.....घडावे असे काही.....
.....घडावे असे काही.....
------------------------------
घडावे असे काही सुंदर आणि गोड..
वक्षावरी सुटावे माझ्या वेणींचे पेड..
लागावी चाहुल त्याला.. किणकिणत्या कंकणाने....
हलकेच जाग यावी.. रुणझुणत्या पैंजणाने..
भिनावे त्याच्यात माझे..न उतरणारे वेड..
माळता छानसा मी ..मोगरा केसांतुनि..
पाहावे आरश्यात मजला ..मी पुन:पुन्हा वळुनी..
काढावी त्याने तेव्हा..माझी खट्याळ छेड..
मिठीत मी त्याच्या..हळुवारपणे फुलावे..
गगनासहीत तेव्हा..चांदणेही नुरावे...
खुशीत येऊनि त्याने..माझे पुरवावेत लाड...
बेभान सागराला..मध्येच उधाण यावे..
मजला काही द्यावे..त्याने काही घ्यावे..
पुन:पुन्हा मोडावी..आम्ही एकदुजांची खोड..
ओठांवरी मग यावे..अस्फुटसे हासु..
दवबिंदुपरी जमावे..काठावरी आंसु..
जपावे मजला त्याने..जणु तळहातावरील फोड..
----------योगेश जोशी.
छान
बदलांचे
+१
>>
क्या बात