आपले दोन्हि लेख फारच सुरेख झाले आहेत.
> समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे...
हे फारच खास....
असेच फर्मास लेख येउ द्यात......
मि.पा. वरचा एक उत्तम आणि अप्रतिम लेख.
अबब.
पहातो आता-
एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून आम्हाला कोण अडवतो ते! (भडकमकर सर, तुमच्या मदतीने -)कमी कष्टात जास्त आदर प्राप्त
करतो, जागा झालोच आहे.... प्रचंड झोप आधी काढतो....!
हा शब्दरुपी शिवधनुष्य भडकमकरांना पेलवला नाही असे खेदाने म्हणू इच्छितो.
अजिबात आवडला नाही.
जमलं का हो? :)
लेख मस्तच... चालू दे!
भडकमकर गुर्जींचा इद्यार्थी- इनोबा
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
झकास...
अहो गेल्याच नोव्हेंबरला ही सगळी वाक्य ऐकली होती.. तुमच्याच स्कूलचा विद्यार्थी होता का हो?
तुमच्या अभ्यासक्रमात थोडा व्यायामाचा पण समावेश करा हां. नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!"
जबरी लेख आहे..
अजुन एक उ. सू. : शाळेत आद्य टिकाकार म्हणून लखू रिसबूड चा फोटो लावून टाका//
नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!"
ओहो, त्याबद्दल लिहायचे राहिलंच.....
कसं असतं, आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ..... त्या साठी मग आम्ही मणिपूरहून मागवलेले खास सेल्फ डिफेन्स स्पेशालिस्ट श्री कुड्कुड जकुंबा यान्चे दोन हात शिकवतो....
आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ...
अशी अवस्था झाल्यानंतर पुढचा आठवडाभर लोकसत्त्तामधून लेख छापून आणावेत.. लोकसत्ता ( सुमार केतकर )या बाबतीत तयार आहेतच...
विद्याधर
होतकरू समीक्षक स्_भडक मकर यांनी जेष्ठ समीक्षकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न वरील स्फुटात(?) केला आहे. परंतू या किंचित माधव मनोहरांना हे कळलेले दिसत नाही की नुसते धोतर नेसून चिरूट ओढल्याने माणूस माधव मनोहर होत नसतो. आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात समीक्षकाला आलेले अपयश सतत सलते...
देवनागरीत लिहिलेल्या शब्दांचे डबे एकापुढे एक ठेवल्याने अर्थनिर्मिती होत नसते. प्रस्तुत लेखकाच्या लिखाणाला अजिबात खोली नाही. एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया श्री. स्_भडक यांना मुळीच साधलेली नाही......
नुसती पाश्चात्य लेखक/ समीक्षकांची नामावळी टाकून लिखाणाला आशयगर्भता येईल असे लेखकाला वाटते हीच या लेखाची मर्यादा ठरते. हा विदेशी बेदाणे घातलेला देशी चिवडा पहिल्या प्रयत्नातच फसला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. आम्ही श्री. स्_भडक यांना असा मित्रत्वाचा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी समीक्षणाच्या वा समीक्षक तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा आपले कौशल्य असलेले दंतवैद्यकी सारखे, लोकांचे खरे दात उपटून त्याजागी खोटे दात लावून त्यांना उल्लू बनवण्याचे व्यवसाय करावेत!
डॉ. डांबिसकुमार माहूत
संपादक - स्मशान टाईम्स
:)))
जबरदस्त ह. घ्या.!!
आम्ही किन्चित समीक्षक होतो/आहोत. आम्हाला सुरसूरी, तुटणे, बोटे शिवशिवणे हे सगळे होते.... आज पर्यन्त १-२ होतकरू लेखकान्चा आम्ही यशस्वी हिरमोड केलेला आहे. हे बेसिक क्वलिफिकेशन तुमच क्लास जोइन करायला पुरेसे आहे असे वाटते.....
तरी पण स्पॊन्सर्ड पंगे,कम्पूगिरि,चक्रम वागणे हे सर्व शिकावेसे वाटते.
प्रवेश कधी सुरु होतायत?
(समीक्षक) आम्बोळी
सध्या तू प्रस्थापित ढुढ्ढाचार्या॑चे विदाऊट अनेस्थेशिया दात काढायला घेतलेले दिसताहेत :) बाकी तू घेतलेले 'भडकमकर' हे नाव मराठी माणसाला एकदम शोभेसे आहे (इती शिरिष कणेकर):)
आपणास मजा आली हे वाचून फारच आनंद वाटला...
नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले.
हाहाहाहा......:):).....
_______________________
पण आपले आमच्या नाटकावरचे खरे समीक्षणही उत्तमच होते....
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे...
हे तर मनापासुन आवडले,
अप्रतिम लेख.
हं!! ऽऽऽ बरं लिहितात बुवा ह्ल्लीचे प्रायोगिक लेखक! सुधारणेला वाव असतो म्हणा! कमी वयात यश मिळालायला लागलं की थोड भरकटायला होतं म्हणा ! पण ठीक आहे ! तेवढ चालायचंच! एकदा सुदर्शन रंगमंचावर परिसंवाद ठेवावा. तेवढ्याच सोऽऽहम कोऽऽहम च्या गोष्टी.
प्रकाश घाटपांडे
या लेखाला चांगले म्हणावे तर नाट्यसमिक्षक होऊ शकत नाही आणि वाईट म्हणावे तर तुमच्या कंपूत सामिल होता येणार नाही... या दुग्ध्यात पडलो.
