दमलेले ढग
परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग
उन्हामुळे रापलेला
तहानेने व्याकुळलेला
कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही
अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही
मी त्याला पाणी दिले अन विचारले
इतका का धावतो आहेस ?
असे काय लपवतो आहेस ?
तो बोलला विमान मागे लागले आहे ..
पाउस शोधणारे ...
पाउस मागणारे ...
मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ?
कुणाला तरसवायचे !!!
म्हणून धावतोय ..
ज्यांनी निसर्गावर प्रेम केले,
धरती अन आकाशावर प्रेम केले
त्यांच्यासाठी ...
http://binarybandya.blogspot.com/
लेखनविषय:
याद्या
2242
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
मस्त!
वा! क्या
दमलेले ढग
प्रमोदजी ,
गोड ~~~~~~~~~~~~~~~~~~~
छान...
मस्त
वेगळ्या विषयावर
क्या बात है...!
अरुंधती