पुढील दोन वर्षासाठी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समिती मधे सहभागी होण्याचे ठरवले आहे. नव्या जोमाने, काही बदल घडवून आणण्याच्या उमेदीने वार्तापत्र मराठी मधे काढण्याचा हट्ट नवीन समितीने धरला आहे, अन त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. घरी माझी आई, बाबा, मुलगी , नवरा, सगळेच मराठी कविता करतात, पण मी कधी त्या वाटेला गेले नाही, हा माझा प्रांत नव्हे ... परवा अचानक मनातले विचार या रचनेत प्रकटले...
कार्याचे आरंभी
गणेशाचा मान
पहिले कवन
त्यास वाहू ।
संपर्क, संवाद,
सहवास घडो
मराठीचा जडो
छंद मना ।
रमवाया तुम्हां
नवे उपक्रम
असा नित्यक्रम
चालू द्यावा ।
काय सांगता हो
भाषा येत नाही
शिकू लवलाही
येता गोडी ।
“ब्रोशर" नव्हे हे
म्हणू वार्तापत्र
बोलवा सर्वत्र
होवो त्याचा ।
गुणिजन तुम्ही
असता पाठीशी
होईल सरशी
मराठीची ।
वाट पाहतो, या
या सहकुटंब
आनंदे तुडुंब
मन होवो ।
घेतला हो वसा
कार्यरत सदा
भाग्याची शुभदा
परांजपे ।
धोंडोपंतांचे आणि मि.पा. चे आभार !विशेष
वाचने
4165
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुणिजन
+१
In reply to गुणिजन by प्राजु
विचार
पदार्पण
अभिप्राय
अभिनन्दन
कधी येताय वार्तापत्र