✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(ऐक माझ्या मुला)

र — राजेश घासकडवी, Fri, 04/30/2010 - 06:04
प्रेरणा, अर्थातच ही कविता. ऐक माझ्या मुला, तू जरा, तू जरा गोंधळी, या घरी, शांतता दे जरा उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी बोंबलूनी तु घेशी शिरी या घरा पीरपीऱ्या म्हणू, की म्हणू कट्कट्या त्रास देशी असा उठ्विशी मत्शिरा!! तू हि शाई कशा भिंतिला लावली बर्बटूनी निघे, रंग हा पांढरा टाकुनी फेकुनी वस्तु सर्वाघरी फोडशी आरसा मारुनी पत्थरा कोडगा हासतो निर्लजा कारट्या दांडगा, उंडगा.. तू कसा माजरा झोप की क्षण्भरी श्वास घेतो जरा ऐक माझ्या मुला, ऐक ना तू जरा काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा -राजेश वाचवा वाचवा वाचवा वाचवा

प्रतिक्रिया द्या
4145 वाचन

💬 प्रतिसाद (26)

वा !अफलातुन ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 04/30/2010 - 07:18 नवीन
काय साहू पुता, अंत आला अता दे दया तू मला, जोडतो मी करा वा ! खुपच छान ! ! आवडले विडम्बन ! ! !
  • Log in or register to post comments

बाप रे.........

वेताळ
Fri, 04/30/2010 - 09:56 नवीन
पोराचं काही खरे नाही. :D वेताळ
  • Log in or register to post comments

ही ही ही

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 04/30/2010 - 10:01 नवीन
ही ही ही ... (माझ्या एका सिनीयर कलीगचं असं ठाम मत आहे, पोरं आपले आवाज असे बरोब्बर ट्यून करून घेतात की आई-बापांना त्या आवाजाचा त्रास झालाच पाहिजे. बोलता येत नसलं तरी "कसे माझ्याकडे दुर्लक्ष करता तुम्ही!" हे पोरांना अगदी सहजपणे सांगता येतं!) अदिती
  • Log in or register to post comments

वाचवा

श्रावण मोडक
Fri, 04/30/2010 - 10:18 नवीन
वाचवा वाचवा वाचवा वाचवा हे लय भारी. विडंबनाला साजेसे.
  • Log in or register to post comments

लई भारी!

बेसनलाडू
Fri, 04/30/2010 - 10:28 नवीन
विडंबन फारच आवडले. (बालक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ.

प्रमोद देव
Fri, 04/30/2010 - 11:21 नवीन
चुकीच्या जागी प्रतिसाद पडला. :(
  • Log in or register to post comments

जबर्‍या!

आंबोळी
Fri, 04/30/2010 - 10:37 नवीन
खुपच छान विडंबन... आंबोळी
  • Log in or register to post comments

वा मस्त!

राघव
Fri, 04/30/2010 - 11:18 नवीन
प्राजुतैची कविताही छान! अन् त्यावरचे तुमचे छान विडंबन! आवडलंन्!! राघव
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Fri, 04/30/2010 - 11:20 नवीन
मस्तच. घासकडवीसाहेब...तुम्हीही काही कमी नाही. केसु,रंगाशेठ ह्यांची परंपरा तुम्ही उत्तमपणे चालवाल ह्याबद्दल अजिबात शंका नाही. पुलेशु.
  • Log in or register to post comments

मस्त.. आजका

टुकुल
Fri, 04/30/2010 - 11:28 नवीन
मस्त.. आजकाल मि मुळ कवितेच्या आधी तिचे विडंबन वाचतो :-D --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्त विडंब

चेतन
Fri, 04/30/2010 - 11:30 नवीन
मस्त विडंबन छान झालय साहू पुता मधला साहूचा अर्थ काय की हे आडनाव आहे चेतन
  • Log in or register to post comments

साहू..

प्रमोद देव
Fri, 04/30/2010 - 11:33 नवीन
म्हणजे साहणे,सहन करणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन

विडंबन आवडले.

