Skip to main content

तुमच्या घरी कूकरची शिट्टी काढतात का?

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 17/04/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2130
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

आणि गेली कैक वर्षे मी ते अंमलात आणत आहे. माझ्या परिचयातल्या बर्‍याच लोकांना सांगितलं...प्रात्यक्षिकही दाखवलं...कडधान्यही अतिशय व्यवस्थित शिजतात....हेही दाखवलं...एकदोघांनी दोन दिवस करून पाहिलं(असं ते सांगतात)...पण कुणी सुधारतच नाही...पुन्हा सगळं पूर्वपदावर...तीन शिट्ट्या,पाच शिट्ट्या वगैरे काढत बसतात. :(

In reply to by पर्नल नेने मराठे

तरीच ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे..... ;) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

चांगली माहीती आणि कौल. माझा एकंदरीतच शिट्ट्यांना विरोध असतो : मग त्या कुकरच्या असोत, थेटरातल्या असोत अथवा पोलीसाच्या असोत :-) तरीच ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे..... या संदर्भात आपल्याकडे काही विदा आहे का? शिट्टी वाजवा अथवा नका वाजवूत, पण पर्यावरण बदलाची डाळ विदाअभावी शिजवून देणार नाही. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

>>या संदर्भात आपल्याकडे काही विदा आहे का? आता पाककृती टाकणार्‍यांना कितीवेळ कुकर शिट्टीच्या थरथरवर ठेवायचा ह्याचे आकडे द्यायला सांगायले हवे.

माहीत होत (हॅ हॅ हॅ सांगायला काय जातय ;)) पण काही पदार्थ लवकर शिजत नाहीत. जश्या डाळी. पण त्यावर पण एक उपाय आहे डाळी शिजवायच्या आधी १ तास भिजत ठेवणे. पण मटण झटपट करायच आसेल तर कस शिजवायचहो.. तेला पण ३ शिट्या माराव्या लागतात कधी कधी. गफुरभाय खाटीक ओळखिचा असला तरच कोवळ मटण मिळते. (स्वगत : लेका तुझी सगळी बोलाची कढी नी बोलाचाच भात. ज्ञान आहे वापरणार कधी ते)

आमच्या कडे लेखात सांगितल्या प्रमाणे पालन होते. शिट्टी होउ दिली जात नाही. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

आमच्या कडे लेखात सांगितल्या प्रमाणे पालन होते. शिट्टी होउ दिली जात नाही. मूळ लेखात बारीक सुधारणा : वाफ निघून गेल्याने ऊर्जेचा अपव्यय अधिक होतो, हे बरोबर आहे. मात्र
'दाबाखाली पदार्थ चांगले शिजणे' हा कूकरचा फायदाच नाहीसा होतो
हे ठीक नाही. शिट्टी होताना कूकरमधला दाब (शिट्टी न-दिल्यापेक्षा) फारसा कमी होत नाही. शिट्टी चालू असताना जर आतील वाफेचा दाब शिट्टीच्या "वजनापेक्षा" (= वेटचे वजन/छिद्राचे क्षेत्रफळ या दाबापेक्षा) कमी झाले तर शिट्टी खाली बसून छिद्र बंद होईल. आणि शिट्टी बंद होते तेव्हा तो दाब तितपतच कमी झालेला असतो. प्रत्यक्षात शिट्टी छिद्रनळीवर थोडीशी चिकटपणे बसलेली असते (फ्रिक्शनलेस नाही, या अर्थी). त्यामुळे शिट्टीच्या वजनापेक्षा थोडा जास्त दाब होईपर्यंत ती उचलली जात नाही, आणि शिट्टीच्या वजनापेक्षा दाब थोडा कमी होईस्तोवर तॉ खाली बसत नाही. सरासरी दाब शिट्टीच्या वजनाइतकाच असतो. मी शिट्टी होऊ देत नाही म्हणजे आतील दाब शिट्टीच्या वजनापेक्षा कमीच ठेवत असतो. (नाहीतर शिट्टी उचलली जाती.) म्हणजे सरासरी दाब शिट्टीच्या वजनापेक्षा कमीच असतो. हा दाब जास्तीतजास्त असावा, म्हणून शिट्टी धुसफुसत राहील, पण पूर्ण उचलली जाणार नाही, इतपतच शेगडी मंदावतो. धुसफुसणारी शिट्टी अर्धवट उचलली जात असते. म्हणजे आतील दाब शिट्टीच्या वजनाइतकाच असतो.

