कविराज भुषण यांच्या आणखी काही रचना..
यांचा अर्थ समजावून सांगाल काय, तसा थोडा थोडा लागतोय पण काही शब्द अडतात.
पंडित रत्नाकर त्रिपाठी असे मुळ नाव असलेल्या या उत्तर भारतीय कविने सुरुवातीचा काही काळ औरंगजेबाकडेही चाकरी केली होती. पण तिथे केवळ बादशहाचे गुणगान करणारी काव्येच लिहीण्याची मुभा असल्याने या स्वाभिमानी कविने राजाश्रय नाकारला व पुढे तो शिवरायांची किर्ती ऐकुन तत्कालिन हिंदवी स्वराज्यात आला. केवळ व्यक्तीचे गुणगान करणार नाही म्हणुन औरंगजेबाचा आश्रय सोडलेला हा विलक्षण कवि शिवाजी महाराजांच्या दैवी व्यक्तिमत्वाने एवढा प्रभावीत झाला की त्याने राजांवर एक सोडुन दोन महाकाव्ये लिहीली.
"श्री सिवराज भुषण" आणि "शिव भवानी"
......................................................................................................
जै जयंति, जै आदि सकति, जै कालि कपर्दिनी
जै मधुकैटभ छलनी, देवि जै महिष बिमर्दिनी !!
दशरथ जु के राम, मै वसुदेव के गोपाल !
सोंई प्रगटे साहि के, श्री सिवराज भुपाल !!
सिव हि औरंग जीत सके, और न राजा राव !
हत्थिं मत्थ पर सिंह बिनु, और न घालै घाव !!
औरन को जो जनम है, सो याको यक रोज !
औरनको जो राज है सो, सिर सरजाको मौज !!
जीवन में नर लोग बडों, कवि भुषन भाषत पैज अडो है !
है नर लोगनमें राज बडों,सब राजनमे सिवराज बडों है !!
को दाता ? को रन चढो ? को जग पालनहार...!
कवि भुशन उत्तर दिखो, सिव नृप हरि अवतार..!!
तेरे तेज है सरजा दिनकरसो, दिनकर है तेरे तेज के निकटसो !
तेरो जस है सरजा हिमकरसो, हिमकर है तेरो जस के अकरसो !!
कुंद कहॊं, पयवृंद कहॊं, अरु चंद कहॊं
............................सरजा जस आगे !
बाज कहॊं, मृगराज कहॊं, गजराज कहॊं
........................ तेरे साहसके आगे !!
शिवाजी महाराजांच्या १४ गुणांचे वर्णन त्याने एका छंदामध्ये केले आहे.......
सुंदरता,गुरूता,प्रभुता,भनि भूषन होत है आदर जामे !
सज्जनाता औ,दयालुता,दिनता,कोमलता झलके प्रजामे !!
दान क्रुपानहु को करिबो,करिबो अभय दिननको बरजामे !
साहसनों रन ठेक,विवेक,इते गुन एक सिवा सरजा मे !!!!
हिंदू धर्म,हिंदू संस्क्रूती,कुळधर्म,कुळाचाराच्या आधारे चालणारी हिंदू परंपरा यांचे रक्षण आपल्या तलवारीच्या जोरावर केल्याचा उल्लेख एका कवनामध्ये करताना तो म्हणतो.....
वेद राखे विदित पुरान राखे सारयुत रामनाम राख्यो अति रसना सुधार मे !
हिंदून की चोटी राखी है सिपाहिनकी रोटी,कांधेमे जनेऊ राख्यो माला राखी गरमे !!
मिडी राखे मुगल मरोरि राखे पातसाह,वैरी पीसि राखे वरदा राख्यो करमे !
राजन की हद्द राखी तेग बल शिवराज,देवराखे देवल स्वधरम राख्यो घर मे !!!!
अर्थ --शिवजीराजाने आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले.सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले.हिंदूंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी(ऊपजीविका)चालविली. खांध्यांवरील जानवी अन गळ्यातील माला सुरक्षित ठेवल्या.मोंगलांचे व्यवस्थित मर्दन केले अन बादशहास मुरगाळून टाकले.शत्रूंचे चूर्ण केले.इतके करुन आपल्या हाती वर देण्याचा अधिकार ठेवला.देवळात देव अन घरात कुलधर्म कुलाचार कायम ठेवले.
कवि सिवराज भुषण
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
विशाल ...काही दुरुस्ती सुचवू इच्छितो ! पंडित रत्नाकर त्रिपाठी हे कवी भूषण यांचे वडील होत. चिंतामणि, भूषण, मतिराम आणि जटाशंकर हि त्यांची मुले ....यातील चिंतामणि, भूषण, मतिराम यांनी हिंदी साहित्यात अफाट भर टाकली.
चित्रकुट राजा सोळंकी याने 'कविभूषण' पदवी प्रदान केली, तेव्हापासून ते भूषण म्हणून प्रसिद्ध पावले...इतिहासात त्यांची खर्या नावाची नोंद अजून सापडली नाही.
पण तुम्ही या कविराजांच्या रचना टाकून मिसळपाव कृतकृत्य केलेत त्याबद्दल धन्यवाद !
प्रतिक्रिया
बहोत
+१
+२
वा!व्वा!
व्वा!
कविराज
रत्नाकर त्रिपाठी हे कवी भूषण यांचे वडील ...
आभारी आहे ओंकारजी
कविराज
मस्तच
व्वा!! येऊदे अजून.
+१
मस्त !!