अक्षम्य
आज श्रेयस ने आत्महत्या केली .... आमच्याच ऑफिसच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून ... क्षणभर काय होतंय काय झालाय याच भानच मला उरल नाही .... रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याचे निष्प्राण कलेवर पाहून मी गलबलून गेले.
श्रेयस कॉलेज मध्ये मला दोन वर्ष सिनिअर कॉलेज मध्ये पाऊल टाकल आणि नोटस वगैरे मिळवण्याची गडबड सुरु झाली.
तेव्हा आमच्या ह्या सिनिअर नी परीक्षेसाठी आमच प्रबोधन केल होत...वाट्टेल ती मदत करेन असा सांगितलं होत आणि शब्द पाळलाही होता.
प्रचंड उत्साह, सकारात्मकता अशी नुसती ओसंडून जायची त्याच्या एक एक शब्दातून. कधी परीक्षेच्या ताणाने कधी कुणाच्या वागण्याने मनाला एकप्रकारची ग्लानी यायची निराशेची, तेव्हा हमखास मी श्रेयसचा नंबर डायल करायची ...त्याची रिंगटोन भारी असायची "में जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुवे में उडाता चला गया " ते ऐकूनच निम्म मळभ दूर व्हायचं.. त्याच्या शी बोलताना हलके हलके बंध सैल होऊन मन शांतवून जायचं .....
नामांकित कंपनी चा माझा कॅम्पस होता apptitude, technical दोन्ही मी क्लीअर झाले पण HR च्या वेळेस त्यांनी मला तुमचे डिप्लोमा चे गुण ग्राह्य नाही धरता येणार असे सांगितले आणि त्यामुळे मला बादही केले ..नकाराची पहिलीच वेळ असल्याने मी रडकुंडीला आले आणि आता काही पुढच्या कंपनीच्या टेस्ट देणार नाही ठरवले .... पण श्रेयस ने मला बोलावलं विचारलं आणि सांगितलं आयुष्यात नकार पचवण खूप आवश्यक असत त्याशिवाय यशही पचवता येत नाही ... नकार जिद्द देतो ...लढ त्याच्या एका शब्दावर मी लढले (अर्थात लढणे हा मोठा शब्द होऊ शकतो पण त्यावेळी मला नोकरी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट वाटली होती ) आणि मला नोकरीही मिळाली ६ महिने ती नोकरी करून मी मला ज्या कंपनीने नाकारले होते तिथेच प्रोजेक्ट लीडर म्हणून जॉईन झाले आणि त्यादिवशी श्रेयश माझा मित्र मार्गदर्शक माझ्या साठी रडला .... खूप आनंद वाटलेला त्याला ... दोन महिन्यातच टो ही त्याच कंपनी मध्ये माझा बॉस म्हणून रुजू झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाले ....त्याचे लग्न माझ्या लेखी त्याच्या आनंदाची पर्वणी होती एका अनाथ मुलीशी त्याने लग्न केले अर्थात मोठेपणाचा आव न आणता ...सगळ सुरळीत चालाल होत पण अचानक हे का?
त्या दिवशी माझा फोन सारखा वाजत होता त्याच्याच होता पण प्रोजेक्ट dead line असल्यामुळे मी तो silent वर ठेवला होता त्यामुळे कळलाच नाही आणि नंतर भेटूनच येऊ म्हणून फोन ही नाही केला ...कदाचित त्याला बोलायचं असेल काहीतरी सांगायचं असेल .... सगळ राहून गेले .... माझ्या हातून अक्षम्य अपराध घडला होता ज्याने मला वेळोवेळी निराशेतून बाहेर काढले त्याला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी तिथे नवतेच .... आता ही आयुष्य भराची टोचणी लागून राहिली .... पहिल्यांदा त्याला मन मोकळ करायला हव होत कुणीतरी आणि कुणीही नाही मिळाल ...
इतक्या सकारत्मक असलेल्या आणि मनातही कुणाच वाईट न चीन्तलेल्या माझ्या मित्रावर ही वेळ का यावी ... हा आनंदयात्री अचानक अकाली निघून का जावा ? उणपूर २५ वर्षा आयुष्य त्यात त्याने अनेकांना आनंद वाटला कदाचित त्यामुळे तो रिता झाला का ? हे जीवघेणे प्रश्न त्याच्या असतीत्वासाराखेच मनात राहतील... आणि माझी ही निराशा आणि अपराधीपणाची भावना घालवायला श्रेयश नसणार ..... मी कस माफ करू स्वतःला? मला मदत हवी आहे ...यातुन बाहेर पडायला....
वर्गीकरण
टोचणी
सान्गु?
जे झाले ते
सर्वप्रथम
तुम्हाला
>>न
नाही कारण
अरेरे!!!
"श्रेयस"....!
जो जन्माला
सांभाळा
अरेरे...!