आज सकाळी ऑफिसला येतानाच प्रसंग, साधारण ११-११:३० ची वेळ होती. ट्राफिकचा त्रास नको म्हणून मी मुद्दाम थोडया बाहेरच्या रस्त्याने बाईकवरून निघालो होतो.उन प्रचंड होतं. थोडं पुढे आल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्याच्या कडेने एक वृद्ध जोडपं चालताना दिसलं.दोघेही खूप थकलेले होते.अंगावर जुने मळके कपडे,आज्जीबाईच्या हातात कसलस एक गाठोडं.आजोबांच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हाताने आज्जीबाईना आधार दिलेला.मी क्षणभर मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं,घामाने थबथबलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव अजून मला स्पष्ट आठवतायत, मनात विचारांचं काहूर उठलं.कोण असतील हे ? का झाली असेल यांची अशी अवस्था?अश्या रणरणत्या उन्हात कुठे बरं निघाले असतील? त्यांनाही मुलं,नातवंड असतील? असतील तर यांना असं वाऱ्यावर का बरं सोडलं असेल? म्हातारपणाच असं विदारक चित्र पाहून मन अगदी सुन्न झालं .विचार करताकरता मी त्यांना मागे टाकून १-२ किलोमीटर पुढे आलो होतो. अचानक मनात आलं अरे आपण थांबून त्यांना १०-२० रु. ची मदत तरी करायला हवी होती.क्षणभर वाटलं अशीच गाडी मागे वळवावी आणि शोधावं त्यांना,पण इकडे ऑफिसला जायला उशीर झालेला, नाहीच गेलो परत.
ऑफिसला पोहोचलो,तिथल्या चकाचक वातावरणात मिसळून गेलो,पण मनाला लागलेली रुखरुख कमी झाली नाही.वाटलं किती स्वार्थी झालो आहोत आपण,बंगला,गाडी,अशा अनेक भौतिक गोष्टींसाठी आपणही धावतोच आहोत इतरांसारखे,माणुसकी विसरत चाललेला एक माणूस होत चाललोय की काय आपणही? काहीतरी अपराध केल्यासारखा वाटत राहिलं दिवसभर.
याद्या
3880
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वामी
अनवाणी
In reply to स्वामी by जयंत कुलकर्णी
अगदी खरं आहे!
In reply to अनवाणी by अन्या दातार
....माजुरडेपणा !!
In reply to अगदी खरं आहे! by चतुरंग
इथे
In reply to अनवाणी by अन्या दातार
हेच
आपल्याला
आपल्याला
"लिफ्ट देणे..... एक संतापजनक किस्सा...!!
हम्म्म्म.....
In reply to "लिफ्ट देणे..... एक संतापजनक किस्सा...!! by इन्द्र्राज पवार
सहमत
पोलीस ताप...!!
श्री पवार,
In reply to पोलीस ताप...!! by इन्द्र्राज पवार
लिफ्ट
>> लांबची
In reply to लिफ्ट by पक्या
मदत करावी पण,....