बर्याच वर्षांपुर्वी पैसे खर्च करुन बिनष्टोरी न बिनडायलॉगच्या पिच्चर च्या षिड्या आणल्या होत्या ... त्या तद्दन टुकार आणि फालतु निघाल्या :) पैषे गेल्याने फार जिव जळला होता :) त्या पिक्चरला काही खास नाव नसल्याने लक्षात नाही राहिलं :)
असो !@!
लक्ष्मीकांत बेर्डॅ ( कदाचित मी एक विदूषक हा अपवाद), सचिन, अशोक सराफ आणि महेश कोठारेचे सर्व 'इनोदी' चित्रपट
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
कदाचित मी एक विदूषक हा अपवाद
तुम्हाला "एक होता विदूषक" म्हणायचे असावे. माझ्या मते, तो अतिशय कंटाळवाणा आणि टुकार चित्रपट होता. पुलं (पटकथा) आणि जब्बार (दिग्दर्शक) ह्यांच्या कारकीर्दीतला एक काळा धब्बा.
चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे महानोरांची गाणी, आणि आनंद मोडकांचे संगीत.
(त्यातली 'शब्दांचा हा खेळ मांडला' ही नांदी चंद्रकांत काळे, रवी साठे, आणि मुकुंद फणसळकरने उत्कृष्ट म्हटली आहे. तसेच 'मी गाताना, गीत तुला लडिवाळा' ही अंगाई आशाताईंनी !)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
हो, हाच तो चित्रपट. निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!)
बाकी काळा 'धब्बा' वगैरे मला ठाऊक नाही ('धब्बा' हा शब्द लोक का वापरत असावेत?) 'कदाचित' हा शब्द वापरुन मूळ प्रतिसादात मी पळवाट शोधून ठेवलेली आहेच!
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
निळूभाऊंचे काम अप्रतिम (मिभो, आता मत बदलणार का? 'प्रेमा'ची आठवण ठेऊन बोला!)
अर्थातच !
बाकी, निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
निळूभाऊंचे काम अप्रतीम नाही, असा एखादा सिनेमा माहिती आहे का ?
बरेच आहेत. हिंदीतले सगळेच. 'कुली' वगैरे. मराठीत खलनायक म्हणून भूमिका केलेले बरेच. 'सामना' आणि 'सिंहासन' मधलेही काही सीन्स.
वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
वस्तुनिष्ठ व्हा, मिभो. अंध भक्ती नको.
निष्ठ आहोतच. वस्तु कोणती ते ठरवून ;-)
(ता. क. हा साला मास्तर उगाच का टाळ्या पिटतोय ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
इथे सर्वांनी हिंदी चित्रपटांचीच नावे घेतली आहेत ! पण आपले मराठीही कुठे कमी पडले नाहोयेत त्या बाबतीत !
जसे आत्ताच एक उत्सुकता होति (कशाची हे विचारू नका) म्हणून पहिला :-
पिकनिक (मराठी)
मराठी: मकरंद अनासपुरे चे बरेचसे चित्रपट
हिंदी: चांदनी चौक टू चायना .. (पहिल्यांदा बंगलूरू-मुंबई बस प्रवासात पाहिला होता.. अक्षरशः बेशुध्द पडलो होतो.. दुसर्यांदा परतीच्या प्रवासात पाहिला.. दुसर्या रांगेतल्या आसनावर बसल्याने अगदीच इलाज नव्हता.. आणि आवाज बर्यापैकी मोठा ठेवल्याने (कि हया चित्रपटाच्या भितीने?) निद्रादेवी काही केल्या आशिर्वाद द्यायला येत नव्हती..
इंग्रजी: बिवूल्फ आणि क्लॅश (कि क्लेश?) ऑफ दी टायटन्स..
======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
मराठी
लक्श्मीकांत चे काही टुकार चित्रपट
मकरंद अ. चे 'काय द्याच बोला' सोडून
भरत जाधव चे सगळे
हिंदी
लव स्टोरी २०५०
आप का सुरूर
एकलव्य
ब्लू
कंब्ख्त ईश्क
टशन
..
...
...
