Skip to main content

विसंगती..

लेखक राघव यांनी शुक्रवार, 16/04/2010 02:23 या दिवशी प्रकाशित केले.
फुललेल्या पळसाच्या सौदर्याची बात न्यारी! पण पळसास आस, तेव्हा पानांचीच खरी.. झाड तुटे - तुटे जीव, घरटीही उलथती.. मी, नुसताच बघ्या.. सल लागतो जिव्हारी विसंगती जीवनास पाचवीला पुजलेली.. कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्या(च) उरी वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा.. पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी! भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान.. हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी.. हसू राखतो जरासे.. तडजोड जगण्याशी पण रोकडे सवाल.. ओघळती गालांवरी राघव
लेखनविषय:

वाचने 1570
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

साधी शिंपल कविता !! उगाच कोणते अवजड शब्द नाहीत .. ना इमोसनल अत्याचार @ म्हणुनंच आवडली !! थँक्स राघव .. बाकी पेंटिंग बंद केलंस की काय भावा ? - (चिक्कन) मागव