु, एक ''पुस्तक'' म्हणून मला ते अजिबातच आवडले नाही. तुझे हे पुस्तक म्हणजे एका चित्रपटाची पटकथा आहे फक्त! आणि ते बाड तु डीरेक्टरला द्यायच्या आधी आमच्या तोंडावर मारलेले आहेस ,इतकेच. अर्थात, त्यावर चित्रपट निघेलच !पण मित्रा , पुस्तकावर चित्रपट निघणे वेगळे आणि, चित्रपटची स्टोरी पुस्तक म्हणून विकणे वेगळे . अगदी प्रसंग, पात्र रचनाही तशीच आहे रे, चित्रपटासारखी.... तुला हे माहित असेलच की अशा Love story कोपर्या कोपर्यावर घडतात. पडद्यावर त्या time pass म्हणुन 3 तास बघणे वेगळे, पण, वेळ काढून पुस्तकात पण तेच वाचण्यात काय अर्थ आहे? चार चित्रपट एकत्र केले की झाले तुझे पुस्तक. मी अशी स्टोरी लिहिण्याबद्दल म्हणत नाही आहे.,ती लिहावीच. पण ती ज्याप्रकारे लिहिलेली आहे, त्यात ज्या प्रकारचा मसाला जाणुन बुजुन भरला आहे ते मला खटकतय.
खरतर, तु आम्हा तरुणाईला आवडलेलास ,आवडतोस ते तुझ्या गोष्ट सांगायच्या कौशल्याने. साध्या आणि Fuck, suck वाल्या तरूणाईच्या भाषेने, विषयातल्या वेगळेपणामुळे. गेल्या 3 पुस्तकात तु एकच गोष्ट सांगितलीस, 3 मित्र, एखादा बाबा, बुवा वा घडणारा प्रसंग.अगदी फाईव्ह पाइंट समवन मधला Rhyn असो, कॉल सेंटरच्या स्टोरीमधले लोक असोत,किंवा मग गोविंदची कहाणी.तेच घडले ना तिन्ही कथेत? हे सगळे जगावेगळे करायला गेले ,पण त्याना जमेना. मग कधी देव आला तर कधी आपलाच आतला आवाज. मग ते सुधारले आणि मग नेहमीप्रमाणे Happys Endings .एखादी लव स्टोरी.एखादा Adult परिच्छेद ,असो. पण आम्ही ती पुस्तके वाचली,डोक्यावर घेतली ,आजही ही तिन्ही पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीतुन खाली आलेली नाहीत हे काय सांगते. असे झाले कारण तु ज्याप्रमाणे कथेच्या पार्श्वभुम्या बदलल्यास,थोडेफार नवे विश्व उलघडवलेस, आम्हाला गुंतवलस ते आम्हाला आवडल. पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहे आणि तुझ्या कहाण्यात जो बदल व्हायला हवा तो दिसत नाही आहे. चौथ्या पुस्तकात तर तु फक्त चार चित्रपटाच्या पटकथा एकत्र केल्या आहेस.खरतर एक Message द्यायचा तु थोडाफार प्रयत्न केला आहेस खरा.पण तो मेसेज अजुन तुलाच समजलेला नाही हे लगेच कळते ,मग कशाला हा अट्टहास. चेतन, हे असे का ?