..... (यादी खूप मोठी आहे)
-----
सौरभ :)
मला वाटतं की बर्याच लोकांची यादी खूप मोठी आहे.. मग थोडं चेंज करुया... असे सिनेमे जे बघण्यासाठी तुम्ही थेटरमधे गेलात आणि मग मध्यांतरात किन्वा त्याही आधीच सभात्याग करून परत आलात... माझ्या आठवणीतला पिच्चरः "मुझे कुछ कहेना है"...
गजगामिनी (तोच हुसेन साहेबांचा माधुरी दिक्षित वाला) टी व्ही वर एकदा लागला होता. पण त्यात सायकल वर बसुन येणारा "कालीदास" आणि सि.व्ही. रामन आणि द विन्ची यांचं संभाषण, मधुनच उपटणारा 'मदन' वगैरे पाहून मला उर्ध्व लागायची वेळ आली होती.
टुकारपणाची तुमची व्याख्या डिफाइन करा बुवा ! आम्हाला बरेच टुकार पिक्चर आवडतात ! त्यात परदेशात राहात असाल तर "एकलव्य" पण भारी वाटतो असा अनुभव आहे. आम्ही शिरीष कणेकरांचे भक्त ! त्यांचं "माझी फिल्लमबाजी" ऐकून त्यात उल्लेखिलेले काही चित्रपट बघायचं भाग्य लाभलं ! पण काही मात्र जागतिक दर्जाचे टुकार चित्रपट होते. कित्येक सिनेमांची तर नावं देखील आठवत नाहीत.. .ह्यातच सगळं आलं.
"आज का दौर" - कला: पद्मिनी कोल्हापुरे, जॅकी श्रॉफ, निरूपा राय आणि कादर खान !
"दो गज जमीन के नीचे" - रामसे बंधू
"बाँबे एक्स्प्रेस" - कमल हसन आणि (बहुधा) मनीषा कोईराला
पण सगळ्यात जागतिक टुकार चित्रपट जर कुठला असेल तर आमीर खानचा "अव्वल नंबर" ! तसे आपण दिप्ती भटनागर हिरॉइन असलेले पण चित्रपट पाहिले आहेत ! तेव्हा कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं.
धागा झकास !
जे पी
कणेकरांच्याच भाषेत सांगायचं तर "आपली सहनशक्ती किती जबरदस्त आहे आणि जीवनलालसा किती तीव्र आहे" ह्याचं मोजमाप तुम्ही पाहिलेल्या टुकार चित्रपटांच्या यादीवरून होऊ शकतं.
मुंबई एक्सप्रेस हा भन्नाट चित्रपट होता. विजयराज आणि त्याचे सहकारी, ओम पुरी, शरद सक्सेना आणि कमल हासन यांची कामे जबरी होती. 'ब्लॅक कॉमेडी' च्या अंगाने जाणारा हा चित्रपट होता. अजूनही कुठल्या टीव्ही चॅनेलवर लागला असेल तर मी बघतो.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली
मी पण तुमच्यासारखाच फिल्लमबाज आहे. प्रुव्ह करण्यासाठी: "अव्वल नंबर" मी पण पाहिला आहे, आमिर खान, एकता कपूर (तिचा हा पहिला आणि बहुतेक शेवटचा पिच्चर), देव आनंद (निर्देशक), आदित्य पांचोली (हा देव आनंदचा भाउ आणि व्हीलन).
जर शाळेचा अभ्यास इतका चांगला लक्षात राहीला असता तर आज मी इथे किबोर्ड बदडत बसलो नसतो. :(
आठवलं आठवलं.....ह्यात आमीर क्रिकेटपटू असतो...बरोबर? (लगान मधला क्रिकेटपटू नव्हे)
मी पण पाहीलाय लहान असताना.....आपल्या दूरदर्शनवर.....
आमीरला चेंडू लागून तो खाली पडतो आणि heroin ने दिलेली " I luv u " ची टेप ऐकून परत उठतो....काहीतरीच !!!!
शिकारी मला फारच आवडलेला सिनेमा.. विशेषतः चंद्राबाबू नार्वेकरांचं दिग्दर्शन...
आजही मी थिएटरला जाऊन पाहतो...
राणा जंग बाहादुर यांचं इन्स्पेक्टरचं काम वाखाणण्याजोगं..अनिल नागरथ आणि पुष्पा वर्मा तर अप्रतिमच...
