"बालकवि" ~ निसर्गसौंदर्यात रममाण होण्याची तीव्र तळमळ !
लेखनप्रकार
"५ मे" ~ बालकविंचा हा स्मृती दिन (१९१८ च्या या तारखेस त्यांचा अपघाती म्रुत्यु झाला होता.)आज आकाशवाणीवर बालकवि यांच्याविषयी एक खास कार्यक्रम सादर करण्यात आला, जो अगदी योगायोगाने मला ऎकायला मिळाला. निवेदक बालकविंच्या प्रभावाखाली असल्याचे जाणवत होते इतक्या तन्मयतेने त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या वेळेत या जादुगाराचे मराठी भाषेतील योगदान प्रस्तुत केले.
चला आपल्या संस्थळावर या निमित्ताने प्रतिभेचे ईश्वरदत्त देणगी लाभलेल्या या कवीची आपणास आवडलेली, स्मरणात राहिलेली, अभ्यासलेली वा इतर कोणत्याही प्रसंगाने मनात रुंजी घालत असलेली "कविता" आठवू या.....आणि मराठी शारदेच्या प्रांगणात आपल्या तेजस्वाने सदैव लखलखत असणा-या या अढळ ता-याचे स्मरण करु या....!
मी जाणीवपूर्वक "फ़ुलराणी" व "श्रावणमास" या दोन कवितांना न घेता (कारण....या दोन्ही प्रत्येक मराठीप्रेमीच्या ह्र्दयात घर करुन आहेत) त्यांची याच पठडीतील "संध्यारजनी" चा विचार करु इच्छितो. बालकवि हे नेहमी स्वप्नरंजनात दंग झालेले असल्यामुळे निसर्गाच्या रम्य देखाव्यात त्यांची सर्व स्वप्ने साकार होताना दिसतात. निसर्गातील एखादे द्र्श्य पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर एक कल्पनाचित्र त्याचसमयी तरळू लागते आणि थोड्याच वेळात असल्या कल्पनाचित्रांची परंपराच तयार होते. "संध्यारजनी" कवितेतील तारकांच्या आगमनाचे हे मनमोहक वर्णन :
संध्येच्या खिडाकीत येउनी ही हसरी तारा,
हळुच पाहते, खुणावितेही ’या - या’ कोणाला ?
पलिकडचा तो तेजोमय नव पडदा सारुन
बघते, हसते, क्षणात लपते, ही दुसरी कोण ?
लाजत, लाजत असाच येइल सारा स्वलोक,
मुग्ध बालिका जमतिल गगनी आता नवलाख
आली होती भरती, आता अस्तसमुद्राला
त्या लाटांतुन काय सांडल्या या मौक्तिकमाला
कल्पतरुंची फुले उडाली की वा-यावरती ?
आकाशीच्या गंगेला की बुदबुद हे येती ?
नव टिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे ?
स्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे ?
विश्वशिरावर टोप चढविला हि-यामाणकांचा !
केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या महान कवीला विनम्र वंदन !!!
वाचने
9653
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
बालकवींवर
In reply to बालकवींवर by प्राजु
"फुलराणीला गोड गोड लाजवी"....
सुंदर कविता
In reply to सुंदर कविता by फारएन्ड
तू तर चाफेकळी....
चांगला विषय
In reply to चांगला विषय by विकास
औदुंबर ...
In reply to चांगला विषय by विकास
"ती लिंक"...
छान विषय
In reply to छान विषय by स्पंदना
बरीच माहिती मिळेल....
'सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे'
In reply to 'सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनि घ्यावे' by वाहीदा
मुंबईत अन शहरात बालपण.....!
बालकवी
In reply to बालकवी by अमोल नागपूरकर
बालकवी
In reply to बालकवी by अमोल नागपूरकर
त्यांच्या मनातील भीती...!
बालकवी !!
बालकवी !!
काय एकेक
श्री. सदानंद रेगे यांची एक कविता....!!