वार्यावरती भुरभुरती केस
तू समोर अचानक उभी, वार्यावरती भुरभुरती केस
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||
तसाच बांधा अन रंगही कांतीचा
गतस्मृतीत रममाण, विसरलो मी जग
काय अवस्था केलीस? ||१||
वार्यावरती भुरभुरती केस....
ओळखीचे ते रूप मनामध्ये खोल
आवेग अनावर, खेचतो मज तुजसमीप
ताबा न मनावर ||२||
वार्यावरती भुरभुरती केस....
कशास जुने काढावे, नवे आचरावे
एकदा वळून बघ, समजते मज जरी
तू तीच नसतेस ||३||
वार्यावरती भुरभुरती केस....
पाठमोरी दिसता, प्रश्न मजला कोण तू आहेस? ||धृ||
०४/०५/२०१०
- पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2287
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीटशी जमली
खरे आहे.
In reply to नीटशी जमली by sur_nair
तिसरं कडवं
In reply to नीटशी जमली by sur_nair
वा...
In reply to तिसरं कडवं by sur_nair
=))
In reply to वा... by राजेश घासकडवी
आवडली
चांगली