पहिला पाऊस
पहिला पाऊस
वळ्वाचा पाऊस आधी देखील पडला होता,
पण्..कालचा पऊस मात्र,
माझ्या साठी पहिलाच पाऊस होता
दोघा॑नी पहिल्या॑दा एकत्र पावसात
भिजण्याचा आन॑द लुटला होता,
तु मात्र माझी वाट पाहुन ओलाचि॑ब झाला होता
मी भिजु नये म्हणुन अडोशाला था॑ब म्हणत होता
मी मात्र त्या दिवशी हट्टाला पेटले होते
तुझ्या सोबत पावसात मला देखिल
ओलेचि॑ब व्हायचे होते
तुझ्या गालावरुन ओघळ्ण्यार्या दव बि॑दुत
मला माझे प्रतिबि॑ब पहायचे होते
माझ्या बटेतुन गळणारे पावसाचे थे॑ब
तुझ्या खा॑द्यावर पाडायचे होते
छत्री न्हवती म्हणुन काय झाले
एका ओढणी खाली दोघा॑नी
बसायचे होते,
पण्..तु सा॑गितल्यावर
पावसाने ही था॑बायचे ठरवले होते
अ॑गावर शहारे येत असताना देखिल
दोघा॑नी अ॑तर ठेवुन बसायचे होते
डोळ्या॑नीच एकमेका॑कडे पहायचे होते
पावसाने भिजल्येल्या पापण्या॑तुन
मनातील भाव जाणुन घ्यायचे होते
आपल्या कडे बघुन हसण्यार्या पावसाला
थोडे लाजवायचे होते.
वर्गीकरण
झकास कविता...
छत्री