Skip to main content

शुद्ध दाद दे !!

शुद्ध दाद दे !!

Published on बुधवार, 21/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
मिपा वरील माझे पहिलेच लिखाण आहे. (चूभूदेघे) एक कविता आहे .. कलाकाराच्या भूमिकेतून लिहिलेली. हे गाण लवकरच दुवा स्वरुपात देइन. ताल सूर नाद्ब्रह्म , अन्तरात घे मैफल ही ईशदान, शुद्ध दाद दे !! गंधर्वच करिती गान, निर्मळ नि:स्वार्थ दान याचक हो, हो भोगी, शुद्ध दाद दे !! जन्म मला काही क्षण, सार्थक तो होइल पण निर्मि कला तव कारण, शुद्ध दाद दे !!
लेखनविषय:

याद्या 1294
प्रतिक्रिया 5

'हि निकामी आढ्यता का, दाद द्या अन शुद्ध व्हा' या गाण्यावरून प्रेरित आहे का? पहिला प्रयत्न चांगला आहे.

व्वा !!! हल्लीच्या लल्लु पंजु गुर्जीला लाजवेल अशी कविता =)) - विध्नेश शुद्धदादवी

सुरेख कविता. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

हे गाण आपल्याला ऐकवीण्यासाठी कुठे अपलोड करता येईल ? जेणेकरून तो दुवा मी येथे देउ शकेन... बाळ ...

In reply to by बाळअमोघ

ही घ्या आमची दाद, आणि गाणे इस्निप्स वर चढवू शकता. बिपिन कार्यकर्ते