Skip to main content

वळखा पाहू

बाबुराव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
गावगाडा म्हणल्यावर गाणी, म्हणी, उखाणी, त्या इषयाला काय कमी नाय. आन उखाणा कोड्यासारखा असला तर लय मजा. आज काही कोड्यासारखी उखाणी घालतो . तुम्हाला ठाव असल तर तुम्हीबी उखाणे टाका. पर उखाण्यामधी कोडं असलं पाह्यजेन. उखाण्याचं उत्तर धाग्यामधीच द्यायचं. ज्याच उत्तर बरुबर राहीन. त्याच्या खरडवहीत 'शाब्बास' असे लिव्हल्या जाईन याची गावकर्‍यांनी नोंद घ्यावी. :) १) रंग नाही रुप नाही आभाळ म्हणशील काय ? आदी नाही अंत नाही देव म्हणशील काय ? भूत नाही, देव नाही, विचार करतोय काय ? सांग मला काय ते, नाही तर येथून जाय. २)रघुरघु रुसला, पाण्यात घुसला रघुला चार पाय, रघुचे नाव काय ? ३) तीन पायाची तिपाई, वर बसला शिपाई सांगा पटापट उत्तरं :)
अमोल केळकर

बाबुराव तुम्हीच द्या उत्तरं अमोल ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
14/04/2010 - 17:37 Permalink
बाबुराव

In reply to by टारझन

तरी मनलं अजून Rolling on the floor चा वाकडा उत्तर कसा नाय दिसना . येत आस्सन तर उत्तर दे. बाकी शिट्ट्या कशाक माराव म्हणतो. शिट्या माराक ब-याच जागा असती ना :) एक दोस्तानं व्यनी करुन पहिल्यानं उखाण्याचं उत्तर 'इंटरनेट' दिला. ते उत्तर माका चूक वाटे. पर उत्तर आवडेश. बाबुराव :)
14/04/2010 - 18:22 Permalink
शुचि

तो रघु बेडुक वाटतोय किंवा कासव. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14/04/2010 - 18:03 Permalink
बाबुराव

In reply to by शुचि

उत्तराच्या लय जोळ आल्या तुमी हे का ते आस्सं नाय म्हणाचं बॉ :) बाबुराव :)
14/04/2010 - 18:05 Permalink
शुचि

In reply to by शुचि

पहील्याचं उत्तर मन ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14/04/2010 - 18:15 Permalink
शुचि

रामराम मंडळी, मला बी २ उखाणे येतात (१) २ भाऊ शेजारी भेट नाही संसारी (२) एवढासा गडू त्याला पाहून रडू ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14/04/2010 - 18:29 Permalink
शुचि

In reply to by विंजिनेर

बरोब्बर!!! :) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14/04/2010 - 18:57 Permalink
उम्मि

हवा....पहील्याचे उत्तर. ऊम्मि Romance means hand in hand, hand in **** that in **** that in that.....
14/04/2010 - 18:29 Permalink
शुचि

In reply to by बाबुराव

मला हे उत्तर येत होतं ... मी आळस केला [( :''( [( :''( [( :''( ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
14/04/2010 - 18:58 Permalink
इनोबा म्हणे

तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर 'माठ'.(?) शिपाई सहसा 'माठ'च असतो. ;)
14/04/2010 - 22:46 Permalink
पाषाणभेद

अजून एक: रघू रघू नाना पाची बोटे ताणा आमचा रघू रूसला, भिंतीवर जावून रूसला. कृपया उत्तर माहीत असेल तर येथे देवू नका. व्यनी करा. उत्तराला शाबासकी येथे दिली जाईल व उत्तर कर्त्याचे नाव येथे दिले जाईल. ही पद्धत इतरांनाही उत्तरे देण्यास व विचार करण्यास कारण ठरेल म्हणून कृपया उत्तर माहीत असेल तर येथे देवू नका. ज्यांना उत्तर मिळाले नाही ते इथे तसे लिहून उत्तर व्यनी मागवू शकतात. या पुढेही कोड्यांना असलीच पद्धत अवलंबवावी. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
15/04/2010 - 09:04 Permalink
पाषाणभेद

In reply to by पाषाणभेद

योगेश२४ शाब्बास! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
15/04/2010 - 10:24 Permalink
बाबुराव

१) हवा २) कासव ३) चूल आन त्यावर तवा बाबुराव :)
16/04/2010 - 16:56 Permalink
झुम्बर

मार मेल्या मार लग्न होऊस्तर मार लग्न झाल्यावर मारशील तर जीव देईन ठार ओळखा अंग नाच तंग नाच तु नाच मी नाच बाबूची शेंडी नाच ओळखा तीन पायाची त्रिंबक राणी खाते लाकूड पिते पाणी ओळखा
17/04/2010 - 14:06 Permalink
मदनबाण

तीन पायाची त्रिंबक राणी खाते लाकूड पिते पाणी >>> सहाण मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
17/04/2010 - 14:12 Permalink
पर्नल नेने मराठे

फताडी म्हैस तिची फताडी शिगें... लेंडके तिची गुळमट गुळमट . :D ओळखा पाहु? चुचु
18/04/2010 - 18:15 Permalink
झुम्बर

१.माठ मार मेल्य मार कुम्भार मड्की बनवताना सतत थापड्या मारत असतो लग्न होउस्तर मार म्हजे मडक पक्क होइपर्यन्त लग्न झल्यवर मरशिल तर जिव देइन ठार म्हन्जे पक्क मद्क्यल मरल तर ते फुटत... २.ताक घुसळ्न्यचि रवी
19/04/2010 - 16:40 Permalink