आत्ताच डॉ. उज्वला दळवी यांचे 'सोन्याच्या धुराचे ठसके: पाव शतकी सौदी अनुभव'
(प्रकाशकः ग्रंथाली) हे अप्रतिम पुस्तक वाचून खाली ठेवले आणि मिपाकडे धाव घेतली. वाटले, हे पुस्तक
सर्व मराठी वाचकांनी आवर्जुन वाचलेच पाहिजे इतके सुंदर आहे. लेखिकेची लेखनशैली अतिशय ओघवती अन
मिष्किल आहे; वाचक गालातल्या गालात हसत राहतो, कधी अचंबित होतो तर कधी मन विदिर्ण होतं; विशेषतः सौदीतली
स्त्रियांची अवस्था वाचतांना..
स्वतः लेखिका एम्.डी मेडिसिन असून आपल्या पतिंसमवेत त्या सौदीमध्ये अजूनही वैद्यकिय
सेवा देत आहेत. पुस्तक वाचतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते ती म्हणजे लेखिकेचे अफाट वाचन आणि मराठीवरचे
प्रभूत्व! लेखिका डॉक्टर असल्याने त्यांना सौदींच्या समाजजीवनात डोकावून पाहाता आले, व्यक्तिगत बाबीसुद्धा निरखता आल्या.
हे पुस्तक म्हणजे एका सामान्य मराठी माणसाच्या दृष्टीला सामोरे आलेल्या अनेको प्रकारच्या विसंगती, अडचणी, किचकट कायदे,
पराकोटीची धार्मिकता, पुरूषप्रधान अरबी संस्कृती, त्यांच्या खाण्याच्या (आपल्या दृष्टीने विचित्रच)
सवयी ह्या सगळ्याचे भन्नाट निरिक्षण आहे.
जास्त लिहित नाही कारण मला आता ते पुस्तक दुसर्यांदा वाचायला घ्यायचे आहे!
सध्या अनेक डॉक्टर्स लिहिते झाले आहेत ही मराठी साहित्याच्या दृष्टीने एक आनंदाची अन कौतूकाची बाब आहे.
गेल्या काही दिवसांत डॉक्टरांनी लिहिलेली खूप सुंदर पुस्तके वाचायला मिळाली उदा. आणखी दोन हात- डॉ. श्रीखंडे, बिहाईंड दी मास्क-
डॉ. सुभाष मुंजे इ. त्यात आणखी एका नितांतसुंदर पुस्तकाची भर पडली आहे.. जरूर वाचावे
वाचने
12365
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्सुकता
नोंद केली
असेच म्हणतो
In reply to नोंद केली by भडकमकर मास्तर
एकदा याच
या बाई या
नमस्कार, जा
प्रिय काळे
In reply to नमस्कार, जा by भय्या
प्र का टा आ
In reply to प्रिय काळे by भय्या
सुंदर..
पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद..
धन्यु
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भीषण
In reply to उत्तम by नंदन
+१
In reply to भीषण by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत!
In reply to भीषण by ३_१४ विक्षिप्त अदिती
सोन्याचा धूर ... ठसके वगैरे ...
In reply to उत्तम by नंदन
बाप रे! मी
In reply to उत्तम by नंदन
धन्यवाद
In reply to उत्तम by नंदन
असेच म्हणतो
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
हे पुर्वीच
उज्वला दळवी
सोन्याच्या धुराचे ठसके ...
"...पाव शतकी सौदी अनुभव'
सुंदर परिक्षण
In reply to "...पाव शतकी सौदी अनुभव' by इन्द्र्राज पवार
डॉ. गवांदे
In reply to सुंदर परिक्षण by उदय
डॉक्टर
+१
In reply to डॉक्टर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by मदनबाण
फारच सुंदर
आभार
लेखिका डॉ. उज्ज्वला दळवी
संक्षिप्त पण चांगली ओळख
डॉ. दाढे
पुस्तक वाचून ऑफीसातील 'हाजी' आणि 'हज्जा' मंडळीना विचारून बघतो..
"Not without my daughter"