"स्मृती" प्रेम एक अनुभव वाचलं आणि जखमेवरची खपली निघाली.
नव्हतच करायच सफल
तर हे घडाव का?
नव्हतीच मिळायची साथ
तर प्रेमात पडाव का?
का नसते भान मनाला
जात पात या सगळ्याचे .
का जखडती पाश तनाला
नुसत्या एका नजरेचे?
तट्तट तुटती बन्ध मागचे
माय बाप भावंडांचे .
ध्यास एक लागतो जीवाला
कसले खेळ हे नियतीचे?
घायाळ जखमी ; वाट न सरते
पाउलान्चे मनाशी बन्धन तुटते
ओढ मागची पुढे जायचे
मरणानन्तर श्वास घ्यायचे !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1270
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
जियो
चालेल