..नको रातराणी नको पारीजात..
नको रातराणी नको पारीजात
-------------------------------------------
नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात.
जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात.
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर.
उराशी मला तु लपेटुनि घेता,मला ऐकले मी तुझ्या स्पंदनात.
तुझा गंध येता पुन्हा मोगर्याला,तुझा रंग येता पुन्हा चांदण्याला.
जसा मेघ देई सुगंध मृत्तिकेला,तसा बरसलो मी तुझ्या अंगणात.
तप्त श्वास सारे,तृप्त भासणारे, पुन्हांद्या विझूनी पुन्हा पेटणारे
असा भास व्हावा चितेच्या धगीचा,फुलावा जणु मोगरा चंदनात.
सुटे गार वारा उगवताना पहाट,जणु येतसे तु न्हाऊनि दवात.
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
प्रिये तूच झालीस माझाच श्वास,पुरे व्यापिले तु रिक्त अंतरास.
जसा जीव वेडा राहे शरीरी,तसा राहतो मी तुझ्या कुंकवात.
--------योगेश जोशी
वा! आवडली...
चांगली
विना
पुन्हा फूलवीशी चित्तवृत्ती अशी की,जणु लाविशी तु पुन्हा सांजवात.
आवडली
एकदम मस्त.
सुन्दर
उत्साहवर्
अप्रतिम ! ! !
वाचन
@जयंतराव.....
सुंदर कविता
+/- १
++१
केस
अथग्रहणाबद्दल धन्यवाद ; अर्धवट उद्धरण :-)
योगेश, खाली या कवितेचे गुणगुणणे दिले आहे.
सुरेख...
व्वा!
एखादी
चांगली कविता आहे
ही कविता
सुरेख लय
छान धागा!