Skip to main content

मित्रा ...

मित्रा ...

Published on शनीवार, 17/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस, पण कसे समजावू तुला, असं करताना मला किती त्रास होत असतो तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे, तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार, पण, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार
लेखनविषय:

याद्या 1355
प्रतिक्रिया 5

खूप सुंदर कविता आहे. मला फार आवडली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

हाहाहा .. जय-विरु ला भावी आयुश्यासाठी शुभेच्छा :) भरपुर 'सुख समाधान' लाभो :) -(गब्बर) टारझन

दोन मित्रांमधले नाते हे देव (असलाच तर) आणि त्याच्या भक्तांमधील नात्या सारखे असते. फक्त एकच फरक असतो, इथे दोघेही देव असतात आणि दोघेही भक्त असतात. भक्त देवाला कधीच अडचणीत टाकत नाही आणि देव भक्ताला कधीच अडचणीत एकटे सोडत नाही. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

In reply to by जयंत कुलकर्णी

कुलकर्णी साहेब तुमचा प्रतिसाद तर फारच सुंदर अगदी मूळ कवितेइतकाच. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

कविता चांगली आहे. जय-विरु हया शब्दांना वेगवेगळे कंगोरे लाभल्याने कवितेचे वेगवेगळे अर्थ निघत आहेत. असो. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.