In reply to by धनंजय

माझ्याकडे आत्ता संदर्भ नाही पण एकदा शिट्टी उचलली गेली (वाफेचा झोत सुरू झाला) की ती पुन्हा खाली बसण्यासाठी दाब बराच खाली जावा लागतो. म्हणजे शिट्टी पुन्हा खाली बसते तेव्हा दाब शिट्टी होण्याइतका नसतो. दाब तेवढाच (मार्जिनली कमी) असता तर शिट्टी लगेच पुन्हा फुसफुसायला सुरुवात झाली असती. तसे होताना दिसत नाही. थोडे धुंडाळून सांगतो. वजन जवळजवळ उचलले जातेय पण शिट्टी होत नाही अशी स्थिती उत्तम. नितिन थत्ते

In reply to by धनंजय

>> प्रत्यक्षात शिट्टी छिद्रनळीवर थोडीशी चिकटपणे बसलेली असते (फ्रिक्शनलेस नाही, या अर्थी). त्यामुळे शिट्टीच्या वजनापेक्षा थोडा जास्त दाब होईपर्यंत ती उचलली जात नाही सहमत. प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त होऊ नये यासाठीच शिटी बसवलेली असते, नाही का? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

कौल आवडला. पर्याय १ ला मत दिले आहे अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रभुगुर्जींचे म्हणणे खरेच आहे पण ते स्फोट होऊ नये म्हणून. म्हणजे शिट्टीवर हात ठेवून शिट्टी दडपू नये... ;) नितिन थत्ते

कुकरशेजारी उभे राहण्याचा वेळ नसल्याने (कुकर लावुन इतर कामे करुन आम्ही वेळ वाचवतो ;) ) पहिली शीटी झाल्यावर (अलार्म सारखा उपयोग) गॅस बारीक करुन काही काळ (भातासाठी ५ मिनिटे, डाळ ८ मि. इत्यादी) ठेवतो. (दुसरी शीटी होउ देत नाही.
प्रेशर कुकरची शिट्टी होऊ दिली तर आत कोंडलेली वाफ निघून जाते आणि 'दाबाखाली पदार्थ चांगले शिजणे' हा कूकरचा फायदाच नाहीसा होतो. शिवाय ऊर्जा पण वाया जाते.
(थोडीशी)उर्जा वाया जाते मान्य आहे, पण पुन्हा वाफ गरम होउन पुन्हा दाब वाढणारच आहे, त्यामुळे पदार्थ शिजणे शी असहमत आहे. मुळात मला वाटतं पदार्थ शिजण्यात दाबाचा थेट संबंध नसावा. कॉन्स्टंट व्हॉल्युममुळे दीली जाणारी उर्जा संपुर्णपणे पाण्याच्या एन्थाल्पीमध्ये(इन्टर्नल एनर्जी) बदलते (नो वर्क, फर्स्ट लॉ), यामुळे पाणी लवकर तापुन, पाण्याची वाफ पदार्थाला शिजवते.

शिटीनंतर दाब कितीने कमी होतो, व त्याहीपलिकडे जाऊन तो दाब परत शिटीइतका होईपर्यंत दरम्यान कुकरची शिजवायची शक्ती कितीने कमी होते यावर हे अवलंबून आहे. शिट्यांचं काम अतिशय चांगला टायमर म्हणून देखील होतो. तो फायदा देखील लक्षात घ्यायला हवा.

In reply to by राजेश घासकडवी

शिट्यांचं काम अतिशय चांगला टायमर म्हणून देखील होतो. तो फायदा देखील लक्षात घ्यायला हवा.
मूळ हेतु कुकर चा तोच असावा. परंतु दहा मिनिटाने फारसा फरक पडणार नसेल तर उर्जा वाचवणे हे महत्वाचे. [यवढ कोन मिनिष्टर /सायेब लागुन गेलाय धा मिन्टानी फरक पडायला. ] शिट्टीचा कर्कश्य आवाज देखील नकोसा वाटतो. जेव्हा हे कुकर शहरात आले त्यावेळी आम्ही असे ऐकायचो कि पुन्यात म्हने कुकर नावाच मशीन आलय आने ते सैपाक झाला कि शिट्टी मारुन सांगतय. प्रत्यक्ष जेव्हा ते मशीन मी पाहिले आन शिट्टी ऐकली त्यावेळी हे वाफेचा फुस्स आवाज म्हंजी कसली शिट्टी? आमच्या डोक्यात शिट्टी म्हणजे जोरदार शीळ. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

हे माहित होते. सहसा शिट्टी होऊ दिली जात नाही.

पुस्तकी ज्ञान जवळ असलं म्हणून आम्ही ते वापरतोच असे नाही. ;) अंदाजाने हव्या आहेत तितक्या शिट्या काढून नंतर गॅस मंद करून पुढली शिटी होऊ दिली जात नाही. असं सतत गॅसच्या बाजूला उभं राहिलं तर मिपा, उपक्रम वगैरेंवर टिपी करण्यास टैम कसा मिळायचा?