यावर तुझां MBA style उत्तर मला मिळेल, "मी लोकांना जे आवडेल ते देतो." वाचकांची पातळी घसरली, म्हणून मग मीही घसरलो. बरोबर आहे, रसिकतेचे अवमुल्यन तर सगळीकडेच झाले आहे. पण चेतन, त्याला बदलायची ताकद तुझ्यात आहे रे .आज ''चेतन भगत'' हा एक ब्रँड झाला आहे. मी हे पत्र अरविंद अडिगाला का लिहिले नाही? नाही लिहिणार, कारण अभिरूची बदलायची ताकद तुझ्यात आहे. त्याच्यात नाही. आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.एवढा लोकांचा विश्वास तुझ्यावर आहे.मग तु लोकांना बदलवु शकत नाहीस का? तु म्हणतोस, मला नव्या भारताचा घटक बनायचे आहे,तो घडवायचा आहे. मग आपली कथा सांगायची ताकद तु त्यासाठी का वापरत नाहीस? अशाच एखाद्या कहाणीतुन तु तुला समजलेला ,भावलेला आणि तरुण जनतेला उपयुक्त विचार, भावना लोकांच्या गळी उतरवु शकत नाहीस का? तसा प्रयत्न तु केलास थोडासा .पण त्यात Message तर गेला नाहीच, पण कथाच कोसळली. तु एखादी चिरंतन कथा सांगु शकशील कारे ? आज आम्ही तुझ्या गोष्टी वाचतो, पण आठवडाभराने त्यातली पात्रेही लक्षात राह्त नाहीत .तरुणाना आवडणारे लिखाण म्हणजे बुक व्हॅल्यु नसलेले ४ दिवसात विसरले जाणारे लिखाण असा समज यामधुन होणार नाही का रे?मग तुझी ती स्टोरी आठवायला पुन्हा चित्रपटाला जायचे.(थ्री इडियटस, हॅलो) आम्ही तुझ्याकडून जरा चांगल्या ,मनाच्या कोपर्यात कायम्न टिकुन राहील अशा लिखाणाची अपेक्षाच ठेवायची नाही का? एकदा सांग बाबा या प्रश्नाचे उत्तर......
तु चित्रपट लिही रे, जरूर लिही. 200 रूपयाचे तिकिट काढून आम्ही ते पाहू ही. पण मनोरंजनाला जीवनात दुय्यम स्थान आहे. ते साधन आहे साध्य नव्हे. तुझ्या स्वतःच्या शैलीत तु या आयुष्यातल्या ध्येयासंबंधी,ते पुर्ण करतानाच्या थराराविषयी ,जीवनातल्या निखळ आनंदाविषयी कधी लिहिणार?असं कृत्रीम कॉल सेंटर्चे जग किंवा अकल्पित घटनानी भरलेली लव्ह स्टोरी असेच काहीसे तुझे पुढचे लेखन असणार का?आम्हाला तुझ्याकडुन नव ,चांगले वाचायचय.आजचा तरुण ध्येयहीन झाला आहे.त्याला कसलीच इच्छा नाही, प्रयत्नातला आनंदच तो विसरला आहे ,त्याना हे सगळे कळाले पाहिजे आणि ते फक्त तुच सांगु शकतोस. भारतीय राज्यकर्त्यानी देशाच्या उज्ज्वल भविश्यासाठी ज्या संस्था काढल्या. त्या दोन्ही संस्थांचा तु प्रतिनिधी आहेस.तुला स्वतःला व्यक्त करायची ताकद आहे. ती इथे वापर ना,पोटापाण्यासाठी चित्रपट लिहिणे वेगळे पण आपली लेखणी त्यासाठी खर्ची घालवणे वेगळे. या चित्रपटातून बाहेर ये, काहीतरी Quality, Clasic दे.आम्हाला नवी उमेद दे. सांग आम्हाला काहितरी आणि, हे फक्त तुचं सांगु शकतोस. अगदी साधी साधी गोष्ट तु आमच्या मनात बिंबवु शकतोस. कारण,
Young India loves to hear you.
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो. पण एमएनएस वर केलेले. sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे. आमचा हिरो वैचारिकरित्या इतक्या अस्थिर, अनस्टेबेल आहे का? तुझ्या चार पुस्तकात एक बर्यापैकी सारखे पण होते ते म्हणजे तुझे सगळे नायक सीस्टीमच्या विरोधात जातात. बरोबर आहे ,हा विचार तु देऊ इच्चितोस .पण प्रत्येक जण त्यात हरतो आणि कोणती तरी तिसरी व्यक्ती त्याला मदत करते. आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का? ते तुझे हे पुस्तक्,सारे Tweet आणि TOI मधला लेखही भाषिक अस्मितेच्या वादात या नव्या पुस्तकाची पोळी भाजुन घ्यायचा प्रकार आहे?हा पण MBA चा भाग तर नाही ना?