दत्ता काळे
Fri, 04/30/2010 - 11:53 नवीन
वाचवा वाचवा वाचवा वाचवा . . . हे भारी
  • Log in or register to post comments

राजेश, ही

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/30/2010 - 12:24 नवीन
राजेश, ही तर स्वतंत्र कविताच. मस्तच जमली आहे. पण आता या सगळ्यातून सुटल्यामुळे गंमत वाटते आहे... त्यावेळी मात्र नकोसे होते हो... :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

स्वतंत्र कविता....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/30/2010 - 21:22 नवीन
>>राजेश, ही तर स्वतंत्र कविताच. असेच म्हणतो. कविता आवडली...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

खुपच छान

माउली
Fri, 04/30/2010 - 14:23 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

+१

मीनल
Sat, 05/01/2010 - 00:03 नवीन
मजा आली वाचून. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली

आवडले

सन्जोप राव
Fri, 04/30/2010 - 16:27 नवीन
विडंबन छान. सन्जोप राव किताबोंमे छपते हैं चाहत के किस्से, हकीकत की दुनियामें चाहत नही है जमानेके बाजारमे ये शै हे की जिसकी किसीको जरुरत नही है
  • Log in or register to post comments

मस्त रे!

चतुरंग
Fri, 04/30/2010 - 16:51 नवीन
वृत्ताने आणखीनच मजा आली! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

कहर आहे हे

प्राजु
Fri, 04/30/2010 - 19:43 नवीन
कहर आहे हे विडंबन. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

हा हा हा हा,

अरुंधती
Fri, 04/30/2010 - 20:50 नवीन
हा हा हा हा, मस्त जमलंय विडंबन.... अशी हुच्च कार्टी असली की त्यांना कसे आवरावे ह्या कल्पनेनेच मायबाप दीनवाणे झालेले असतात! बायदवे, मध्यंतरी असे वाचले होते की घरात दंगा करणारी पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!! आता हे कसे काय, ते कळले नाही बुवा!! :? ;-) [ मुलांच्या दंग्याने, किलबिलाटाने (?) घरात चैतन्य कायम राहाते म्हणतात, ते असेच व हेच की काय? >:) ~X( ] अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!!

चतुरंग
Fri, 04/30/2010 - 20:56 नवीन
ब्लडप्रेशर नियंत्रणात कसे राहील? त्या शास्त्रज्ञाला एकदा आमच्याकडे घेऊन या, कायमचे सोडून देईल संशोधन! ;) मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय अरुंधती ताईं? :? (थरथराट)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

>>>मुलांच्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/30/2010 - 21:26 नवीन
>>>मुलांच्या उच्छादाला 'किलबिलाट' वगैरे गोंडस नाव देऊन आपल्याच मनाचे समाधान करताय काय ? हा हा हा सहमत आहे. ! काट्टे शाळेत गेलेलेच परवडतात अशा निष्कर्षावर आम्ही तरी आलोय. :) >>>पोरे असली की घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो असे कोणी शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनातून सिध्द केले आहे!!!! हाहाहा ! पोरे नसले की, घरातील मोठ्यांचा रक्तदाब नियंत्रणार राहतो असे त्यांना म्हणायचे असेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्तच

sur_nair
Sat, 05/01/2010 - 05:57 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

ह्र्दयाला

स्पंदना
Mon, 05/03/2010 - 19:44 नवीन
ह्रदयाला हात घातलात बघा. " "उच्च वाणी तुझी रे पिपाण्यापरी" अरे "टॉक सोफ्टली , सॉफ्टली" सान्गुन सान्गुन जीव जातो माझा. खर सान्गु? मुल्(पोर?) झाल्यापासुन माझा आवाज पुरा बदललाय शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

मस्त जमलय

रेवती
Tue, 05/04/2010 - 06:31 नवीन
मस्त जमलय विडंबन! अगदी शेवटच्या ओळीपर्यंत 'सहमत' म्हणावेसे वाटते. आता मला इतकी सवय झालीये कि दंगा नसला तर घरात कामं उरकत नाहीत. मुलावर ओरडणं बंद केलय्.......काही उपयोग नसतो हो राजेश साहेब! आताशा मी ओरडले कि (माझेच) कान दुखतात.;) रेवती
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा