आण्णा पळसुल्यासोबत पैज हारलो.. :)
ललित मोदीं आणि मंडळींचा वादाच्या भोवर्यात असलेला आयपीएल सामना अखेर संपला एकदाचा..
आजच्या शेवटच्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लागला होता म्हणे..
मी मात्र मधल्यामध्ये फुक्कटचा २५ रुपये हारलो.. (आपली ऐपत तितकीच! आधीच साला आपला धंदा डाऊन आहे!)
"तात्या, उगाच काय 'सचिन!', 'सचिन!' म्हणून नाचतोस? संघाला जेव्हा खरोखरंच गरज असते तेव्हा सचिन कधीही काही करिश्मा करत नाही.. आज देखील तस्संच होईल बघ! मुंबै इंडियन्सवाले हारतील आज.. लावतोस २५ रुपयांची पैज?" माझा मित्र आण्णा पळसुले.
मग मीदेखील सचिनच्या भरवश्यावर आण्णा पळसुल्यासोबत तावातावाने २५ रुपयांची पैज लावली. आत्ताच सामना संपला आणि आण्णाचा छद्मी हास्य असलेला फोन आला,
"काय तात्या, तुझ्या सचिनच्या भरवश्याच्या म्हशीने दिला की नाही टोणगा? उद्या भेटतोय तुला. २५ रुपये तयार ठेव! अरे लेका तुला एवढं समजत नाही? मुंबै इंडियन्सच्या खेळाडूंच्या घरी भरपूर रक्कम पोहोचती झाली असणार आणि म्हणूनच मुंबै इंडियन्सवाले हारले..त्यांना अगदी सहज शक्य असलेलं अवघं १६८ धावांचं आवाहनही त्यांनी (मुद्दाम) पुरं केलं नाही आणि हरले! अगदी रीतसर आणि ठरवून!
आता यावर मी काय बोलणार? आण्णाचं म्हण्णं खोडूनही काढता येत नाही.. उद्या सक्काळी ७ वाजता दारात हजर होईल भोसडीचा. २५ रुपये घ्यायला! :)
असो, आता पुन्हा पुढच्या आयपीएलच्या सामन्यांत भेटू.. :)
तात्या.
प्रतिक्रिया
तात्या,
त्या
पोलार्ड ला
तात्या
हाहाहाहा ...
मिसळपाव
मिसळपाव
जाऊ द्या तात्या
तात्या...
खेळात
+१
तेंडुलकर
अरे खेचरा..
+ १
मुंबै
आमचे काही
मुंबईची टीम?
मागे
जशी शेअर
अण्णा पलसुळेंची भॉ........
मुंबई
निख्या, मिस
मिसळपाव ही
संशयाचे भूत
खूपच मजा आली...
पोलार्डला
वेळ सत्कारणी
तात्या,
पैज
चांगली
+१