त्यामुळे -
"सदर लेख लिहिताना लेखकाने आपले लेखन कौशल्य, बहुश्रुतता , वाचन, मनन, चिंतन या सार्यांचा पुरेपूर आणि उत्कृष्ट वापर केला असला आणि लेखातील व्यंग वाचकांचे रंजन करण्यात यशस्वी ठरले असले तरी 'नाट्यसमिक्षकांना शिकवण्याचे क्लासेस काढण्याची जाहिरात' म्हणून ते अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते"
-असा दोन्ही दरडींवर हात ठेवतो. :):)
काहीतरी पावरबाज प्रतिक्रिया देण्याच्या विचारात होतो, पण वाईच उशीर झाला.
सगळ्यांनी एव्हढं मस्त ठोकून काढलंय की आता ह्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम गणल्या जाऊ शकणार्या लेखाच्या आशयपूर्ण खोलीच्या अभावाबद्दल लिहिण्यात काहीच हशील उरलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. मेलेल्याला मारण्यात कसली आलीय मर्दुमकी?
असो,
इथे विदेशी लेखक/समिक्षकांची मांदियाळी मांडून आपल्या विद्वत्तेचे टेंभे मिरवण्याची लेखकाची अत्यंत केविलवाणी धडपड नजरेतून सुटत नाही, त्याऐवजी दस्तुरखुद्द मराठी समिक्षकांची/ लेखकांची मोलाची कामगिरी उद्घत केली गेली असती तर लेखाला योग्य तो न्याय मिळाला असता. विनाकारण ग्लोबलाईज्ड साहित्य-संदर्भाच्या अवास्तव जंत्रीपायी लेखाचा बाज हरवल्याचे ठाई ठाई जाणवते. :-))))))))))))))))
भडकमकर शेठ,
पुन्हा एकदा सरपटी बॉलवर सिक्सर !!!!!
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम...
ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके...
आईच्ची कटकट !!!! ज ह ब ह र्ह्या !!!!!
---------------------------------------------------------------------------------
एकाच वेळी एकाहून जास्त कोर्सेस करता येऊ शकतील का ह्याची कृपया माहिती द्यावी. आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे.
अवांतरः आतरजालावर लेखन करणे, त्या लेखनाला पोटभर (सकारात्मक) प्रतिसाद मिळवणे, आंतरजालीय समिक्षकांना 'पुरुन' उरणे ह्यावर एखादा क्रॅश-कोर्स आहे का हो गुरुजी?
आपला,
ध मा ल - 'फिदा' - हू? सेन !
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
धमाल्या,
आम्ही हे सारे भोगलेय.... एक महान समीक्षक आमचे एक टुकार विनोदी नाटक सहन केल्यानंतर , आम्हाला खरेच म्हणाले होते, " तुम्ही डॉक्टर असा नाहीतर कंपौंडर्...आम्हाला काय घेणे आहे? काम नीट करा म्हणजे झाले".... त्यांचे सांगणे योग्य होतेच, त्यात वादच नाही पण जी काही साहेबांची स्टाईल होती, जवाब नहीं ...साधारण ६ वर्षे झाली असतील त्या घटनेला...
त्याच रात्री या लेखाचा पहिला खर्डा लिहिला... :) :)
त्याशिवाय इतक्या पोटतिडिकीनं मनातलं कागदावर उतरत नाही शेठ.
आणि आम्ही काय उगाच मूक हुंदके दिले की काय? असंच सोसलंय...अगदी फुटकळ स्पॉन्सरर्सकडून...का तर पैसा फेकतो...काहीही बोलायचा हक्क आहे मला. तोच आमचा समिक्षक :-(
कधीकधी लाज वाटते असल्या गोष्टी आथवल्या की..आणि राग पण...अरे, जरा तरी समोरच्याचा विचार करा लेको..असाल लय भारी समिक्षक.
म्हणून काय फक्त 'उरलो मारण्यापुरता' ????
"नाट्यसमीक्षक व्हा" ह्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुशंगाने बघता समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो. भडकमकर सरांच्या आजच्या पिढीविषयक भडभडून येणार्या तीव्र आत्मियतेला दाद द्यावी तितकी थोडीच!
**** (५ पैकी ४ चांदण्या)
- अभ्यासक्रमात "चेहेर्यावरील भाव निर्विकार ठेवणे" याचाही समावेश निश्चितच होतकरू अभ्यासप्रेमींसाठी फायदेशीर आणि त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.
समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो.......त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.
... अरे बा प रे.....तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स्ड कोर्सला घ्यावे म्हणतो..... आणि बेसिक कोर्सला लेक्चरर व्हा , फी माफ करून टाकू....
प्रतिक्रिया
फारच छान....झकास
एकदम झक्कास !!!
नाट्यसमीक्षक पाहिजे ?
ठीक आहे!
:(
सही है बॉस...
नाहीतर "जब
लोक्सत्ता आहेच...
पुन्हा हाऊसफुल्ल! ;)
एकदम मस्त!
किंचित उत्तेजनार्थ!
:):):):):):) किंचि
प्रिय भडकमकर
विदाऊट अनेस्थेशिया
मजा आली
वा वा ! !
१०० पैकी किती मार्क द्यायचे.
बरं
ह ह पु वा
मी
दोन्ही दरडींवर हात
च्यायला !
" अहो
बरोबर आहे...
आपल्या
सामान्यांना कळेल अशी लिहू नये....
समाजमनाती
बघू...
समीक्षा नाटक
वा वा ! !