मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.'
त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची.
माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे. बाबांनी फंडातून बरेचशे पैसे काढले. एवढे काढले की त्यावेळी नॉर्मल मुंजीच्या खर्चापेक्षा ते नक्कीच जास्त होते. पत्रिका छापल्या गेल्या. आई बाबांसोबत बसून लिस्ट मधल्या सगळ्या पाहुण्या रावळ्या - मित्र मंडळींना पत्रिका पाठवल्या गेल्या. जवळच्या नातेवाईकांना पत्रे ही पाठवली.
सगळ्या नातेवाईकांसाठी कपडे घेऊन मुंजीचा बस्तापण बांधला गेला. माझ्यासाठी एक सुंदरसे पितांबर घेतले. एक लॉकेट , एक वळी घेतली. वर्षभरापूर्वीच माझ्या आतेबहिणीचे लग्न झाले होते, त्यात भावजींनी घातलेला जोधपुरी मला जाम आवडला होता. बाबांच्या मागे लागून मी तोही घेतला होता.
मुंजीच्या आदल्या रात्री पासूनच कार्यालय बूक केलं होतं. मावश्या आणी आत्या लोक २-३ दिवस आधीच घरी आले होते. अंगणात चुलीवर मोतीचूर लाडवाचे घाणे पडत होते. फुल्ल राजा होतो मी ते ५-६ दिवस.
मुंजीच्या दिवशी सकाळ पासून सगळ्यांची गडबडघाई चालू झाली. गुरुजींनी मंत्रोच्चार करताना नाव्ह्याला माझे चकोट करायला सांगितले. भोवर्यावर एक वाटी ठेवून तो चालू झाला. आंघोळ झाल्यावर लंगोट घालून वरून एक पंचा गुंडाळून यज्ञकुंडाजवळ बसवून ब्रम्हचर्याची दिक्षा देण्यात आली. भिक्षुकीची प्रॅक्टीस पण झाली. धुपाच्या/धुराच्या वासाने वातावरण भरून गेलं होतं. लहान असल्याने जास्त काही समजत नव्हतं , पण आपल्याला सगळे एवढा मान देतायत हे पाहून मस्त वाटत होतं.
सगळे विधी झाल्यावर मस्त श्रिखंड पुरीचे जेवण हाणलं शेवटच्य पंक्तीला.. :( संध्याकाळी घोड्यावर बसून मारूतदर्शन करून थोड्या वेळाने घरी आलो.
माझ्या सगळ्या मित्रांना टकलावरून हाथ फिरवायची हौस..जो तो येता जाता माझ्या टकलावर हाथ साफ करायचा. पुढे आमच्या वसाहतीत दोन तीनच मुंजे असल्याने आमची डिमांड वाढली. त्याबद्दल नंतर कधीतरी....
*जेवणासाठी मुंजा, बामण हवा असल्यास मला व्यनि ने संपर्क करावा :D
याद्या
4221
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.. काही
असेच म्हणतो
In reply to छान.. काही by निखिल देशपांडे
मुंज
इकडे पण
In reply to मुंज by मीनल
हाहाहा
मस्त रे!
(घरी सगळे
In reply to मस्त रे! by चतुरंग
आवडले
आम्हाला का
मस्तच रे...