अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले ....
तेवढे आहे असे समजून वाचा ....
अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....."
अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं.
आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;)
आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता...
हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं....
हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ...
पुढच्या वेळी काळजी घेईन ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला.
पहिले ३हि भाग बरेच बरे होते.
इथे मात्र साफ निराशा झाली.
पूढच्या भागात नक्कि काळजि घे.
अबब.
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला
ह. ह.पु.वा.
लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव
छोटा डॉन
ये भाग कुछ जम्या नही.
पुढच्या भागात काळजी घे.
(पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले.
:)
असो, वरील मंडळींशी सहमत...
लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :)
परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता!
कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा.
असो, प्रामाणिक मत. राग नसावा...!
तात्या.
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु
म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही!
असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची!
तात्या.
ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम "
केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं".
धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
जबरान् !!! :-)))
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..."
आंद्या " कुणाचे ?"
डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल "
धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...
भले...गुरु !!!
बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-))
असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय?
हरकत इल्ले...हरकत इल्ले.
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता "
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-)))
आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला.
डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ...
पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता.
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही....
दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते.
आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे.
ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो.
आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ...
आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल .....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे.
निषेध .. निषेध .. निषेध.
(अरे लोकं दुसरीकडे दुसर्या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन...
खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही.
असो! जे जे होईल..ते ते......
"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा !
-(व्यथित) ध मा ल.
छोटे डॊन यांना स. न. वि. वि.
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो.
आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ?
कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ?
बिंधास्त लिहित राहा !!! :)
दिलीपभाय
( छोटा डॊन गॆंगचा )
(शार्प शुटर )
फ ह ड ह तु स लिखाण!!
मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!!
पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ????
असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ?
खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती.
असो! जे जे होईल..ते ते......
"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा !
हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ????
'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे...
(बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
हेच म्हणतो...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या "
आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ...
आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात "
वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना"
आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे....
पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्याच्या लेखावर मत द्यावे, कसे !
पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही,
आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ...
आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अरे छोटा डॉन,
सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं?
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही..
काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे!
हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे!
आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं!
तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन!
अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू!
अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही!
आणखी काय लिहू बॉस?!
तुझा,
तात्या.
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर!
आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!!
असो...
आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे?
तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं?
आणखी काय लिहू?
*पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही..
आता कसं बोल्लात...
तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही...
आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...
जरा डोळे उघडून नीट वाच...
काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे....
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच
जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत !
एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा?
आता पुढचा भाग....
अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....
अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....
[ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला.
च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :)
प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस?
तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन!
हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ?
(मि.पा.प्रेमी)
मदनबाण
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ...
आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ...
मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ...
"तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही...
थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि.
कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते.
काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते.
पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि.
त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे.
कारण माझ्यासारखे खूपजण असतील.
जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये..
प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती...
अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत.
विद्याधर
डॉन काका...
इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे.
अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत)
जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या?
डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका
तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...
डॉन काका...
ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:))
आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!!
डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:))
हा, हा, हा!!!!
-डांबिसकाका
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या.
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ...
आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही...
सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ...
उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ...
आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही ....
आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ...
वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ...
तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ...
डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ...
आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही...
आम्हीही नाही!!
सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ...
सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!
उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ...
आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही ....
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ...
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:)))
आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ...
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
तुझ्या बारशाला जेवलेला,
डांबिसकाका
:)))))
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!"
२ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ...
"म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))"
हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा .
"आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!"
म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो ....
"आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))"
आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा.
येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या.
"पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))"
तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ?
ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
डॉन काका :)))))
जब्बर दस्त...
" डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है"
आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य
कसे वाटते बघा
डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो"
किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा"
हे वाक्य असे होईल
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
.......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
.......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ"
सत्यकाम जाबाली . हा हा हा ...
अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ?
च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
सॉरी .... क्रमशः विसरले....
झकास....
:)
हम्म्म्म.....!
मान्य आहे ....
कल्पनाविलासच बरा..
आवडला नाहि.....
सहमत
हम्म!
आतिषबाजी
कोण?
काय राव?
:-)))))
हम्म ... असे आहे तर
निषेध
अरेरे...
लिहीत रहा.
ता. क.
ह्यावर मी
अरे, कमऒन यार !!!
फडतुस
फ ह ड ह तु स ? असो बापुडे....
ह्म्म
:)
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या "
:)
अरे बापरे!
मला तरी
ये हुई ना बात
ए डॉन्या....
सोडून दे रे!
धन्यवाद ... मी जरूर लिहीन ...
वा...
मला जरा उशीरा कळ्ळं
मी प्रतिक्रीया..
डॉन काका
मनापासून, तुम्हांला मनापासून धन्यवाद!!:))
च्यायला हे काय ?
अजिबात नो पर्सनली!!:)))
आम्ही
जबराच ...
जियो डांबिसकाका..जियो!
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक
डॉन काका :)))))
काय विजूभाऊ ?
हाणा तिच्याआयला !!!!
अरे वा डॉन काका