In reply to by प्रियाली

असं सतत गॅसच्या बाजूला उभं राहिलं तर मिपा, उपक्रम वगैरेंवर टिपी करण्यास टैम कसा मिळायचा?
=)) =)) =)) =)) =)) उपक्रम वर टिपी ही केला जातो ? अबब !! =)) =)) मी एक दोन लेख वाचले तेंव्हा मेंदु ला वात आला होता तिकडे :) -ब्रुसली

In reply to by टारझन

उपक्रम वर टिपी ही केला जातो ? अबब !!
उपक्रमावर टिपी होतो का नाही ही चर्चा सुरु आहे का टारेश्वर? चर्चेशी संबंधीत प्रतिसाद द्या बघू. बाकी टिपी ख.व. उघडून तिथे करा. तुम्ही शिट्या किती मारता सॉरी काढता ते सांगा. - कर्झन

शिट्टी ही सुरक्षेसाठी दिलेली असते. तेंव्हा उर्जा वाया जाणे वा प्रेशर वाढून अपघात होणे यातला कमी धोक्याचा पर्याय उत्पादकांनी स्वीकारलेला असतो. जास्त दाबाला शिजवायचे असेल तर शिट्टीच्या जागी दाबमापक बसवून त्याला समांतर एक प्रेशर रिलीज वॉल्व्ह बसवला तर शिट्टीपेक्षा थोड्या जास्त दाबाला अन्न शिजवणे शक्य आहे. शिट्टी न येऊ देणे म्हणजे शिट्टीच्या वजनापेक्षा कमी दाबाला अन्न शिजवणे या धनंजय यांच्या मताशी मी सहमत आहे. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

नुसते कौल देऊन काय उपयोग? शिट्टी वाजवून एखादा पदार्थ शिजायला किती वेळ लागतो व शिट्टी येऊ न देता किती वेळ लागतो याची निश्चित आकडेवारी द्या. तरच तौलनिक अभ्यास होईल तो! तसेच जमले तर दाब किती होता व आतले तापमान काय होते याचीही दर तासाने रीडिंग्स. घ्या.

In reply to by तिमा

>>शिट्टी न येऊ देणे म्हणजे शिट्टीच्या वजनापेक्षा कमी दाबाला अन्न शिजवणे या धनंजय यांच्या मताशी मी सहमत आहे. शिट्टी पुर्णपणे होण्याआधी शिट्टी हलु लागते, म्हणजे हवेचा दाब जर थोडा जास्त झाला तर शिट्टी होइल, बाहेर वाफ जाईल. म्हणुन गैंस कमी करुन, कुकर (मराठी शब्द???) मधील हवेचा दाब तेवढाच ठेवता येईल. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

आज मी हे प्रथमच वाचले... आता घरी सांगायला सुरुवात केली आहे. जरा कुकरच्या शिट्ट्या न काढता अन्न कितपत चांगले (डाळ - मऊसूत) शिजते ते पाहाते आणि ठरवते! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

आईने शिकवले आहे, पण तिथे उभे राहण्याचा कंटाळा येतो. लक्ष राहत नाही, त्यामुळे आळस होतो :( पण हे वाचून परत कुकरची वाफ न दवडीन म्हणते.

In reply to by चित्रा

कुकर लावल्यावर थोडेच तिथे कायम थांबतो.शिट्टी वाजायची लक्षण दिसली कि गॅसजवळ येउन ज्योत कमी करायची त्यानंतर साधारण परत तशीच लक्षणे वाटु लागली कि गॅस बंद करायचा तो पर्यंत सटर फटर कामे करायची. ( फक्त तोंडची वाफ दवडणारा) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बाबांनी ही पद्धत घरी सुरू केली; आता आमच्या घरीही आम्ही ती पाळतो. मी बर्‍याच भाज्याही प्रेशर पॅनमधे शिजवते. भाज्यांना शिटी होते आहे असं वाटलं की गॅस बंद करायचा. कमी पाणी, कमी वेळ, कमी ऊर्जा लागतात आणि सर्व जीवनसत्त्व रहातात. मूगडाळ, कडधान्य आणि भातासाठी शिट्टी हलायला लागली की गॅस बारीक करून साधारण पाच मिनीटांत बंद! तूरडाळीसाठी गॅस बारीक केल्यावर साधारण आठेक मिनीटं. हरभरे, पांढर्‍या वाटाण्यांसाठी बराच जास्त वेळ लागतो, पण बर्‍याच दिवसांत यांतले प्रकार केल्यामुळे आठवत नाही आहे. आत्तापर्यंत पांढरे वाटाणे वगळता कधीही पदार्थ कच्चा राहिला नाही. सुरूवातीला एक-दोनदा कॉलीफ्लॉवरचा लगदा सूपासारखा प्यायला, त्यानंतर फ्लॉवरची भाजीच खाल्ली! *या सगळ्या वेळा साधारणच आहेत, कारण (स्टेपलची क्वांटीटी वगळता) मोजून मापून स्वयंपाक मी करत नाही. अदिती

मत शेवटच्या पर्यायाला दिले आहे. कुकरच्या शिट्ट्या होऊ देणे/ न देणे हे त्या त्या वेळेवर अवलंबून राहिले आहे (माझ्याबाबतीत). स्वयंपाकाची तयारी करताना (भाज्या चिरणे, कुकर करून घेणे इ.) एका जागी उभे राहून काम भागत असेल तर शिट्टी होवू देत नाही. कुकरच्यावेळेस जर बाळाची झोपेची वेळ असेल तर शिट्ट्या होवू न देणे आठवणीने करावे लागले. घरात दुसर्‍या खोलीत काम असेल तर शिट्ट्या झाल्यामुळे गॅस कमी करणे /बंद करणे याची सुचना आपोआप मिळते. रेवती