मी पाहिलेला मृत्यू
लेखनप्रकार
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा.
तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल.
मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो. तेंव्हा पाणी हे कॉमन नळावरुन भरण्याचे दिवस होते. बाथरूम मधे नळ वगैरे कल्पना त्याकाळी एवढ्या प्रचलित नव्हत्या. मोरीत एक पत्र्याचा गोल हौद ठेवला जायचा आणि तो रोज सकाळी खालून कळशीने पाणी आणून भरला जायचा.एका सुटीच्या दिवशी आई,वडील मोठा भाउ आणि त्याच्या वयाचा चुलत भाउ असे सर्व मिळून पाणी भरत होते. मी अगदीच लिंबुटींबू असल्यामुळे आणि पाणी भरण्यापेक्षा ते सांडवून त्यात खेळण्याकडे आमचा कल जास्त असल्याने आम्हाला पाणी भरण्याच्या जबाबदारीतून मुक्त केले होते. मी बाहेरच्या खोलीत काहीतरी खेळत यांच्या कामावर लक्ष ठेऊन होतो. मधेच मला लपून बसण्याची सुरसुरी आली. बाहेरच्या खोलीत कोणी नाही पाहून मी भिंतीत असलेल्या कापाटात शिरलो आणि त्याचा लाकडी दरवाजा ओढून घेतला. त्या दाराला वरती गोल फिरणारी खिटी होती. मी दरवाजा ओढून घेतल्यावर वजनाने ती खिटी फिरली आणि बाहेरून दरवाज्याला लागली. हळूहळू मला आत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आणि मी आतून दार वाजवायला सुरवात केली. त्याच वेळी नेमका माझा चुलत भाउ त्या खोलीत आला. आणि त्याने खिटी फिरवून कपाटाचे दार उघडून मला बाहेर काढले. गुदमरून मरता मरता मी दुसरयांदा वाचलो.
12-13 वर्षाचा असताना मी पोहायला शिकण्यासाठी म्हणून मे महिन्यात नदीवर गेलो होतो. पाठीला डबा बांधून निवांत पोहत होतो. पाठीला डबा असल्यामुळे आपण बुडत नाही हे लक्षात आल्यावर जरा आतल्या खोल भागात गर्दी नाही अश्या ठिकाणी हात पाय मारायला लागलो. मजा पण येत होती आणि लई भारी पण वाटत होते. आणि अचानक मी एक गटान्गळी खाल्ली. नाका तोंडात पाणी गेले. काहीच कळेना आणि दिसेना. ठसकतउसकत पाण्याच्या वर आलो. 1-2 क्षण पाण्यावर होतो तेंव्हा डबा दूर कोठेतरी तरंगताना दिसला. आसपास जवळ एकही माणूस पोहत नव्हता. खोकुन झाल्यावर आरडाओरडा करायला म्हणून श्वास घ्यायला गेलो तोच पुन्हा पाण्याखाली गेलो आणि जाताजाता थोड्या हवे बरोबर भरपूर पाणी नाका तोंडात गेले. असे 1-2 वेळा झाले. आणि त्याच वेळी कोणी तरी ओढल्याचे जाणवले. भरपूर खोकून , गिळलेले पाणी ओकून झाल्यावर जाणिवा जागृत झाल्या. पहातो तो एका ट्यूब घेऊन पोहणार्या मुलाने प्रसंग पाहून माझ्या जवळ येऊन मला त्याच्या ट्यूब वर ओढले होते. ती ट्यूब गच्च धरून मी त्याच्या बरोबर काठाला आलो. बुडून , हवे अभावी मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप.
बहुदा मिसळपावकराना आमच्या रामसे स्टाइल टॉपिक पासून वंचित ठेवू नये असे यमाला वाटले असावे.
वाचने
31672
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा?
या वरून आठवले
?????
In reply to ????? by इनोबा म्हणे
हे कार्ट
In reply to ????? by इनोबा म्हणे
मरणे मारणे आणि पुनर्जन्म
In reply to मरणे मारणे आणि पुनर्जन्म by आंबोळी
आम्बोळ्या...जबरान् ....
In reply to आम्बोळ्या...जबरान् .... by धमाल मुलगा
:ऽ
In reply to :ऽ by इनोबा म्हणे
हे बरे आहे का?
माझा अत्यंत जवळचा मित्र आणि त्याची बायको यांचा मृत्यू.
In reply to माझा अत्यंत जवळचा मित्र आणि त्याची बायको यांचा मृत्यू. by एक
हे मित्र
In reply to हे मित्र by रोचीन
हो.
अपघात
मी आणी
म्रुत्यु
अरेरे......
In reply to अरेरे...... by अभिज्ञ
कुणाच्या?
In reply to कुणाच्या? by प्रमोद देव
हाहाहा.)
पाणी आणि मरण
गणपतीबाप्पा मोरया !!!!!!!!!!
In reply to गणपतीबाप्पा मोरया !!!!!!!!!! by गणपा
तरंगणे........
In reply to तरंगणे........ by प्रभाकर पेठकर
"अशा वेळी
In reply to तरंगणे........ by प्रभाकर पेठकर
सहमत.
बापरे !
असंभव को भी संभव करदे !!!!!
In reply to असंभव को भी संभव करदे !!!!! by मदनबाण
कै च्या कै
(शुभ्राचा