भडकोपराव
१) २०१२
२) अवतार
३) फिफ्थ एलेमेन्ट
४) ट्रान्स्फोरमर (नवीन)
२०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?
"......२०१२ बघुन अस वाटल की प्रत्येक वेळी यान्चि गाडी किवा विमान किवा हे स्वतः मरता मरता अगदी शेवटच्या क्षणी कसे काय सुखरुप बाहेर पडतात?"
व्वा !!!! क्या बात है ! अगदी एक नम्बरी निरिक्षण आहे ! निव्वळ सुखरुप नव्हे तर न खरचटता !! आयोडिन देखील नको !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
२०१२ बघून आजच २१ डिसेंबर २०१२ का नाही असे वाटून गेले. जग बुडले असते तर आख्खा चित्रपट बघावा तरी लागला नसता.
टुकार!!
असो. आज चीनमध्ये भूकंप झाला. २०१२ जवळ येतो आहे. ;)
आणि युरोप मध्ये आइसलँड जवळ मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला आहे.
जिवितहानि काही नाही पण ४००० फ्लाईट्स रहित झाल्याने हजारो प्रवाशांचे हाल झाले.
निसर्ग हल्ली अनेक रौद्र रूप धारण करताना दिसतोय.
महाराष्ट्र , जय मराठी !
त्यात करणकपूर (शशी कपूरचा मुलगा), मंदाकिनी, जितेंद्र (बहुतेक) आणि अमरीश पूरी व्हिलन होता.
अनेक टुकार पिक्चर बघितले पण सध्याचा लेटेस्ट फेवरेट म्हणजे "कुर्बान".
ग्रुपमधे हे पिक्चर बघताना प्रचंड मजा येते. मनसोक्त शिव्या देता येतात. कॉमेंटस करताना क्रिएटीव्हीटी पणाला लागते..मेंदू ताजातवाना होतो..
यादी तर मोठी आहे पण नजीकच्या काळात पाहिलेले अत्यंत टुकार सिनेमे म्हणजे
समांतर - अमोल पालेकर आणि शर्मिला टागोर
क्षण - प्रसाद ओक.
सिनेमा संपेपर्यत डो़क जड होऊन दुखायला लागलं होतं.
- अश्विनी
तशन
रब ने बना दी जोडी
लागा चूनरी मे दाग
मराठी मधे
भरत जाधव आणि मकरन्द अनासपूरे चे सगळे चित्रपट
इन्ग्लिश मधे
२०१२
यादी खूप मोठी आहे.पण हे नव्यानी पाहिलेले काहि चित्रपट.
:)
रुद्राक्ष : सुनिल शेट्टी, बिपाशा
ह्या चित्रपटाबद्दल काहिच माहित नव्हते म्हणुन गेलो होतो.
टुकारातला टुकार होता .. रामायण, महाभारत, द मेट्रीक्स, हॅरी पॉट्टर एकत्र केल्यासारखा वाटला.
पण परिक्षा नुकतिच संपल्याचा उत्साह होता त्यामुळे फरसाण लाह्यांबरोबर गोड मानुन घेतला.
:)
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
प्रतिक्रिया
टुकार..
बर्याच
रोचक
ह्म्म..
आत्ताच पाहीलेला
चटकन आठवलेले... अजून बरेच आहेत
ढोल
मराठी
आणि
एक होता विदूषक
एक होता विदूषक
खरेच
निळूभाऊ
वा.. सामना
हॅ हॅ हॅ
महुआ..अति
मराठीही कमी नाहीत !
हे घ्या..
रेनकोट...........
बरेच आहेत
मला वाटतं
कुठे
गजगामिनील
रानी
मराठीत
किती सा॑गू...
टुकारपणाची व्याख्या काय?
कणेकरांच्
मुंबई एक्सप्रेस
'मुंबई
मी पण
आठवलं आठवलं
+१
शिकारी मला
काही ईन्ग्लिश ........
परफेक्ट .... !
२१ डिसेंबर २०१२
आणि युरोप
टुकारपणात नंबर वन
लोहा ची कास्ट चुकली आहे..
छे काहीतरी काय!!
बरोब्बर..तुमचा लोहा
१. रब ने
आठवावेसे वाटत नाहीत...
हा हा हा !!!
यादी तर
अगदी टूकार
रुद्राक्ष
मी
मी