मी खुप बोलतोय मला माहित आहे, बरेचसे चुकिचेही असेल. कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे. खरतर हे सगळे माझ्या अपेक्षाभंगातून आलेले आहे. , पत्र लिहिण्याइतकी आत्मियताही कुठुन आली ते माहित नाही.कदाचित मी पण IIT त जायचे स्वप्न पाहतोय म्हणून आली असेल. मी पण गोंधळलेलो आहे. तुझ्याकडुन अशी अपेक्षा ठेवावी की नको, माझ्या हिरोला मी असे खडे बोल सुनवावेत का? नाहीतर, अशा Movie style पुस्तकात messeage शोधत बसावा का? नाहीतर असा मेसेज वगैरे काही नसते, असा दिशा देणारा कोण नसतो, लिखाण फक्त मनोरंजनासाठी असते ,निदान तूझे तरी तसे आहे असे समजायचे का? सांग रे, यंग इंडिया जाउ देत, निदान I Want to hear from my Idol, असो,जास्त बोलत नाही फक्त एवढेच की
I am waiting .........
तुझा फॅन,
विनायक पाचलग
वाचने
13947
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
+१
In reply to वा by प्रकाश घाटपांडे
धन्यवाद
चेतन भगत
मित्रा
हा लेख
In reply to मित्रा by विनायक पाचलग
आहे खरा
In reply to हा लेख by Nile
नमस्कार,
>>हाहाहा
In reply to नमस्कार, by टारझन
हॅहॅहॅ
In reply to नमस्कार, by टारझन
पाचलग,
सहमत
In reply to पाचलग, by ज्ञानेश...
सहमत, असेच
In reply to सहमत by चिरोटा
सध्या
अपेक्षा नव्हे
माफ करा ...
In reply to अपेक्षा नव्हे by विनायक पाचलग
डॉनसाहेब
In reply to माफ करा ... by छोटा डॉन
'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत
In reply to माफ करा ... by छोटा डॉन
थरूर / मोदी
In reply to 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत by गोगोल
चेतन....सचिन....!!
धन्यवाद
In reply to चेतन....सचिन....!! by इन्द्र्राज पवार
तेंडुलकर
In reply to चेतन....सचिन....!! by इन्द्र्राज पवार
छान
कोण हा
आहे बुवा एक लेखक
In reply to कोण हा by सुहास
१४० अक्षरं...
मराठीत काय ?
In reply to १४० अक्षरं... by राजेश घासकडवी
हम्म्म
In reply to मराठीत काय ? by छोटा डॉन
+१
In reply to हम्म्म by विनायक पाचलग
मानले बुवा
In reply to हम्म्म by विनायक पाचलग
हाहाहाहा...
चेतन भगत??
:)
चेतनचं
मूव्ही स्टाईल लेखन म्हणजे काय रे भाऊ?
आजची पीढी
ही वरील
In reply to आजची पीढी by भडकमकर मास्तर
चेतन भगत आणि मंडळी :- असून अडचण नसून खोळंबा !
जिप्सी...
In reply to चेतन भगत आणि मंडळी :- असून अडचण नसून खोळंबा ! by जिप्सी
अजिबात
चेतन भगत
In reply to अजिबात by ३_१४ विक्षिप्त अदिती
चालायचंच...
मनीष साहेब
ह.घ्या!!
In reply to मनीष साहेब by जिप्सी
मात्र १ मी
+१
२ स्टेटस
हम्म!!!
विनायक, तुझा लेख आवडला पण चेतन भगत नाही आवडत
राईट...आणि
In reply to विनायक, तुझा लेख आवडला पण चेतन भगत नाही आवडत by वाहीदा
खप
In reply to विनायक, तुझा लेख आवडला पण चेतन भगत नाही आवडत by वाहीदा
वैदातै.. लै
आभार
धन्यवाद रे कोदा......
अवांतर-
प्रचारकी...
जनाब यह