Skip to main content

लादेन म्हणतो चेपेन चेपेन..

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 20/04/2010 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
(संदिप-सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची माफी मागून) लादेन म्हणतो चेपेन चेपेन, दाऊद म्हणतो चेपेन चेपेन. न्याय खोटा, कोर्टं खोटी, कायदाच म्हणतो चेपेन चेपेन..! हल्ला होतो अतिरेक्यांचा मंत्री बदलत बसतो सूट. दिल्लीवरुनी येता कोणी उचलत बसतो त्याचे बूट. बूट म्हणाले मंत्र्याला आणिक त्याच्या संत्र्याला, सुटला नाही 'बुश'सुद्धा डावा, उजवा फेकेन फेकेन..! 'कमळा' नाही सुगंध उरला, 'पंजा' देतो नुसतीच थाप 'इंजिन' पळते मारित शिट्ट्या, घोळामध्ये 'घड्याळ' - 'चाप' महाराष्ट्राची धरती रे परप्रांताची भरती रे अबू चालवे सायकल सायकल, लालू धरतो लालटेन लालटेन..! मी बापूंना मारुन डोळा, भरतो माझा पेला रे जो प्याला तो मेला, जो ना प्याला तोहि मेला रे महागाईने फुटता घाम, जेवण सोडा, घ्यावा जाम. गव्हापासून दारू दारू, ज्वारीपासून शँपेन शँपेन..! नुसते सोसत राहण्याची या जगण्यालाही हॅबिट रे, एसेमेसवर जिंकते कासव, जाणून चुकले रॅबिट रे, थकलो मी जरी दमलो मी, शर्यतीत या रमलो मी. मेंदू म्हणतो थांबा थांबा, मन म्हणतं धावेन धावेन..! मूळ कविता - साहेब म्हणतो चेपेन चेपेन कवी - संदीप खरे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3429
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

विडंबन सही आहे... आधी कुठे तरी वाचल्या सारखे वाटत आहे निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

कवितेचं व्याकरण आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण त्यावर बोलु शकत नाही, पण जबरदस्त जमलंय. कोरडे एकदम जोरदार ओढलेयत.

जबरी रे उपटसुंभा :) बाकी मला "लादेन म्हणतो पादेन पादेन" म्हणुन एक-दोन काव्यकडवी सुचली होती .. :) पण म्हंटलं चला द्या सोडुन :) - लाल्टेन गॅसपेटवी

In reply to by टारझन

लादेन म्हणतो पादेन पादेन =)) पण म्हंटलं चला द्या सोडुन सोडलं का मग? :) -ग्यासोबा

विशेष आवडलं म्हणजे मूळ कविताच असावी इतकी सुंदर लय आहे. प्रत्येक कडवं, प्रत्येक ओळ अर्थवाही झालेली आहे. मी मूळ कविता वाचलेली नाही, पण मला ती या कवितेइतकी चांगली असेल का अशी शंका आहे. आणखीन येऊ द्यात.

कडक विडंबन जमलंय !! खरोखरंच अफाट !!! :) _______________________________ जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही

मस्त आहे _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

In reply to by भडकमकर मास्तर

सन्दीप खरे नि सलील कुलकर्णी' च्या काव्यात्मक प्रतिभेचे वास्तववादी विडंबन! छान आहे! अजून येऊ देत! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

संदीप खरे ला द्या पाठवून हे विडंबन तो ही म्हणेल (आमच्याच) सारखे अप्रतिम !! ~ वाहीदा