गर्द हिरवाईतील श्री केशवराज
"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."
लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजु लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना "घर सोडा" असे सांगावे लागत नाही. त्यांची पाऊले आपोआपच बाहेर वळतात. डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध कोकण कृषी विद्यापीठ असलेल्या ह्या शहरास विलोभनीय समुद्रकिनारे, किल्ले, प्राचीन लेणी यांची साथ लाभली आहे. कोणीही ह्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडावे असा हा परिसर. कोकणचा कॅलीफोर्निया जेव्हा होईल तेव्हा होईल पण कॅलीफोर्नियाला "टफ" द्यावे असे निसर्गसौंदर्य कोकणचे नक्कीच आहे. अशा या दापोली शहरास भेट दिली आणि कायम स्मरणात राहिले ते आसुद येथील "श्री केशवराज मंदिर आणि तेथील परिसर".
लेखनविषय:
वाचने
4391
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अप्रतिम धागा
In reply to अप्रतिम by अविनाशकुलकर्णी
योगेश२४
लेखन आवडलं. मनापासुन लिहिले आहे हे प्रत्येक वाक्यात जाणवतं. अभिनंदन ! अशीच भटकंती करा व प्रवास वर्णन लिहित रहा हि विनंती.
श्री. ना. पेंडसे यांच्या "गारंबीचा बापु" या कादंबरीत जसे वर्णन केले आहे तसेच हे सुंदर आसुद गाव.अगदी... अगदी... सुंदर फटु! जाता जाता:
पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल!पावसाळ्यात ८-८ दिवस बाहेर पडता येत नाही महाराजा!
वा...सुंदर लेख... :)
(हे गोमुख बर्याच मंदिरातुन दिसुन येत्...पण गोमुखाचाच आकार का देतात ? :? )
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
अप्रतिम लेख. खूप सुंदर छायाचित्रे.
गाभार्यात श्रीविष्णूंची मूर्ती एकटी आहे ऐकून वाईट वाटले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही! धन्यवाद चांगल्या लेखाबद्दल.
लेखातील देवळाच्या कळसाच्या फोटोवरून देवळाचे बैठे रूप लक्षात येत नाही आहे. खरे तर देऊळ अतिशय स्वच्छ आणि सुरेख आहे, बाहेर बसायला मंडप घातला आहे. परिसरही अतिशय सुंदर आहे.
मस्त फोटो आणि ए-वन वर्णन.
....बबलु
वाह काय मस्त ठिकाणाची ओळख करुन दिलिस योगेश.
तुझी हि भटकंती त्याच वर्णन आणि त्यातुनच मिळणारी माहिती क्लास आहे...
अतिशय मन प्रसन्न करणारे वर्णन आणि फोटोज..
खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
छान फोटो आणि लेख.
दिवाळीत भारतात गेलो होतो तेव्हा दापोलीजवळ कर्दे बीचवर गेलो होतो. तेव्हा या आसुद बाग गावाबद्दल आणि श्री. केशवराजाच्या मंदिराबद्दल माहित असते तर नक्की गेलो असतो. आता पुन्हा गेल्यावर जायला पाहिजे.
पावसाळ्याबद्दल विंजिनेर यांच्या मताशी सहमत. ८-८ दिवस अक्षरशः काहीही करता येत नाही. तुम्ही डिसेंबर म्हणजे चांगल्या मोसमात गेलात.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार!!!
चांगलेच आले आहेत, पण प्रत्यक्ष पाहण्याला आणि अनुभवण्याला पर्याय नाही!>>>> चित्रा अगदी खरंय.
मी ३/४ वर्षापुर्वी मुरुड ला गेलो होतो, त्यावेळी श्री केशवराज मंदिराला भेट दिली होती. नदिवरचा पुल पार करुन आम्ही चुकिचा रस्ता धरला आणी २०/३० मिनीट भटकत बसलो...असो.
हा परिसर मस्तच आहे. जवळच हर्णेचा मासळी बाजार, श्री व्याघ्रेश्वर मंदिर, कड्यावरचा गणपती अशी इतर ठिकाणेहि आहेत.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
अप्रतिम