मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाऊन जराशी येते

sur_nair · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी? दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी सुरेश नायर http://sites.google.com/site/surmalhar/

वाचने 1425 वाचनखूण प्रतिक्रिया 6

स्पंदना 23/04/2010 - 22:46
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी शेवटची अर्धी ओळ जरा बघा ना! काहि तरी वेगळी वाक्यरचना हवी का हो? बाकि सार छान.. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

sur_nair 23/04/2010 - 23:14
खरं तर 'मालकौंस' रागात एक चाल सुचली त्यावर मग हे शब्द सुचले. चालीत हे बरोबर बसते. गुलामीतल्या 'ला' आणि विखरुनीतल्या 'रु' वर थोडी हरकत आहे. कदाचित नुसती वाचताना म्हणून अर्धवट वाटत असेल.

टारझन 23/04/2010 - 22:48
जाऊन जराशी येते
नाव वाचुन वाटलं प्रातःसमयीची कविता आहे काय ? =)) कविता छान !!! असो .. आज जरा टायमिंग चुकलाय , जाऊन येतो जरासा =)) - (प्रातःसमयी) जातेस कडेकडेनी

In reply to by टारझन

sur_nair 23/04/2010 - 23:23
ती का, कधी, कशासाठी गेली हे वाचकाला कोडे आहे. ज्याने त्याने अर्थ लावावा. बाकी प्रातःसमयीच काही सुचलं नव्हतं पण रात्रभर पत्ते खेळत बसले असतील तर तसे हि असेल, कुणा ठाऊक . हे हे हे

शुचि 23/04/2010 - 23:14
>> दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझी गुलामी >> सुंदर!!! ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

विसोबा खेचर 23/04/2010 - 23:25
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
वा..!