सफरचंदाच्या हंगामातली गाय - रॉबर्ट फ्रॉस्ट
- - -
या गायीमध्ये शिरलेय काहीतरी हल्ली,
कुंपण-फाटक काहीही मानायचीच थांबली.
भिंत बांधणारे वाटतात वेडे की खुळे?
चोथ्याने भरलेय तोंड , गळतोय त्यातून
सफरचंद पाक. फळे चाखून खाऊन
नको झालीत हिला नीरस गवत-मुळे.
पाडलेली वार्याने झाडाझाडाखालची
फळे खड्यांसकट, अळ्यांसकट खायची,
अन् अर्धवट खाल्लेली सोडून जायचे पळत.
टेकाडावर हांबरते आभाळाला बघत -
सुरकतले हिचे आचळ, दूध चाललेय सुकत.
- - -
मूळ कवितेचा दुवा| लेखनविषय: |
|---|
वाचने
2648
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
कविता आवडली
शेवटची ओळ फार अस्वस्थ करणारी
जालावरती हे एक पोस्ट सापडले!
In reply to शेवटची ओळ फार अस्वस्थ करणारी by धनंजय
विश्लेषणासाठी चांगली सुरुवात
In reply to जालावरती हे एक पोस्ट सापडले! by चतुरंग
"ड्रंकन
In reply to शेवटची ओळ फार अस्वस्थ करणारी by धनंजय
स्वत:विषयी
forbidden fruit