गेल्या आठवड्यातील गोष्ट, मुलाच्या शाळेतील बाई त्याची तक्रार सांगत होत्या. "तुमचा मुलगा ऐकत नाही. चित्रात मी सांगीतलेले रंग न वापरता दुसरेच रंग वापरतो. शीकवताना बोलत असतो, पण त्याच्या शेजारच्या मुली शांत असतात (मग हा बोलतो तरी कुणाशी?). मी सांगीतल्या प्रमाणे न करता, सर्व गोष्टी आपल्याला पाहीजे त्या पद्ध्तीने करतो."
घरी आई सांगत होती, "सकाळी उठायचा कंटाळा करतो, खुप वेळ बाथरुम मध्ये बसतो, अर्धा तास लावतो नष्टा करयला. त्याला हवे तेच कपडे घालतो. स्वेटर/जॅकेट घालत नाही. मला खुप त्रास देतो शाळेसाठी तयार करताना"
मग मलाही आठवले, कोणतीही नवीन गोष्ट मी करत/बोलत असताना त्यात ताबडतोब सुधारणा करायला सदा तत्पर (मी लहान असताना असे वर्तन 'आगाउपणा' ठरत असे) , स्वतःची पद्धत प्रत्येक गोष्टीत वापरणारा, माझ्या सेल फोन वर गेम इन्स्टॉल करुन माझ्या अपरोक्श खेळत बसणारा माझा ६ वर्षांचा चिरंजीव.
शाळेतुन तक्रार आल्यामुळे टाळके सटकलेले. त्यात घरी त्रास देतो, ऐकत नाही म्हटल्यावर अजुनच राग आला.
ऑफीस मधुन घरी आल्यावर चांगलेच फैलावर घेतले. दोन फटकेही दीले. 'शाळेत बाईंचे ऐकायचे, घरी आजीचे ऐकायचे' हे कबुल करून घेतले. दुसर्या दीवशी बघतो तर काही सुधारणा नाही. कालचे फटके वीसरलेले. कालचे प्रॉमिस वीसरलेले. मग परत दम भरणे, परत वचन घेणे आणी ते दुसर्या दीवशी वीसरणे. काय करावे नक्की समजत नव्हते.
चार दिवस यातच गेले. वीकांतात त्याचा मीत्राचा वाढदिवस होता. हळुच माझ्या जवळ येउन त्याने धोरणी पणे मला त्याचा वाढदिवस १ महीन्यांवर आल्याची आठवण करुन दिली - आणी एक कल्पना सुचली.
"या वर्षी तुझा वाढदिवस करणार नाही, पार्टी सुद्धा नाही" मी.
"का............?" तो.
"या वर्षी तु कुठे वाढलास? अजुन शाळेत नीट वागत नाहीस. घरी नीट ऐकत नाहीस" मी.
यावर काही बोलला नाही. एवढेसे तोंड हिरमुसले. एक टुकार खेळणे घेउन खेळत बसला एकटाच.
या आठवड्यात.....
"खुप बदलला हो तुमचा मुलगा. अगदी लक्श देउन ऐकतो. अगदी सांगेल तस्से करतो. मला खुप कौतुक वाटते त्याचे" - इति शाळेतील बाई.
"अरे आज पहील्या हाकेला उठला, लगेच आवरुन नाष्टा पण केला. अजीबात हुडपणा नाही" - इति आई.
मला खुप बरे वाटले.
"डॅड, आता आपण बर्थ डे पार्टी करायची ना?" - चिरंजीव
"असाच शहाण्या सारखा कायम वागत राहीलास तर नक्की करु" - मी १ महीन्याची निश्चिंती करण्यामागे.
आता माझा मोबाईल आणी लॅपटॉप जागेवर असतो.
माझे बोलणे (दुरुस्तीकरता) मध्येच तोडले जात नही.
मी टिव्ही पहात असताना कार्टुन चॅनल हवे असा हट्ट होत नाही.
मी सांगीतलेली गोष्ट विनावीलंब होते, 'का???' हा प्रष्ण न विचारता.
मी आनंदात आहे...मुलगा सगळे ऐकायला लागला म्हणुन.....
खरच???
पण काहीतरी चुकल्या सारखे वाटतेय.....
याद्या
1893
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहीलेच लेखन आहे
चुकल्यासारख वाटतंयना ?
In reply to पहीलेच लेखन आहे by नेत्रेश
उत्तम
मुलांना
सहमत
In reply to मुलांना by शुचि
कोण्डीत पकडलेय....
रंजक...