जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती
मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी
जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता
हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी?
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी
हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा
भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1425
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
चालीत बरोबर बसते
In reply to ह्म्म by स्पंदना
जाऊन जराशी
कुणा ठाऊक
In reply to जाऊन जराशी by टारझन
>> दोघात
आयुष्य असो